क़ुरआन के अर्थों का अनुवाद - मराठी अनुवाद - मुहम्मद शफ़ी अंसारी

पृष्ठ संख्या:close

external-link copy
19 : 6

قُلْ اَیُّ شَیْءٍ اَكْبَرُ شَهَادَةً ؕ— قُلِ اللّٰهُ ۫— شَهِیْدٌۢ بَیْنِیْ وَبَیْنَكُمْ ۫— وَاُوْحِیَ اِلَیَّ هٰذَا الْقُرْاٰنُ لِاُنْذِرَكُمْ بِهٖ وَمَنْ بَلَغَ ؕ— اَىِٕنَّكُمْ لَتَشْهَدُوْنَ اَنَّ مَعَ اللّٰهِ اٰلِهَةً اُخْرٰی ؕ— قُلْ لَّاۤ اَشْهَدُ ۚ— قُلْ اِنَّمَا هُوَ اِلٰهٌ وَّاحِدٌ وَّاِنَّنِیْ بَرِیْٓءٌ مِّمَّا تُشْرِكُوْنَ ۟ۘ

१९. तुम्ही सांगा की कोणाची साक्ष मोठी आहे? सांगा की आमच्या आणि तुमच्या दरम्यान अल्लाह साक्षी आहे आणि हा कुरआन माझ्याकडे वहयी (अवतरीत) केला गेला आहे, यासाठी की त्याच्याद्वारे तुम्हाला आणि ज्यांच्यापर्यंत हे पोहोचेल, त्या सर्वांना सचेत करावे.१ काय तुम्ही साक्ष देता की अल्लाहसोबत अन्य इतर उपास्ये (माबूद) आहेत? तुम्ही सांगा की मी या गोष्टीची साक्ष नाही देत. तुम्ही सांगा, तो एकच उपासना करण्यायोग्य आहे आणि मी तुमच्या शिर्कपासून मुक्त आहे. info

(१) रबीअ बिन अनस कथन करतात की आता ज्या कोणापर्यंत कुरआन पोहोचले, जर तो पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा सच्चा अनुयायी आहे तर त्याचे हे कर्तव्य ठरते की त्यानेही लोकांना अल्लाहकडे, त्याचप्रमाणे बोलवावे ज्याप्रमाणे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लोकांना आवाहन करीत असत आणि त्याचप्रमाणे जागृत करावे जसे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी जागृत केले होते. (इब्ने कसीर)

التفاسير:

external-link copy
20 : 6

اَلَّذِیْنَ اٰتَیْنٰهُمُ الْكِتٰبَ یَعْرِفُوْنَهٗ كَمَا یَعْرِفُوْنَ اَبْنَآءَهُمْ ۘ— اَلَّذِیْنَ خَسِرُوْۤا اَنْفُسَهُمْ فَهُمْ لَا یُؤْمِنُوْنَ ۟۠

२०. ज्यांना आम्ही ग्रंथ (तौरात आणि इंजील) दिला आहे ते तुम्हाला (हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना) त्याचप्रमाणे ओळखतात, ज्याप्रमाणे आपल्या पुत्रांना ओळखतात. जे स्वतः आपल्याला हरवून बसले आहेत, तेच ईमान राखणार नाहीत. info
التفاسير:

external-link copy
21 : 6

وَمَنْ اَظْلَمُ مِمَّنِ افْتَرٰی عَلَی اللّٰهِ كَذِبًا اَوْ كَذَّبَ بِاٰیٰتِهٖ ؕ— اِنَّهٗ لَا یُفْلِحُ الظّٰلِمُوْنَ ۟

२१. आणि या हून मोठा अत्याचारी कोण आहे, जो अल्लाहवर खोटा आळ घेईल त्याच्या निशाण्यां (प्रतिकां) ना खोटे जाणेल. निःसंशय, अत्याचारी लोक सफल होत नाहीत. info
التفاسير:

external-link copy
22 : 6

وَیَوْمَ نَحْشُرُهُمْ جَمِیْعًا ثُمَّ نَقُوْلُ لِلَّذِیْنَ اَشْرَكُوْۤا اَیْنَ شُرَكَآؤُكُمُ الَّذِیْنَ كُنْتُمْ تَزْعُمُوْنَ ۟

२२. आणि ज्या दिवशी आम्ही सर्वांना एकत्र करू, मंग ज्यांनी अल्लाहसोबत दुसऱ्यांना सहभागी ठरविले, त्यांना सांगू, कोठे आहेत ते, ज्यांना तुम्ही (अल्लाहचा) सहभागी जाणत होते (तो दिवस आठवतो). info
التفاسير:

external-link copy
23 : 6

ثُمَّ لَمْ تَكُنْ فِتْنَتُهُمْ اِلَّاۤ اَنْ قَالُوْا وَاللّٰهِ رَبِّنَا مَا كُنَّا مُشْرِكِیْنَ ۟

२३. मग त्यांच्या शिर्कची, याखेरीज कोणतीही सबब नसेल की म्हणतील, आमच्या पालनकर्त्या अल्लाहची शपथ, आम्ही अनेक ईश्वरांची उपासना करणारे नव्हतो. १ info

(१) फितना या शब्दाचा एक अर्थ शिर्क आणि एक अर्थ तौबा असा केला गेला आहे. अर्थात शेवटी हे लोक प्रमाण व क्षमा याचना सादर करून अज़ाबपासून सुटका प्राप्त करण्याचा प्रयत्न करतील की आम्ही तर अनेक ईश्वरांचे उपासक नव्हतो. या ठिकाणी ही शंका नसावी की तिथे तर माणसाचे हात पाय साक्ष देतील आणि तोंडावर मोहर लावली जाईल, मग हे इन्कार कसे करतील? याचे उत्तर हजरत अब्बास यांनी दिले आहे की जेव्हा मूर्तिपूजक पाहतील की ईमानधारक जन्नतमध्ये प्रवेश करीत आहेत, तेव्हा ते आपसात सल्लामसलत करून मूर्तिपूजा करण्याचाच इन्कार करतील तेव्हा अल्लाह त्यांच्या तोंडावर मोहर लावील आणि त्यांचे हात पाय त्यांच्या कृत-कर्मांची साक्ष देतील. मग ते सर्वश्रेष्ठ अल्लाहपासून कोणतीही गोष्ट लपविण्याचे सामर्थ्य राखू शकणार नाहीत. (इब्ने कसीर)

التفاسير:

external-link copy
24 : 6

اُنْظُرْ كَیْفَ كَذَبُوْا عَلٰۤی اَنْفُسِهِمْ وَضَلَّ عَنْهُمْ مَّا كَانُوْا یَفْتَرُوْنَ ۟

२४. बघा, आपल्याविषयी त्यांनी कसे खोटे सांगितले आणि त्यांचे ते मिथ्या आरोप त्यांच्याकडून हरवले, गायब झाले. info
التفاسير:

external-link copy
25 : 6

وَمِنْهُمْ مَّنْ یَّسْتَمِعُ اِلَیْكَ ۚ— وَجَعَلْنَا عَلٰی قُلُوْبِهِمْ اَكِنَّةً اَنْ یَّفْقَهُوْهُ وَفِیْۤ اٰذَانِهِمْ وَقْرًا ؕ— وَاِنْ یَّرَوْا كُلَّ اٰیَةٍ لَّا یُؤْمِنُوْا بِهَا ؕ— حَتّٰۤی اِذَا جَآءُوْكَ یُجَادِلُوْنَكَ یَقُوْلُ الَّذِیْنَ كَفَرُوْۤا اِنْ هٰذَاۤ اِلَّاۤ اَسَاطِیْرُ الْاَوَّلِیْنَ ۟

२५. त्यांच्यापैकी काहीजण तुमच्याकडे कान लावून बसतात आणि आम्ही त्यांच्या हृदयांवर पडदे टाकून ठेवले आहेत की त्यास समजावे आणि त्यांचे कान बधीर आहेत आणि सर्व निशाण्या त्यांनी पाहून घेतल्या तरीही त्यांच्यावर ईमान राखणार नाहीत, येथपर्यंत की जेव्हा ते तुमच्याजवळ येतात, भांडण करतात, ईमान न राखणारे म्हणतात की या सर्व थोर बुजूर्ग लोकांच्या कथा-कहाण्या आहेत. info
التفاسير:

external-link copy
26 : 6

وَهُمْ یَنْهَوْنَ عَنْهُ وَیَنْـَٔوْنَ عَنْهُ ۚ— وَاِنْ یُّهْلِكُوْنَ اِلَّاۤ اَنْفُسَهُمْ وَمَا یَشْعُرُوْنَ ۟

२६. आणि हे लोक याच्यापासून दुसऱ्यांनाही रोखतात आणि स्वतःदेखील दूर दूर राहतात आणि हे स्वतःचा सर्वनाश करून घेत आहेत आणि ध्यानी घेत नाही. info
التفاسير:

external-link copy
27 : 6

وَلَوْ تَرٰۤی اِذْ وُقِفُوْا عَلَی النَّارِ فَقَالُوْا یٰلَیْتَنَا نُرَدُّ وَلَا نُكَذِّبَ بِاٰیٰتِ رَبِّنَا وَنَكُوْنَ مِنَ الْمُؤْمِنِیْنَ ۟

२७. आणि जर तुम्ही त्या वेळी पाहाल, जेव्हा या लोकांना जहन्नमच्या जवळ उभे केले जाईल, तेव्हा म्हणतील, अरेरे! आम्हाला पुन्हा परत पाठविले गेले तर किती चांगले होईल (आणि असे झाल्यास) तर आम्ही आपल्या पालनकर्त्याच्या निशाण्यांना खोटे ठरवणार नाही आणि आम्ही ईमान राखणाऱ्यांपैकी होऊ. info
التفاسير: