क़ुरआन के अर्थों का अनुवाद - मराठी अनुवाद - मुहम्मद शफ़ी अंसारी

पृष्ठ संख्या:close

external-link copy
142 : 2

سَیَقُوْلُ السُّفَهَآءُ مِنَ النَّاسِ مَا وَلّٰىهُمْ عَنْ قِبْلَتِهِمُ الَّتِیْ كَانُوْا عَلَیْهَا ؕ— قُلْ لِّلّٰهِ الْمَشْرِقُ وَالْمَغْرِبُ ؕ— یَهْدِیْ مَنْ یَّشَآءُ اِلٰی صِرَاطٍ مُّسْتَقِیْمٍ ۟

१४२. लवकरच हे मूर्ख लोक म्हणतील की ज्या किब्ला (ज्या दिशेकडे तोंड करून नमाज पढली जाते) वर हे होते, त्याकडून यांना कोणत्या गोष्टीने फिरविले? (तुम्ही त्यांना) सांगा की पूर्व आणि पश्चिमेचा मालक अल्लाह आहे. तो ज्याला इच्छितो सरळ मार्ग दाखवितो. info
التفاسير:

external-link copy
143 : 2

وَكَذٰلِكَ جَعَلْنٰكُمْ اُمَّةً وَّسَطًا لِّتَكُوْنُوْا شُهَدَآءَ عَلَی النَّاسِ وَیَكُوْنَ الرَّسُوْلُ عَلَیْكُمْ شَهِیْدًا ؕ— وَمَا جَعَلْنَا الْقِبْلَةَ الَّتِیْ كُنْتَ عَلَیْهَاۤ اِلَّا لِنَعْلَمَ مَنْ یَّتَّبِعُ الرَّسُوْلَ مِمَّنْ یَّنْقَلِبُ عَلٰی عَقِبَیْهِ ؕ— وَاِنْ كَانَتْ لَكَبِیْرَةً اِلَّا عَلَی الَّذِیْنَ هَدَی اللّٰهُ ؕ— وَمَا كَانَ اللّٰهُ لِیُضِیْعَ اِیْمَانَكُمْ ؕ— اِنَّ اللّٰهَ بِالنَّاسِ لَرَءُوْفٌ رَّحِیْمٌ ۟

१४३. आणि आम्ही अशा प्रकारे तुम्हाला मधली (संतुलित) उम्मत (जनसमूह) बनविले,१ यासाठी की तुम्ही लोकांवर साक्षी राहावे आणि रसूल (स.) तुमच्यावर साक्षी राहावेत आणि ज्या किब्लावर तुम्ही पूर्वीपासून होते, तो आम्ही केवळ एवढ्यासाठी निश्चित केला होता की (याद्वारे) आम्ही हे जाणून घ्यावे की रसूलचा सच्चा ताबेदार कोण आहे आणि कोण आहे जो उलट्या पावली परत फिरतो. वास्तविक हे कठीण काम आहे, परंतु ज्यांना अल्लाहने मार्गदर्शन केले आहे (त्यांच्यासाठी काहीच कठीण नाही) अल्लाह तुमचे ईमान वाया जाऊ देणार नाही. निःसंशय, अल्लाह, लोकांशी प्रेम राखणारा आणि दया करणारा आहे. info

(१) मूळ शब्द ‘वसातुन’ याचा अर्थ मध्य (मधला), परंतु हा शब्द मोठेपणा आणि श्रेष्ठता या अर्थानेही वापरला जातो. इथेही याच अर्थाने वापरला गेला आहे.

التفاسير:

external-link copy
144 : 2

قَدْ نَرٰی تَقَلُّبَ وَجْهِكَ فِی السَّمَآءِ ۚ— فَلَنُوَلِّیَنَّكَ قِبْلَةً تَرْضٰىهَا ۪— فَوَلِّ وَجْهَكَ شَطْرَ الْمَسْجِدِ الْحَرَامِ ؕ— وَحَیْثُ مَا كُنْتُمْ فَوَلُّوْا وُجُوْهَكُمْ شَطْرَهٗ ؕ— وَاِنَّ الَّذِیْنَ اُوْتُوا الْكِتٰبَ لَیَعْلَمُوْنَ اَنَّهُ الْحَقُّ مِنْ رَّبِّهِمْ ؕ— وَمَا اللّٰهُ بِغَافِلٍ عَمَّا یَعْمَلُوْنَ ۟

१४४. आम्ही तुमचे तोंड वारंवार आकाशाकडे वर होत असलेले पाहत आहोत, आता आम्ही तुम्हाला त्या किब्लाकडे फिरवून देऊ ज्यामुळे तुम्ही खूश व्हाल. तुम्ही आपले तोंड मस्जिदे हराम (काबा) कडे फिरवून घ्या आणि तुम्ही कोठेही असा, आपले तोंड त्याच्याचकडे फिरवून घेत जा. ग्रंथधारकांना, ही गोष्ट अल्लाहतर्फे सत्य असण्याचे खरे ज्ञान आहे आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह त्यांच्या त्या कर्मांपासून गाफील नाही, जी कर्मे हे करतात. info
التفاسير:

external-link copy
145 : 2

وَلَىِٕنْ اَتَیْتَ الَّذِیْنَ اُوْتُوا الْكِتٰبَ بِكُلِّ اٰیَةٍ مَّا تَبِعُوْا قِبْلَتَكَ ۚ— وَمَاۤ اَنْتَ بِتَابِعٍ قِبْلَتَهُمْ ۚ— وَمَا بَعْضُهُمْ بِتَابِعٍ قِبْلَةَ بَعْضٍ ؕ— وَلَىِٕنِ اتَّبَعْتَ اَهْوَآءَهُمْ مِّنْ بَعْدِ مَا جَآءَكَ مِنَ الْعِلْمِ ۙ— اِنَّكَ اِذًا لَّمِنَ الظّٰلِمِیْنَ ۟ۘ

१४५. आणि तुम्ही जर ग्रंथधारकांना सर्व पुरावे सादर करून द्याल, तरीही ते तुमच्या किब्लाचे अनुसरण करणार नाहीत आणि ना तुम्ही त्याचा किब्ला मान्य करणारे व्हाल, ना हे आपसात एकमेकांचा किब्ला मानणारे आहेत. तुमच्याजवळ स्पष्ट ज्ञान येऊन पोहोचल्यानंतरही जर तुम्ही त्यांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांचे अनुसरण करू लागाल तर निश्चितच तुम्हीदेखील अत्याचारी ठराल.१ info

(१) ही ताकीद यापूर्वी दिली गेली आहे. हेतु मुस्लिम जनसमूहाला सावध करणे आहे की कुरआन आणि हदीसचे ज्ञान प्राप्त झाल्यावरही बिदअतवाल्यांच्या मागे लागणे अत्याचार आणि भटकणे होय.

التفاسير: