Firo maanaaji al-quraan tedduɗo oo - Eggo e haala Marathi - Muhammad Shafee Ansari.

Tonngoode hello ngoo:close

external-link copy
14 : 72

وَّاَنَّا مِنَّا الْمُسْلِمُوْنَ وَمِنَّا الْقٰسِطُوْنَ ؕ— فَمَنْ اَسْلَمَ فَاُولٰٓىِٕكَ تَحَرَّوْا رَشَدًا ۟

१४. आणि आमच्यापैकी काही मुस्लिम आहेत तर काही अन्यायी आहे, तेव्हा जे मुस्लिम झाले, त्यांनी सन्मार्ग शोधून घेतला. info
التفاسير:

external-link copy
15 : 72

وَاَمَّا الْقٰسِطُوْنَ فَكَانُوْا لِجَهَنَّمَ حَطَبًا ۟ۙ

१५. आणि जे अत्याचारी आहेत, ते जहन्नमचे इंधन बनले. info
التفاسير:

external-link copy
16 : 72

وَّاَنْ لَّوِ اسْتَقَامُوْا عَلَی الطَّرِیْقَةِ لَاَسْقَیْنٰهُمْ مَّآءً غَدَقًا ۟ۙ

१६. आणि हे की जर हे लोक सरळ मार्गावर दृढपणे राहिले असते, तर अवश्य आम्ही त्यांना भरपूर पाणी पाजले असते. info
التفاسير:

external-link copy
17 : 72

لِّنَفْتِنَهُمْ فِیْهِ ؕ— وَمَنْ یُّعْرِضْ عَنْ ذِكْرِ رَبِّهٖ یَسْلُكْهُ عَذَابًا صَعَدًا ۟ۙ

१७. यासाठी की आम्ही यात त्यांची परीक्षा घ्यावी आणि जो मनुष्य आपल्या पालनकर्त्याच्या स्मरणापासून तोंड फिरविल, तर अल्लाह त्याला कठोर शिक्षा - यातनेत टाकील. info
التفاسير:

external-link copy
18 : 72

وَّاَنَّ الْمَسٰجِدَ لِلّٰهِ فَلَا تَدْعُوْا مَعَ اللّٰهِ اَحَدًا ۟ۙ

१८. आणि हे की मस्जिद केवळ अल्लाहच्याचकरिता (खास) आहेत. तेव्हा अल्लाहसोबत दुसऱ्या कोणाला पुकारु नका.१ info

(१) ‘मसजिद’चा अर्थ सजदा करण्याचे स्थान. सजदा नमाजचा एक स्तंभ (अनिवार्य कृती) आहे. यास्तव नमाज पढण्याच्या ठिकाणास मस्जिद म्हणतात. आयतीचा अर्थ स्पष्ट आहे की मस्जिदीचा उद्देश केवळ एक अल्लाहची उपासना होय. यास्तव मस्जिदींमध्ये दुसऱ्या कोणाची उपासना, दुसऱ्या कोणाला दुआ (प्रार्थना), आर्जव, गाऱ्हाणे किंवा त्यास मदतीसाठी पुकारणे वैध नाही. जर इथेही अल्लाहखेरीज दुसऱ्या कोणाला पुकारले जाऊ लागले तर हे फार वाईट आणि मोठे अत्याचाराचे कृत्य ठरेल. परंतु दुर्दैवाने नामधारी मुसलमान आता मस्जिदींमध्येही अल्लाहसोबत इतरांना मदतीसाठी पुकारतात किंबहुना मस्जिदीत असे शिलालेख (तक्ते) लावून ठेवले आहेत की ज्यात अल्लाहला सोडून दुसऱ्यांना मदतीसाठी पुकारले गेले आहे.

التفاسير:

external-link copy
19 : 72

وَّاَنَّهٗ لَمَّا قَامَ عَبْدُ اللّٰهِ یَدْعُوْهُ كَادُوْا یَكُوْنُوْنَ عَلَیْهِ لِبَدًا ۟ؕ۠

१९. आणि जेव्हा अल्लाहचा दास (उपासक) त्याच्या उपासनेसाठी उभा राहिला तेव्हा निकट होते की ते जमावाजमावाने त्याच्यावर तुटून पडावेत. १ info

(१) ‘अब्दुल्लाह’ (अल्लाहचा दास) शी अभिप्रेत पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम होत. अर्थात जिन्न आणि मानव दोघे मिळून इच्छितात की अल्लाहचे हे दिव्य तेज (नूर) आपल्या फुंकींनी विझवावे. याचे दुसरेही अर्थ सांगितले गेले आहेत, परंतु इमाम इब्ने कसीर यांनी उपरोक्त अर्थास प्राधान्य दिले आहे.

التفاسير:

external-link copy
20 : 72

قُلْ اِنَّمَاۤ اَدْعُوْا رَبِّیْ وَلَاۤ اُشْرِكُ بِهٖۤ اَحَدًا ۟

२०. (तुम्ही) सांगा की, मी तर केवळ आपल्या पालनकर्त्यास पुकारतो आणि त्याच्यासोबत दुसऱ्या कोणाला सहभागी बनवित नाही. info
التفاسير:

external-link copy
21 : 72

قُلْ اِنِّیْ لَاۤ اَمْلِكُ لَكُمْ ضَرًّا وَّلَا رَشَدًا ۟

२१. सांगा, मला तुमच्या बाबतीत कसल्याही लाभ-हानीचा अधिकार नाही. info
التفاسير:

external-link copy
22 : 72

قُلْ اِنِّیْ لَنْ یُّجِیْرَنِیْ مِنَ اللّٰهِ اَحَدٌ ۙ۬— وَّلَنْ اَجِدَ مِنْ دُوْنِهٖ مُلْتَحَدًا ۟ۙ

२२. सांगा की मला अल्लाहपासून कधीही कोणी वाचवू शकत नाही, आणि मी कधीही त्याच्याखेरीज एखादे आश्रयस्थान प्राप्त करू शकत नाही. info
التفاسير:

external-link copy
23 : 72

اِلَّا بَلٰغًا مِّنَ اللّٰهِ وَرِسٰلٰتِهٖ ؕ— وَمَنْ یَّعْصِ اللّٰهَ وَرَسُوْلَهٗ فَاِنَّ لَهٗ نَارَ جَهَنَّمَ خٰلِدِیْنَ فِیْهَاۤ اَبَدًا ۟ؕ

२३. तथापि (माझे काम) तर केवळ अल्लाहची वाणी आणि त्याचा संदेश (लोकांना) पोहचविणे आहे (आता) जो देखील अल्लाह आणि त्याच्या पैगंबराची अवज्ञा करील तर त्याच्यासाठी जहन्नमची आग आहे, जिच्यात असे लोक सदैव राहतील. info
التفاسير:

external-link copy
24 : 72

حَتّٰۤی اِذَا رَاَوْا مَا یُوْعَدُوْنَ فَسَیَعْلَمُوْنَ مَنْ اَضْعَفُ نَاصِرًا وَّاَقَلُّ عَدَدًا ۟

२४. येथेपर्यंत की, जेव्हा ते तिला पाहून घेतील, जिचा त्यांना वायदा दिला जात आहे, तेव्हा निकट भविष्यात जाणून घेतील की कोणाचा सहाय्यक कमजोर आणि कोणाचा समूह (संख्येने) कमी आहे. info
التفاسير:

external-link copy
25 : 72

قُلْ اِنْ اَدْرِیْۤ اَقَرِیْبٌ مَّا تُوْعَدُوْنَ اَمْ یَجْعَلُ لَهٗ رَبِّیْۤ اَمَدًا ۟

२५. (तुम्ही) सांगा की मला नाही माहीत की ज्या गोष्टीचा वायदा तुमच्याशी केला जात आहे, ती जवळ आहे की माझा पालनकर्ता त्याकरिता लांबची मुदत निर्धारित करील. info
التفاسير:

external-link copy
26 : 72

عٰلِمُ الْغَیْبِ فَلَا یُظْهِرُ عَلٰی غَیْبِهٖۤ اَحَدًا ۟ۙ

२६. तोच परोक्ष ज्ञाता आहे आणि आपल्या परोक्ष (ज्ञाना) ने तो कोणालाही अवगत करवित नाही. info
التفاسير:

external-link copy
27 : 72

اِلَّا مَنِ ارْتَضٰی مِنْ رَّسُوْلٍ فَاِنَّهٗ یَسْلُكُ مِنْ بَیْنِ یَدَیْهِ وَمِنْ خَلْفِهٖ رَصَدًا ۟ۙ

२७. मात्र त्या रसूल (पैगंबरा) खेरीज, ज्याला तो पसंत करील,१ यासाठी की त्याच्याही पुढे - मागे पहारेकरी (संरक्षक) तैनात करतो. info

(१) अर्थात आपल्या पैगंबराला काही परोक्ष गोष्टींची खबर करवितो, ज्याचा संबंध एकतर संदेश पोहचविण्याशी असतो किंवा त्याच्या रसूल होणअयाचे पुरावे असतात. उघड आहे की अल्लाहद्वारे सूचित केल्याने रसूल गैब (परोक्ष) चा जाणणारा ठरू शकत नाही, कारण जर स्वतः पैगंबरालाही गैबचे ज्ञान असते, तर अल्लाहतर्फे त्याला गैबच्या गोष्टींची खबर देण्याची गरजच काय? अल्लाह आपले परोक्ष ज्ञान त्याच वेळी आपल्या रसूलवर प्रकट करतो, जेव्हा तो ते पहिल्यापासून जाणत नसतो, अर्थात हे निर्विवाद सत्य आहे की गैब (परोक्ष) ज्ञान केवळ अल्लाहलाच आहे. जसे की या ठिकाणी स्पष्टतः सांगितले गेले आहे.

التفاسير:

external-link copy
28 : 72

لِّیَعْلَمَ اَنْ قَدْ اَبْلَغُوْا رِسٰلٰتِ رَبِّهِمْ وَاَحَاطَ بِمَا لَدَیْهِمْ وَاَحْصٰی كُلَّ شَیْءٍ عَدَدًا ۟۠

२८. यासाठी की हे कळून घ्यावे की त्यांनी आपल्या पालनकर्त्याचे संदेश पोहचविलेत. अल्लाहने त्यांच्या निकटच्या गोष्टींना घेरून ठेवले आहे आणि प्रत्येक गोष्टीची गणना करून ठेवली आहे. info
التفاسير: