કુરઆન મજીદના શબ્દોનું ભાષાંતર - મરાઠી ભાષામાં અનુવાદ - મુહમ્મદ શફીઅ અન્સારી

પેજ નંબર: 395:385 close

external-link copy
85 : 28

اِنَّ الَّذِیْ فَرَضَ عَلَیْكَ الْقُرْاٰنَ لَرَآدُّكَ اِلٰی مَعَادٍ ؕ— قُلْ رَّبِّیْۤ اَعْلَمُ مَنْ جَآءَ بِالْهُدٰی وَمَنْ هُوَ فِیْ ضَلٰلٍ مُّبِیْنٍ ۟

८५. ज्या (अल्लाह) ने तुमच्यावर कुरआन अवतरित केले आहे तो तुम्हाला दुसऱ्यांदा पहिल्या स्थानावर आणणार आहे. सांगा, माझा पालनकर्ता त्यालाही चांगल्या प्रकारे जाणतो, त्याने मार्गदर्शन प्राप्त केले आहे, आणि त्यालाही जो उघड मार्गभ्रष्टतेत पडला आहे. info
التفاسير:

external-link copy
86 : 28

وَمَا كُنْتَ تَرْجُوْۤا اَنْ یُّلْقٰۤی اِلَیْكَ الْكِتٰبُ اِلَّا رَحْمَةً مِّنْ رَّبِّكَ فَلَا تَكُوْنَنَّ ظَهِیْرًا لِّلْكٰفِرِیْنَ ۟ؗ

८६. आणि तुम्ही कधीही विचारही केला नव्हता की तुमच्यावर ग्रंथ अवतरित केला जाईल, परंतु हा तुमच्या पालनकर्त्याच्या दया कृपेने (अवतरित झाला) आता तुम्ही कधीही काफिरांचे सहाय्यक होऊ नये. info
التفاسير:

external-link copy
87 : 28

وَلَا یَصُدُّنَّكَ عَنْ اٰیٰتِ اللّٰهِ بَعْدَ اِذْ اُنْزِلَتْ اِلَیْكَ وَادْعُ اِلٰی رَبِّكَ وَلَا تَكُوْنَنَّ مِنَ الْمُشْرِكِیْنَ ۟ۚ

८७. (लक्षात ठेवा) या काफिरांनी तुम्हाला, अल्लाहच्या आयतींचा प्रचार करण्यापासून रोखू नये, यानंतर की त्या तुमच्यावर अवतरित केल्या जाण्यात. तेव्हा आपल्या पालनकर्त्याकडे बोलवित राहा, आणि अनेकेश्वरवादी लोकांपैकी होऊ नका. info
التفاسير:

external-link copy
88 : 28

وَلَا تَدْعُ مَعَ اللّٰهِ اِلٰهًا اٰخَرَ ۘ— لَاۤ اِلٰهَ اِلَّا هُوَ ۫— كُلُّ شَیْءٍ هَالِكٌ اِلَّا وَجْهَهٗ ؕ— لَهُ الْحُكْمُ وَاِلَیْهِ تُرْجَعُوْنَ ۟۠

८८. आणि अल्लाहच्या सोबत दुसऱ्या एखाद्या दैवताला पुकारू नका.१ अल्लाहखेरीज दुसरा कोणीही उपासना करण्या योग्य नाही. प्रत्येक वस्तू नाश पावणार आहे, परंतु त्याचे मुख,२ त्याचेच शासन आहे आणि तुम्ही त्याच्याचकडे परतविले जाल. info

(१) अर्थात अन्य कोणाचीही भक्ती- आराधना करू नका. ना दुअ- प्रार्थनेद्वारे ना भोग- प्रसाद- नवस- नजराण्याने, ना कुर्बानीद्वारे, कारण हे सर्व उपासना प्रकार आहेत, जे केवळ एक अल्लाहकरिता खास आहे. पवित्र कुरआनात अनेक ठिकाणी अल्लाहखेरीज दुसऱ्या कोणाच्या उपासनेला ‘पुकारणे’ म्हटले गेले आहे, ज्याचा उद्देश याच गोष्टीला स्पष्ट करणे आहे की अल्लाहखेरीज दुसऱ्या कोणाला माध्यमांच्या पलीकडे मानून पुकारणे त्यांच्याकडे मदत मागणे, गाऱ्हाणे मांडणे, आर्जव आणि दुआ- प्रार्थना करणे हे सर्व त्यांची उपासना करणेच होय, ज्याद्वारे मनुष्य अनेकेश्वरवादी बनतो. (२) ‘त्याचे मुख’शी अभिप्रेत अल्लाह होय. अंश सांगून समग्र अभिप्रेत आहे. अर्थात अल्लाहखेरीज प्रत्येक वस्तू नाश पावणार आहे (सजीव असो की निर्जीव) ‘कुल्लु मन्‌ अलैहा फ़ानिव्‌ व यब्क़ा वज्हु रब्बि-क जुल्जलालि वल-इक्राम.’ ‘‘धरतीवर जेवढे म्हणून आहेत, सर्व नाश पावणार आहेत. केवळ तुझ्या पालनकर्त्याचे मुख, जो मोठी महानता आणि प्रतिष्ठा बाळगणारा आहे, तोच बाकी राहील.’’ (सूरह रहमान-२६,२७)

التفاسير: