Firo maanaaji al-quraan tedduɗo oo - Eggo e haala Marathi - Muhammad Shafee Ansari.

external-link copy
27 : 7

یٰبَنِیْۤ اٰدَمَ لَا یَفْتِنَنَّكُمُ الشَّیْطٰنُ كَمَاۤ اَخْرَجَ اَبَوَیْكُمْ مِّنَ الْجَنَّةِ یَنْزِعُ عَنْهُمَا لِبَاسَهُمَا لِیُرِیَهُمَا سَوْاٰتِهِمَا ؕ— اِنَّهٗ یَرٰىكُمْ هُوَ وَقَبِیْلُهٗ مِنْ حَیْثُ لَا تَرَوْنَهُمْ ؕ— اِنَّا جَعَلْنَا الشَّیٰطِیْنَ اَوْلِیَآءَ لِلَّذِیْنَ لَا یُؤْمِنُوْنَ ۟

२७. हे आदमच्या पुत्रांनो! तुम्हाला सैतानाने बहकवून न द्यावे, जसे तुमच्या माता-पित्याला जन्नतमधून बाहेर घालिवले. त्याने त्यांचे वस्त्र उतरवून दिले, यासाठी की त्यांना त्यांची गुप्तांगे दाखवावीत. निःसंशय तो आणि त्याचे जातीबांधव तुम्हाला अशा ठिकाणाहून पाहतात की तुम्ही त्यांना पाहू शकत नाही. आम्ही सैतानांना अशा लोकांचे मित्र बनविले, जे ईमान (विश्वास) राखत नाही.१ info

(१) अर्थात ज्यांच्या अंगी ईमान नाही, तेच सैतानाचे मित्र आहेत. विशेषतः ते सैतानाच्या कट कारस्थानांना बळी पडतात. तरीदेखील ईमान राखणाऱ्यांना तो भुरळ पाडण्याचा प्रयत्न करीत राहतो, काहीच न जमल्यास छुपे शिर्क (दिखावटी सत्कर्म) आणि खुला शिर्क (अनेकेश्वरोपासना) मध्ये मग्न करतो आणि अशा प्रकारे तो त्यांना खऱ्या ईमानाच्या पूंजीपासून वंचित ठेवतो.

التفاسير: