क़ुरआन के अर्थों का अनुवाद - मराठी अनुवाद - मुहम्मद शफ़ी अंसारी

पृष्ठ संख्या:close

external-link copy
21 : 25

وَقَالَ الَّذِیْنَ لَا یَرْجُوْنَ لِقَآءَنَا لَوْلَاۤ اُنْزِلَ عَلَیْنَا الْمَلٰٓىِٕكَةُ اَوْ نَرٰی رَبَّنَا ؕ— لَقَدِ اسْتَكْبَرُوْا فِیْۤ اَنْفُسِهِمْ وَعَتَوْ عُتُوًّا كَبِیْرًا ۟

२१. आणि ज्यांना आमच्या भेटीची आशा नाही, ते म्हणाले की आमच्यावर फरिश्ते का नाही अवतरित केले जात? किंवा आम्ही (आपल्या डोळ्यांनी) आपल्या पालनकर्त्यास पाहिले असते? त्या लोकांनी स्वतः आपल्यालाच खूप मोठे समजून घेतले आहे आणि फार अवज्ञा केली आहे. info
التفاسير:

external-link copy
22 : 25

یَوْمَ یَرَوْنَ الْمَلٰٓىِٕكَةَ لَا بُشْرٰی یَوْمَىِٕذٍ لِّلْمُجْرِمِیْنَ وَیَقُوْلُوْنَ حِجْرًا مَّحْجُوْرًا ۟

२२. ज्या दिवशी हे फरिश्त्यांना पाहतील त्या दिवशी या अपराध्यांकरिता कोणताही आनंद नसेल आणि म्हणतील की वंचितच वंचित ठेवले गेलो. info
التفاسير:

external-link copy
23 : 25

وَقَدِمْنَاۤ اِلٰی مَا عَمِلُوْا مِنْ عَمَلٍ فَجَعَلْنٰهُ هَبَآءً مَّنْثُوْرًا ۟

२३. आणि त्यांनी जे जे कर्म केले होते आम्ही त्यांच्याकडे पुढे होऊन त्यांना कणांप्रमाणे क्षत-विक्षत करून टाकले. info
التفاسير:

external-link copy
24 : 25

اَصْحٰبُ الْجَنَّةِ یَوْمَىِٕذٍ خَیْرٌ مُّسْتَقَرًّا وَّاَحْسَنُ مَقِیْلًا ۟

२४. (परंतु) त्या दिवशी जन्नतमध्ये राहणाऱ्यांचे ठिकाण फार चांगले असेल, आणि विश्रामस्थानही सुखदायक असेल. info
التفاسير:

external-link copy
25 : 25

وَیَوْمَ تَشَقَّقُ السَّمَآءُ بِالْغَمَامِ وَنُزِّلَ الْمَلٰٓىِٕكَةُ تَنْزِیْلًا ۟

२५. आणि ज्या दिवशी आकाश ढगांसह फाटून जाईल आणि फरिश्ते सतत उतरविले जातील. info
التفاسير:

external-link copy
26 : 25

اَلْمُلْكُ یَوْمَىِٕذِ ١لْحَقُّ لِلرَّحْمٰنِ ؕ— وَكَانَ یَوْمًا عَلَی الْكٰفِرِیْنَ عَسِیْرًا ۟

२६. त्या दिवशी योग्यरित्या राज्यसत्ता केवळ रहमानचीच(कृपाळु) असेल, आणि हा दिवस काफिरांकरिता मोठा सक्त असेल. info
التفاسير:

external-link copy
27 : 25

وَیَوْمَ یَعَضُّ الظَّالِمُ عَلٰی یَدَیْهِ یَقُوْلُ یٰلَیْتَنِی اتَّخَذْتُ مَعَ الرَّسُوْلِ سَبِیْلًا ۟

२७. आणि त्या दिवशी अत्याचारी, आपल्या हातांना चावा घेऊन म्हणेल, अरेरे! मी पैगंबराचा मार्ग अंगीकारला असता तर बरे झाले असते! info
التفاسير:

external-link copy
28 : 25

یٰوَیْلَتٰی لَیْتَنِیْ لَمْ اَتَّخِذْ فُلَانًا خَلِیْلًا ۟

२८. अरेरे! मी अमुक एका इसमाला मित्र बनविले नसते तर बरे झाले असते! info
التفاسير:

external-link copy
29 : 25

لَقَدْ اَضَلَّنِیْ عَنِ الذِّكْرِ بَعْدَ اِذْ جَآءَنِیْ ؕ— وَكَانَ الشَّیْطٰنُ لِلْاِنْسَانِ خَذُوْلًا ۟

२९. त्याने तर मला त्यानंतर मार्गभ्रष्ट केले, जेव्हा उपदेश माझ्याजवळ येऊन पोहोचला होता आणि सैतान तर मानवाला (वेळेवर) दगा देणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
30 : 25

وَقَالَ الرَّسُوْلُ یٰرَبِّ اِنَّ قَوْمِی اتَّخَذُوْا هٰذَا الْقُرْاٰنَ مَهْجُوْرًا ۟

३०. आणि पैगंबर म्हणेल की हे माझ्या पालनकर्त्या! निःसंशय, माझ्या जनसमूहाने या कुरआनास सोडून दिले होते. info
التفاسير:

external-link copy
31 : 25

وَكَذٰلِكَ جَعَلْنَا لِكُلِّ نَبِیٍّ عَدُوًّا مِّنَ الْمُجْرِمِیْنَ ؕ— وَكَفٰی بِرَبِّكَ هَادِیًا وَّنَصِیْرًا ۟

३१. आणि अशा प्रकारे आम्ही काही अपराध्यांना प्रत्येक पैगंबरांचे शत्रू बनविले आहे आणि तुमचा पालनकर्ताच मार्गदर्शन करणारा आणि मदत करणारा पुरेसा आहे. info
التفاسير:

external-link copy
32 : 25

وَقَالَ الَّذِیْنَ كَفَرُوْا لَوْلَا نُزِّلَ عَلَیْهِ الْقُرْاٰنُ جُمْلَةً وَّاحِدَةً ۛۚ— كَذٰلِكَ ۛۚ— لِنُثَبِّتَ بِهٖ فُؤَادَكَ وَرَتَّلْنٰهُ تَرْتِیْلًا ۟

३२. आणि काफिर म्हणाले की त्याच्यावर संपूर्ण कुरआन एकाच वेळी का नाही अवतरित केले गेले? अशा प्रकारे (आम्ही थोडे थोडे करून अवतरित केले) यासाठी की याद्वआरे आम्ही तुमच्या हृदयास मजबूती प्रदान करावी. आणि आम्ही त्यास थांबून थांबूनच वाचून ऐकविले आहे. info
التفاسير: