કુરઆન મજીદના શબ્દોનું ભાષાંતર - મરાઠી ભાષામાં અનુવાદ - મુહમ્મદ શફીઅ અન્સારી

પેજ નંબર:close

external-link copy
34 : 4

اَلرِّجَالُ قَوّٰمُوْنَ عَلَی النِّسَآءِ بِمَا فَضَّلَ اللّٰهُ بَعْضَهُمْ عَلٰی بَعْضٍ وَّبِمَاۤ اَنْفَقُوْا مِنْ اَمْوَالِهِمْ ؕ— فَالصّٰلِحٰتُ قٰنِتٰتٌ حٰفِظٰتٌ لِّلْغَیْبِ بِمَا حَفِظَ اللّٰهُ ؕ— وَالّٰتِیْ تَخَافُوْنَ نُشُوْزَهُنَّ فَعِظُوْهُنَّ وَاهْجُرُوْهُنَّ فِی الْمَضَاجِعِ وَاضْرِبُوْهُنَّ ۚ— فَاِنْ اَطَعْنَكُمْ فَلَا تَبْغُوْا عَلَیْهِنَّ سَبِیْلًا ؕ— اِنَّ اللّٰهَ كَانَ عَلِیًّا كَبِیْرًا ۟

३४. पुरुष, स्त्रीवर शासक (आणि संरक्षक) आहे. या कारणास्तव की अल्लाहने एकाला दुसऱ्यावर श्रेष्ठत्व प्रदान केले आहे आणि या कारणास्तव की पुरुषांनी आपले धन खर्च केले आहे. यास्तव नेक, आज्ञाधारक स्त्रिया पतीच्या अनुपस्थितीत अल्लाहच्या संरक्षणाद्वारे धन-संपत्ती व शील-अब्रूचे रक्षण करतात आणि ज्या स्त्रियांपासून तुम्हाला अवज्ञेचे भय असेल त्यांना चांगली ताकीद करा, त्यांचे अंथरुण वेगळे करा (तरीही न मानतील) तर मारा आणि जर तुमचे म्हणणे मानून घेतील तर त्यांच्यावर दोषारोप ठेवण्याचे निमित्त शोधू नका. निःसंशय अल्लाह मोठा महान आहे. info
التفاسير:

external-link copy
35 : 4

وَاِنْ خِفْتُمْ شِقَاقَ بَیْنِهِمَا فَابْعَثُوْا حَكَمًا مِّنْ اَهْلِهٖ وَحَكَمًا مِّنْ اَهْلِهَا ۚ— اِنْ یُّرِیْدَاۤ اِصْلَاحًا یُّوَفِّقِ اللّٰهُ بَیْنَهُمَا ؕ— اِنَّ اللّٰهَ كَانَ عَلِیْمًا خَبِیْرًا ۟

३५. जर तुम्हाला (पती-पत्नीमध्ये) मनमुटाव होण्याची भीती असेल तर एक न्याय करणारा पंच, पतीच्या कुटुंबातर्फे आणि एक पत्नीच्या कुटुंबातर्फे ठरवून घ्या. जर हे दोघे समझोता घडवून आणू इच्छितील तर अल्लाह त्या दोघांचा मिलाप करील. निःसंशय, अल्लाह जाणणारा, खबर राखणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
36 : 4

وَاعْبُدُوا اللّٰهَ وَلَا تُشْرِكُوْا بِهٖ شَیْـًٔا وَّبِالْوَالِدَیْنِ اِحْسَانًا وَّبِذِی الْقُرْبٰی وَالْیَتٰمٰی وَالْمَسٰكِیْنِ وَالْجَارِ ذِی الْقُرْبٰی وَالْجَارِ الْجُنُبِ وَالصَّاحِبِ بِالْجَنْۢبِ وَابْنِ السَّبِیْلِ ۙ— وَمَا مَلَكَتْ اَیْمَانُكُمْ ؕ— اِنَّ اللّٰهَ لَا یُحِبُّ مَنْ كَانَ مُخْتَالًا فَخُوْرَا ۟ۙ

३६. आणि अल्लाहची उपासना करा. त्याच्यासह दुसऱ्या कोणाला सहभागी करू नका आणि आई-बाप, नातेवाईक, अनाथ, गरीब दुबळे, जवळचे शेजारी, दूरचे शेजारी आणि सोबत असलेल्या प्रवाशांसीी भलेपणाचे, उपकाराचे वर्तन करा, तसेच प्रवाशी आणि तुमच्या ताब्यात असेलल्यांशीही. निःसंशय अल्लाह ऐट दाखविणाऱ्या घमेंडीशी प्रेम राखत नाही. info
التفاسير:

external-link copy
37 : 4

١لَّذِیْنَ یَبْخَلُوْنَ وَیَاْمُرُوْنَ النَّاسَ بِالْبُخْلِ وَیَكْتُمُوْنَ مَاۤ اٰتٰىهُمُ اللّٰهُ مِنْ فَضْلِهٖ ؕ— وَاَعْتَدْنَا لِلْكٰفِرِیْنَ عَذَابًا مُّهِیْنًا ۟ۚ

३७. जे लोक स्वतः कंजूषपणा करतात आणि इतरांनाही कंजूषपणा करण्यास सांगतात आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहने, जे आपल्या कृपेने त्यांना प्रदान केले आहे, ते लपवितात, तर आम्ही अशा कृतघ्न लोकांसाठी अपमानदायक अज़ाब (शिक्षा-यातना) तयार करून ठेवला आहे. info
التفاسير: