કુરઆન મજીદના શબ્દોનું ભાષાંતર - મરાઠી ભાષામાં અનુવાદ - મુહમ્મદ શફીઅ અન્સારી

અન્ નબા

external-link copy
1 : 78

عَمَّ یَتَسَآءَلُوْنَ ۟ۚ

१. हे लोक कोणत्या गोष्टीची विचारपूस करीत आहेत? info
التفاسير:

external-link copy
2 : 78

عَنِ النَّبَاِ الْعَظِیْمِ ۟ۙ

२. त्या मोठ्या खबरीची? info
التفاسير:

external-link copy
3 : 78

الَّذِیْ هُمْ فِیْهِ مُخْتَلِفُوْنَ ۟ؕ

३. ज्याबाबत हे अनेक मत (विचार) राखतात. info
التفاسير:

external-link copy
4 : 78

كَلَّا سَیَعْلَمُوْنَ ۟ۙ

४. निश्चितपणे हे आताच जाणून घेतील. info
التفاسير:

external-link copy
5 : 78

ثُمَّ كَلَّا سَیَعْلَمُوْنَ ۟

५. पुन्हा निश्चितपणे त्यांना फार लवकर माहीत पडेल. info
التفاسير:

external-link copy
6 : 78

اَلَمْ نَجْعَلِ الْاَرْضَ مِهٰدًا ۟ۙ

६. काय आम्ही जमिनीला बिछाईत नाही बनविले? info
التفاسير:

external-link copy
7 : 78

وَّالْجِبَالَ اَوْتَادًا ۟ۙ

७. आणि पर्वतांना मेखा नाही बनविले? info
التفاسير:

external-link copy
8 : 78

وَّخَلَقْنٰكُمْ اَزْوَاجًا ۟ۙ

८. आणि आम्ही तुम्हाला जोडी जोडीने निर्माण केले. info
التفاسير:

external-link copy
9 : 78

وَّجَعَلْنَا نَوْمَكُمْ سُبَاتًا ۟ۙ

९. आणि आम्ही तुमच्या झोपेला तुमच्या आरामाचे कारण बनविले. info
التفاسير:

external-link copy
10 : 78

وَّجَعَلْنَا الَّیْلَ لِبَاسًا ۟ۙ

१०. आणि रात्रीला आम्ही पडदा (आवरण) बनविले. info
التفاسير:

external-link copy
11 : 78

وَّجَعَلْنَا النَّهَارَ مَعَاشًا ۟ۚ

११. आणि दिवसाला आम्ही रोजी प्राप्त करण्याचा समय बनविले. info
التفاسير:

external-link copy
12 : 78

وَبَنَیْنَا فَوْقَكُمْ سَبْعًا شِدَادًا ۟ۙ

१२. आणि तुमच्या वरती आम्ही सात मजबूत आकाश बनविले. info
التفاسير:

external-link copy
13 : 78

وَّجَعَلْنَا سِرَاجًا وَّهَّاجًا ۟ۙ

१३. आणि एक चकाकणारा तेजस्वी दीप निर्माण केला. info
التفاسير:

external-link copy
14 : 78

وَّاَنْزَلْنَا مِنَ الْمُعْصِرٰتِ مَآءً ثَجَّاجًا ۟ۙ

१४. आणि ढगांद्वारे आम्ही मुसळधार पर्जन्यवृष्टी केली. info
التفاسير:

external-link copy
15 : 78

لِّنُخْرِجَ بِهٖ حَبًّا وَّنَبَاتًا ۟ۙ

१५. यासाठी की त्याद्वारे अन्न (धान्य) आणि वनस्पती उगवाव्यात. info
التفاسير:

external-link copy
16 : 78

وَّجَنّٰتٍ اَلْفَافًا ۟ؕ

१६. आणि घनदाट बागाही (उगवाव्या). info
التفاسير:

external-link copy
17 : 78

اِنَّ یَوْمَ الْفَصْلِ كَانَ مِیْقَاتًا ۟ۙ

१७. निःसंशय, निर्णयाचा दिवस निर्धारीत आहे. info
التفاسير:

external-link copy
18 : 78

یَّوْمَ یُنْفَخُ فِی الصُّوْرِ فَتَاْتُوْنَ اَفْوَاجًا ۟ۙ

१८. ज्या दिवशी सूर (शंख) फुंकला जाईल, मग तुम्ही सर्व झुंडच्या झुंड बनून याल. info
التفاسير:

external-link copy
19 : 78

وَّفُتِحَتِ السَّمَآءُ فَكَانَتْ اَبْوَابًا ۟ۙ

१९. आणि आकाश उघडले जाईल, तेव्हा त्यात दारेच दारे बनतील. info
التفاسير:

external-link copy
20 : 78

وَّسُیِّرَتِ الْجِبَالُ فَكَانَتْ سَرَابًا ۟ؕ

२०. आणि पर्वत चालविले जातील, तेव्हा ते पांढरी वाळू बनतील. info
التفاسير:

external-link copy
21 : 78

اِنَّ جَهَنَّمَ كَانَتْ مِرْصَادًا ۟ۙ

२१. निःसंशय, जहन्नम टपून बसली आहे. info
التفاسير:

external-link copy
22 : 78

لِّلطَّاغِیْنَ مَاٰبًا ۟ۙ

२२. विद्रोही (उदंड) लोकांचे ठिकाण तेच आहे. info
التفاسير:

external-link copy
23 : 78

لّٰبِثِیْنَ فِیْهَاۤ اَحْقَابًا ۟ۚ

२३. त्यात ते युगानुयुगे (आणि शतके) पडून राहतील. info
التفاسير:

external-link copy
24 : 78

لَا یَذُوْقُوْنَ فِیْهَا بَرْدًا وَّلَا شَرَابًا ۟ۙ

२४. ना कधी त्यात शीतलतेची गोडी चाखतील, ना पाण्याची. info
التفاسير:

external-link copy
25 : 78

اِلَّا حَمِیْمًا وَّغَسَّاقًا ۟ۙ

२५. गरम (उकळते) पाणी आणि वाहत्या पू-खेरीज. info
التفاسير:

external-link copy
26 : 78

جَزَآءً وِّفَاقًا ۟ؕ

२६. (त्यांना) पूर्णपणे मोबदला मिळेल. info
التفاسير:

external-link copy
27 : 78

اِنَّهُمْ كَانُوْا لَا یَرْجُوْنَ حِسَابًا ۟ۙ

२७. त्यांना तर हिशोबाची आशाच नव्हती. info
التفاسير:

external-link copy
28 : 78

وَّكَذَّبُوْا بِاٰیٰتِنَا كِذَّابًا ۟ؕ

२८. ते निडरतेने आमच्या आयतींना खोटे ठरवित असत. info
التفاسير:

external-link copy
29 : 78

وَكُلَّ شَیْءٍ اَحْصَیْنٰهُ كِتٰبًا ۟ۙ

२९. आम्ही प्रत्येक गोष्ट लिहून सुरक्षित ठेवली आहे. info
التفاسير:

external-link copy
30 : 78

فَذُوْقُوْا فَلَنْ نَّزِیْدَكُمْ اِلَّا عَذَابًا ۟۠

३०. आता तुम्ही (आपल्या कर्मांचा) स्वाद चाखा. आम्ही तुमच्या शिक्षेतच वाढकरीत राहू. info
التفاسير:

external-link copy
31 : 78

اِنَّ لِلْمُتَّقِیْنَ مَفَازًا ۟ۙ

३१. निःसंशय, अल्लाहचे भय राखणाऱ्यांकरिता सफलता आहे. info
التفاسير:

external-link copy
32 : 78

حَدَآىِٕقَ وَاَعْنَابًا ۟ۙ

३२. बागा आहेत आणि द्राक्षे आहेत. info
التفاسير:

external-link copy
33 : 78

وَّكَوَاعِبَ اَتْرَابًا ۟ۙ

३३. आणि नवयुवती कुमारिका समवयस्क स्त्रिया आहेत. info
التفاسير:

external-link copy
34 : 78

وَّكَاْسًا دِهَاقًا ۟ؕ

३४. आणि भरून वाहणारे मद्याचे प्याले आहेत. info
التفاسير:

external-link copy
35 : 78

لَا یَسْمَعُوْنَ فِیْهَا لَغْوًا وَّلَا كِذّٰبًا ۟ۚۖ

३५. तिथे ना तर ते अश्लील गोष्टी ऐकतील आणि ना खोट्या गोष्टी ऐकतील. info
التفاسير:

external-link copy
36 : 78

جَزَآءً مِّنْ رَّبِّكَ عَطَآءً حِسَابًا ۟ۙ

३६. (त्यांना) तुमच्या पालनकर्त्यातर्फे (त्यांच्या सत्कर्मांचा) हा मोबदला मिळेल, जो फार मोठे बक्षीस असेल. info
التفاسير:

external-link copy
37 : 78

رَّبِّ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ وَمَا بَیْنَهُمَا الرَّحْمٰنِ لَا یَمْلِكُوْنَ مِنْهُ خِطَابًا ۟ۚ

३७. (त्या) पालनकर्त्यातर्फे मिळेल, जो आकाशांचा आणि जमिनीचा, आणि जे काही त्यांच्या दरम्यान आहे, त्या सर्वांचा स्वामी व पालनकर्ता आहे, आणि मोठा दयावान आहे. कोणालाही त्याच्याशी बोलण्याचा अधिकार नसेल. info
التفاسير:

external-link copy
38 : 78

یَوْمَ یَقُوْمُ الرُّوْحُ وَالْمَلٰٓىِٕكَةُ صَفًّا ۙۗؕ— لَّا یَتَكَلَّمُوْنَ اِلَّا مَنْ اَذِنَ لَهُ الرَّحْمٰنُ وَقَالَ صَوَابًا ۟

३८. ज्या दिवशी रुह (आत्मा) आणि फरिश्ते रांगा बांधून उभे असतील तेव्हा कोणी बोलू शकणार नाही, मात्र ज्याला अतिशय दयावान (रहमान) अनुमती देईल, आणि तो उचित गोष्ट तोंडातून काढील (बोलेल). info
التفاسير:

external-link copy
39 : 78

ذٰلِكَ الْیَوْمُ الْحَقُّ ۚ— فَمَنْ شَآءَ اتَّخَذَ اِلٰی رَبِّهٖ مَاٰبًا ۟

३९. हा दिवस सत्य आहे, आता ज्याची इच्छा असेल त्याने आपल्या पालनकर्त्याजवळ (सत्कर्मे करून) स्थान बनवावे. info
التفاسير:

external-link copy
40 : 78

اِنَّاۤ اَنْذَرْنٰكُمْ عَذَابًا قَرِیْبًا ۖۚ۬— یَّوْمَ یَنْظُرُ الْمَرْءُ مَا قَدَّمَتْ یَدٰهُ وَیَقُوْلُ الْكٰفِرُ یٰلَیْتَنِیْ كُنْتُ تُرٰبًا ۟۠

४०. आम्ही तुम्हाला निकट भविष्यात घडून येणाऱ्या शिक्षा यातनेचे भय दाखविले (आणि सावध केले) ज्या दिवशी मनुष्य आपल्या हातांनी केलेल्या कमाई (कर्मा) ला पाहील आणि काफिर म्हणेल की, मी माती झालो असतो तर (बरे झाले असते)! info
التفاسير: