Terjemahan makna Alquran Alkarim - Terjemahan Berbahasa Marathi - Muhammad Syafi' Ansari

external-link copy
178 : 3

وَلَا یَحْسَبَنَّ الَّذِیْنَ كَفَرُوْۤا اَنَّمَا نُمْلِیْ لَهُمْ خَیْرٌ لِّاَنْفُسِهِمْ ؕ— اِنَّمَا نُمْلِیْ لَهُمْ لِیَزْدَادُوْۤا اِثْمًا ۚ— وَلَهُمْ عَذَابٌ مُّهِیْنٌ ۟

१७८. काफिर (इन्कारी) लोकांनी या विचारात राहू नये की आमचे त्यांना सवड देणे त्यांच्यासाठी चांगले आहे, किंबहुना आम्हीही सवड अशासाठी देत आहोत की त्यांनी आणखी जास्त अपराध करावेत, आणि त्यांच्यासाठीच अपमानित करणारी शिक्षा-यातना आहे.१ info

(१) या आयतीत अल्लाहतर्फे सवड देण्याचा नियम सांगितला आहे. अर्थात अल्लाह आपल्या नियम व मर्जीनुसार काफिरांना सवड देतो. ठराविक अवधीकरिता त्यांना ऐहिक सुख-सुखसमृद्धी, धन-संपदा आणि संतती प्रदान करतो. लोकांना वाटते की त्यांच्यावर अल्लाहच्या दया-कृपेचा वर्षाव होत आहे. परंतु जर अल्लाहने प्रदान केलेल्या सुख-समृद्धीने लाभान्वित होणारी पुण्यप्राप्ती आणि अल्लाहच्या आज्ञापालनाचा मार्ग पत्करणार नाहीत तर हे ऐहिक सुख अल्लाहची कृपा-देणगी नाही, अल्लाहतर्फे देण्यात आलेली सवड आहे. ज्यामुळे त्यांच्या कुप्रनीतीत आणि अवज्ञा करणयात उत्तरोत्तर वाढहोते. परिणामी शेवटी ते जहन्नमची महाभयंकर आगीची शिक्षा-यातना भोगण्यास पात्र ठरतात.

التفاسير: