Terjemahan makna Alquran Alkarim - Terjemahan Berbahasa Marathi - Muhammad Syafi' Ansari

Nomor Halaman:close

external-link copy
53 : 12

وَمَاۤ اُبَرِّئُ نَفْسِیْ ۚ— اِنَّ النَّفْسَ لَاَمَّارَةٌ بِالسُّوْٓءِ اِلَّا مَا رَحِمَ رَبِّیْ ؕ— اِنَّ رَبِّیْ غَفُوْرٌ رَّحِیْمٌ ۟

५३. आणि मी आपल्या मनाच्या पावित्र्याचे वर्णन करीत नाही, निःसंशय, मन तर वाईट गोष्टीचीच प्रेरणार देणारे आहे, परंतु हे की माझा पालनकर्ताच आपली दया- कृपा करील. निश्चितच माझा पालनकर्ता माफ करणारा, दया करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
54 : 12

وَقَالَ الْمَلِكُ ائْتُوْنِیْ بِهٖۤ اَسْتَخْلِصْهُ لِنَفْسِیْ ۚ— فَلَمَّا كَلَّمَهٗ قَالَ اِنَّكَ الْیَوْمَ لَدَیْنَا مَكِیْنٌ اَمِیْنٌ ۟

५४. आणि बादशहा म्हणाला, त्याला माझ्या समोर आणा की मी त्याला आपल्या व्यक्तिगत कामांकरिता नेमून घ्यावे. मग जेव्हा त्याच्याशी वार्तालाप करू लागला, तेव्हा म्हणाला, तुम्ही आजपासून आमचे येथे सन्मानित आणि विश्वसनीय (अमानतदार) आहात. info
التفاسير:

external-link copy
55 : 12

قَالَ اجْعَلْنِیْ عَلٰی خَزَآىِٕنِ الْاَرْضِ ۚ— اِنِّیْ حَفِیْظٌ عَلِیْمٌ ۟

५५. (यूसुफ) म्हणाले, तुम्ही मला देशाच्या खजीन्यावर नियुक्त करा. मी संरक्षक आणि जाणकार आहे. info
التفاسير:

external-link copy
56 : 12

وَكَذٰلِكَ مَكَّنَّا لِیُوْسُفَ فِی الْاَرْضِ ۚ— یَتَبَوَّاُ مِنْهَا حَیْثُ یَشَآءُ ؕ— نُصِیْبُ بِرَحْمَتِنَا مَنْ نَّشَآءُ وَلَا نُضِیْعُ اَجْرَ الْمُحْسِنِیْنَ ۟

५६. आणि अशा प्रकारे आम्ही यूसुफला देशाचा सूत्रधार बनविले की त्याने वाटेल तिथे राहावे. आम्ही ज्याला इच्छितो, त्याच्यापर्यंत आपली दया- कृपा पोहचवितो, आणि आम्ही सत्कर्म करणाऱ्यांच्या आचरणाचे फळ वाया जाऊ देत नाही. info
التفاسير:

external-link copy
57 : 12

وَلَاَجْرُ الْاٰخِرَةِ خَیْرٌ لِّلَّذِیْنَ اٰمَنُوْا وَكَانُوْا یَتَّقُوْنَ ۟۠

५७. आणि निःसंशय ईमान राखणाऱ्यांचा आणि दुराचारापासून दूर राहणाऱ्यांचा आखिरतचा मोबदला कितीतरी चांगला आहे. info
التفاسير:

external-link copy
58 : 12

وَجَآءَ اِخْوَةُ یُوْسُفَ فَدَخَلُوْا عَلَیْهِ فَعَرَفَهُمْ وَهُمْ لَهٗ مُنْكِرُوْنَ ۟

५८. आणि यूसुफचे भाऊ आले आणि यूसुफजवळ गेले तेव्हा यूसुफने त्यांना ओळखून घेतले, परंतु त्यांनी त्याला ओळखले नाही. info
التفاسير:

external-link copy
59 : 12

وَلَمَّا جَهَّزَهُمْ بِجَهَازِهِمْ قَالَ ائْتُوْنِیْ بِاَخٍ لَّكُمْ مِّنْ اَبِیْكُمْ ۚ— اَلَا تَرَوْنَ اَنِّیْۤ اُوْفِی الْكَیْلَ وَاَنَا خَیْرُ الْمُنْزِلِیْنَ ۟

५९. आणि जेव्हा त्यांचे सामान तयार केले गेले तेव्हा यूसुफ म्हणाले, तुम्ही माझ्याजवळ आपल्या त्या भावाला आणा, जो तुमच्या पित्यापासून आहे, काय तुम्ही नाही पाहिले की मी मापही पुरेपूर देतो आणि अतिथीचे चांगल्या प्रकारे आदरातिथ्य करणाऱ्यांपैकी आहे. info
التفاسير:

external-link copy
60 : 12

فَاِنْ لَّمْ تَاْتُوْنِیْ بِهٖ فَلَا كَیْلَ لَكُمْ عِنْدِیْ وَلَا تَقْرَبُوْنِ ۟

६०. परंतु जर तुम्ही त्याला माझ्याजवळ आणले नाही तर माझ्याकडून तुम्हाला कसलेही माप मिळणार नाही, किंबहुना तुम्ही माझ्याजवळही येऊ शकणार नाहीत. info
التفاسير:

external-link copy
61 : 12

قَالُوْا سَنُرَاوِدُ عَنْهُ اَبَاهُ وَاِنَّا لَفٰعِلُوْنَ ۟

६१. ते म्हणाले, ठीक आहे, आम्ही त्याच्या पित्याशी या संदर्भात गोडीगुलाबीने बोलून पूर्ण प्रयत्न करू. info
التفاسير:

external-link copy
62 : 12

وَقَالَ لِفِتْیٰنِهِ اجْعَلُوْا بِضَاعَتَهُمْ فِیْ رِحَالِهِمْ لَعَلَّهُمْ یَعْرِفُوْنَهَاۤ اِذَا انْقَلَبُوْۤا اِلٰۤی اَهْلِهِمْ لَعَلَّهُمْ یَرْجِعُوْنَ ۟

६२. आणि आपल्या सेवकांना सांगितले की त्यांचा माल (धन) त्यांच्याच पोत्यांमध्ये ठेवून द्या की जेव्हा परतून आपल्या कुटुंबात जातील तेव्हा आपले धन ओळखून घेतील, फार शक्य आहे की ते पुन्हा येतील. info
التفاسير:

external-link copy
63 : 12

فَلَمَّا رَجَعُوْۤا اِلٰۤی اَبِیْهِمْ قَالُوْا یٰۤاَبَانَا مُنِعَ مِنَّا الْكَیْلُ فَاَرْسِلْ مَعَنَاۤ اَخَانَا نَكْتَلْ وَاِنَّا لَهٗ لَحٰفِظُوْنَ ۟

६३. जेव्हा ते लोक परतून आपल्या पित्याजवळ गेले तेव्हा म्हणू लागले, आम्हाला तर धान्य देण्यावर प्रतिबंध घातला गेला. आता तुम्ही आमच्यासोबत भावाला पाठवा की आम्ही माप भरून आणावे. आम्ही त्याच्या रक्षणाची हमी देतो. info
التفاسير: