કુરઆન મજીદના શબ્દોનું ભાષાંતર - મરાઠી ભાષામાં અનુવાદ - મુહમ્મદ શફીઅ અન્સારી

પેજ નંબર:close

external-link copy
13 : 67

وَاَسِرُّوْا قَوْلَكُمْ اَوِ اجْهَرُوْا بِهٖ ؕ— اِنَّهٗ عَلِیْمٌۢ بِذَاتِ الصُّدُوْرِ ۟

१३. आणि तुम्ही आपल्या गोष्टी अगदी हळू स्वरात बोला किंवा उंच आवाजात, तो तर छातीमध्ये (मनात लपलेल्या) गोष्टींनाही चांगल्या प्रकारे जाणतो. info
التفاسير:

external-link copy
14 : 67

اَلَا یَعْلَمُ مَنْ خَلَقَ ؕ— وَهُوَ اللَّطِیْفُ الْخَبِیْرُ ۟۠

१४. काय तोच नाही जाणणार, ज्याने निर्माण केले? मग तो सूक्ष्मदर्शी आणि खबर राखणाराही असावा. info
التفاسير:

external-link copy
15 : 67

هُوَ الَّذِیْ جَعَلَ لَكُمُ الْاَرْضَ ذَلُوْلًا فَامْشُوْا فِیْ مَنَاكِبِهَا وَكُلُوْا مِنْ رِّزْقِهٖ ؕ— وَاِلَیْهِ النُّشُوْرُ ۟

१५. तो, तोच आहे, ज्याने तुमच्यासाठी जमिनीला सखल (आणि कोमल) बनविले, यासाठी की तुम्ही तिच्या रस्त्यांवर येणे-जाणे करीत राहावे आणि तिने दिलेल्या जीविके (अन्न-सामुग्री) ला खावे-प्यावे. त्याच्याचकडे (तुम्हाला) जिवंत होऊन उठून उभे राहायचे आहे. info
التفاسير:

external-link copy
16 : 67

ءَاَمِنْتُمْ مَّنْ فِی السَّمَآءِ اَنْ یَّخْسِفَ بِكُمُ الْاَرْضَ فَاِذَا هِیَ تَمُوْرُ ۟ۙ

१६. काय तुम्ही या गोष्टीपासून निर्भय झालात की आकाशांच्या स्वामीने तुम्हाला जमिनीत धसवून टाकावे आणि जमीन अकस्मात थरथरावी. info
التفاسير:

external-link copy
17 : 67

اَمْ اَمِنْتُمْ مَّنْ فِی السَّمَآءِ اَنْ یُّرْسِلَ عَلَیْكُمْ حَاصِبًا ؕ— فَسَتَعْلَمُوْنَ كَیْفَ نَذِیْرِ ۟

१७. किंवा काय तुम्ही या गोष्टीपासून निर्भय झाला आहात की आकाशांच्या स्वामीने तुमच्यावर दगडांचा वर्षाव करावा? मग तर तुम्हाला कळूनच येईल की माझे भय दाखवणे कसे होते? info
التفاسير:

external-link copy
18 : 67

وَلَقَدْ كَذَّبَ الَّذِیْنَ مِنْ قَبْلِهِمْ فَكَیْفَ كَانَ نَكِیْرِ ۟

१८. आणि त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या लोकांनीही खोटे ठरविले होते, (तर पाहा) त्यांच्यावर माझा प्रकोप (अज़ाब) कसा झाला? info
التفاسير:

external-link copy
19 : 67

اَوَلَمْ یَرَوْا اِلَی الطَّیْرِ فَوْقَهُمْ صٰٓفّٰتٍ وَّیَقْبِضْنَ ؕۘؔ— مَا یُمْسِكُهُنَّ اِلَّا الرَّحْمٰنُ ؕ— اِنَّهٗ بِكُلِّ شَیْءٍ بَصِیْرٌ ۟

१९. काय हे कधी आपल्या वर पक्ष्यांना पंख पसरविताना आणि (कधी) मिटविताना पाहत नाहीत? त्यांना रहमान (अल्लाह) नेच (वातावरणात व आकाशात) आधार दिलेला आहे. निःसंशय, प्रत्येक गोष्ट त्याच्या नजरेत आहे. info
التفاسير:

external-link copy
20 : 67

اَمَّنْ هٰذَا الَّذِیْ هُوَ جُنْدٌ لَّكُمْ یَنْصُرُكُمْ مِّنْ دُوْنِ الرَّحْمٰنِ ؕ— اِنِ الْكٰفِرُوْنَ اِلَّا فِیْ غُرُوْرٍ ۟ۚ

२०. अल्लाहखेरीज तुमची कोणती सेना आहे, जी तुम्हाला मदत करू शकेल, काफिर (इन्कार करणारे) तर पूर्णतः धोक्यातच आहेत. info
التفاسير:

external-link copy
21 : 67

اَمَّنْ هٰذَا الَّذِیْ یَرْزُقُكُمْ اِنْ اَمْسَكَ رِزْقَهٗ ۚ— بَلْ لَّجُّوْا فِیْ عُتُوٍّ وَّنُفُوْرٍ ۟

२१. जर अल्लाह आपली रोजी रोखून घेईल तर (सांगा) कोण आहे जो तुम्हाला रोजी (जीविका) देईल? किंबहुना (काफिर) तर विद्रोह आणि सत्यापासून उद्विग्न होण्यावर अडून बसले आहेत. info
التفاسير:

external-link copy
22 : 67

اَفَمَنْ یَّمْشِیْ مُكِبًّا عَلٰی وَجْهِهٖۤ اَهْدٰۤی اَمَّنْ یَّمْشِیْ سَوِیًّا عَلٰی صِرَاطٍ مُّسْتَقِیْمٍ ۟

२२. काय तो मनुष्य अधिक मार्गदर्शनावर चालणारा आहे, जो तोंडघशी पडून चालत असावा की तो, जो सरळ (पायांवर) मार्गावर चालत असेल? info
التفاسير:

external-link copy
23 : 67

قُلْ هُوَ الَّذِیْۤ اَنْشَاَكُمْ وَجَعَلَ لَكُمُ السَّمْعَ وَالْاَبْصَارَ وَالْاَفْـِٕدَةَ ؕ— قَلِیْلًا مَّا تَشْكُرُوْنَ ۟

२३. सांगा की तोच (अल्लाह) आहे ज्याने तुम्हाला निर्माण केले आणि तुमचे कान, डोळे आणि हृदय बनविले, (परंतु) तुम्ही फार कमीच कृतज्ञता व्यक्त करता. info
التفاسير:

external-link copy
24 : 67

قُلْ هُوَ الَّذِیْ ذَرَاَكُمْ فِی الْاَرْضِ وَاِلَیْهِ تُحْشَرُوْنَ ۟

२४. सांगा की तोच आहे, ज्याने तुम्हाला धरतीवर (इतस्ततः) पसरविले, आणि त्याच्याचकडे तुम्ही एकत्रित केले जाल. info
التفاسير:

external-link copy
25 : 67

وَیَقُوْلُوْنَ مَتٰی هٰذَا الْوَعْدُ اِنْ كُنْتُمْ صٰدِقِیْنَ ۟

२५. आणि (काफिर) विचारतात की तो वायदा केव्हा प्रकट (पूर्ण) होईल, जर तुम्ही सच्चे असाल (तर सांगा)? info
التفاسير:

external-link copy
26 : 67

قُلْ اِنَّمَا الْعِلْمُ عِنْدَ اللّٰهِ ۪— وَاِنَّمَاۤ اَنَا نَذِیْرٌ مُّبِیْنٌ ۟

२६. (तुम्ही) सांगा की याचे ज्ञान तर केवळ अल्लाहलाच आहे. मी तर स्पष्टपणे खबरदार करणारा आहे. info
التفاسير: