કુરઆન મજીદના શબ્દોનું ભાષાંતર - મરાઠી ભાષામાં અનુવાદ - મુહમ્મદ શફીઅ અન્સારી

અર્ રઅદ

external-link copy
1 : 13

الٓمّٓرٰ ۫— تِلْكَ اٰیٰتُ الْكِتٰبِ ؕ— وَالَّذِیْۤ اُنْزِلَ اِلَیْكَ مِنْ رَّبِّكَ الْحَقُّ وَلٰكِنَّ اَكْثَرَ النَّاسِ لَا یُؤْمِنُوْنَ ۟

१. आलिफ.लाम.मीम.रॉ. या कुरआनाच्या आयती आहेत आणि तुमच्या पालनकर्त्यातर्फे जे काही तुमच्याकडे उतरविले गेले आहेत ते सर्व सत्य आहे, परंतु अधिकांश लोक ईमान राखत नाहीत (विश्वास बाळगत नाही). info
التفاسير:

external-link copy
2 : 13

اَللّٰهُ الَّذِیْ رَفَعَ السَّمٰوٰتِ بِغَیْرِ عَمَدٍ تَرَوْنَهَا ثُمَّ اسْتَوٰی عَلَی الْعَرْشِ وَسَخَّرَ الشَّمْسَ وَالْقَمَرَ ؕ— كُلٌّ یَّجْرِیْ لِاَجَلٍ مُّسَمًّی ؕ— یُدَبِّرُ الْاَمْرَ یُفَصِّلُ الْاٰیٰتِ لَعَلَّكُمْ بِلِقَآءِ رَبِّكُمْ تُوْقِنُوْنَ ۟

२. अल्लाह तो आहे, ज्याने आकाशांना खांबांविना उंच राखले आहे की तुम्ही पाहत आहात, मग तो अर्श (ईशसिंहासना) वर स्थिर आहे, त्यानेच सूर्य आणि चंद्राला अधीन करून ठेवले आहे. प्रत्येक निर्धारीत वेळेवर चालत आहे. तोच सर्व कामाची व्यवस्था राखतो. तो आपल्या निशाण्यांचे स्पष्टपणे निवेदन करीत आहे. यासाठी की तुम्ही आपल्या पालनकर्त्याशी भेट होण्यावर विश्वास करावा. info
التفاسير:

external-link copy
3 : 13

وَهُوَ الَّذِیْ مَدَّ الْاَرْضَ وَجَعَلَ فِیْهَا رَوَاسِیَ وَاَنْهٰرًا ؕ— وَمِنْ كُلِّ الثَّمَرٰتِ جَعَلَ فِیْهَا زَوْجَیْنِ اثْنَیْنِ یُغْشِی الَّیْلَ النَّهَارَ ؕ— اِنَّ فِیْ ذٰلِكَ لَاٰیٰتٍ لِّقَوْمٍ یَّتَفَكَّرُوْنَ ۟

३. आणि त्यानेच जमिनीला पसरवून दिले आहे आणि तिच्यात पर्वत आणि नद्या निर्माण केल्या आहेत आणि त्यात प्रत्येक प्रकारच्या फळांच्या जोड्या दुहेरी निर्माण केल्या आहेत. तो रात्रीने दिवसाला लपवितो, निश्चितच विचार चिंतन करणाऱ्यांसाठी यात अनेक निशाण्या (बोधचिन्हे) आहेत. info
التفاسير:

external-link copy
4 : 13

وَفِی الْاَرْضِ قِطَعٌ مُّتَجٰوِرٰتٌ وَّجَنّٰتٌ مِّنْ اَعْنَابٍ وَّزَرْعٌ وَّنَخِیْلٌ صِنْوَانٌ وَّغَیْرُ صِنْوَانٍ یُّسْقٰی بِمَآءٍ وَّاحِدٍ ۫— وَنُفَضِّلُ بَعْضَهَا عَلٰی بَعْضٍ فِی الْاُكُلِ ؕ— اِنَّ فِیْ ذٰلِكَ لَاٰیٰتٍ لِّقَوْمٍ یَّعْقِلُوْنَ ۟

४. आणि जमिनीत अनेक प्रकारचे तुकडे एकमेकांशी मिळते जुळते आहेत, आणि द्राक्षांच्या बागा आहेत आणि शेते आहेत आणि फांद्या असलेली खजुरीची झाडे आहेत आणि काही असे आहेत ज्यांना फांद्या नाहीत. सर्वांना एकाच प्रकारचे पाणी दिले जाते, तरीही आम्ही एकावर एकाला फळांमध्ये श्रेष्ठता प्रदान करतो. यात बुद्धिमान लोकांकरिता अनेक निशाण्या आहेत. info
التفاسير:

external-link copy
5 : 13

وَاِنْ تَعْجَبْ فَعَجَبٌ قَوْلُهُمْ ءَاِذَا كُنَّا تُرٰبًا ءَاِنَّا لَفِیْ خَلْقٍ جَدِیْدٍ ؕ۬— اُولٰٓىِٕكَ الَّذِیْنَ كَفَرُوْا بِرَبِّهِمْ ۚ— وَاُولٰٓىِٕكَ الْاَغْلٰلُ فِیْۤ اَعْنَاقِهِمْ ۚ— وَاُولٰٓىِٕكَ اَصْحٰبُ النَّارِ ۚ— هُمْ فِیْهَا خٰلِدُوْنَ ۟

५. आणि जर तुम्हाला नवल वाटत असेल तर खरोखर त्यांचे हे म्हणणे आश्चर्यकारक आहे की काय जेव्हा आम्ही (मेल्यानंतर) माती होऊन जाऊ तेव्हा काय आम्ही नव्याने जन्म घेऊ? हेच ते लोक होत, ज्यांनी आपल्या पालनकर्त्याशी इन्कार केला आणि हेच ते लोक होत, ज्यांच्या गळ्यात जोखड (फंदे) असतील आणि हेच होत जे जहन्नममध्ये राहणारे आहेत, जे सदैव त्यात राहतील. info
التفاسير: