(१) हदीसमध्ये याचे स्पष्टीकरण अशा प्रकारे आहे की कयामतच्या दिवशी अल्लाह एका ईमानधारकाकडून त्याचे अपराध कबूल करून घेईल की तुला माहीत आहे की तू अमुक एक अपराध केला होता. तो म्हणेल, हो बरोबर आहे. मग अल्लाह फर्माविल की मी त्या अपराधांवर जगात आवरण घातले होते, तेव्हा आजही त्यांना क्षमा करतो. थथापि इतर लोक किंवा काफिरांचा मामला असा असेल की त्यांना साक्ष देणाऱ्यांसमोर पुकारले जाईल आणि साक्ष देणारे साक्ष देतील की हेच ते लोक होते, ज्यांनी आपल्या पालनकर्त्याबाबत खोटे रचले होते. (सहीह बुखारी - तफसीर सूरह हूद)