Firo maanaaji al-quraan tedduɗo oo - Eggo e haala Marathi - Muhammad Shafee Ansari.

external-link copy
3 : 6

وَهُوَ اللّٰهُ فِی السَّمٰوٰتِ وَفِی الْاَرْضِ ؕ— یَعْلَمُ سِرَّكُمْ وَجَهْرَكُمْ وَیَعْلَمُ مَا تَكْسِبُوْنَ ۟

३. आणि तोच अल्लाह आहे आकाशांमध्ये आणि जमिनीवर. तो तुमचे गुप्त भेद व जाहीर सर्व काही जाणतो आणि तुमच्या कमाईला जाणून आहे.१ info

(१) ‘अहले सुन्नत’ अर्थात ‘सलफ’ची श्रद्धा आहे की अल्लाह स्वतः अर्शवर आहे. जसा तो प्रशंसनीय आहे. परंतु आपल्या ज्ञानाच्या आधारे तो सर्व ठिकाणी आहे. अर्थात त्याच्या ज्ञानकक्षेच्या बाहेर काहीही नाही. तथापि काही लोकांच्या मते तो अर्शवर नाही तर सर्व ठिकाणी आहे आणि ते या आयतीद्वआरे आपल्या धारणेचे(आकिदा) समर्थन करतात की ती शक्ती जिला आकाशांमध्ये व धरतीवर ‘अल्लाह’ म्हणून पुकारतात आणि आकाशांमध्ये व धरतीवर जिची राज्यसत्ता आहे. आणि या दोन्ही ठिकाणी जिला उपास्य समजले जाते ती शक्ती अर्थात अल्लाह तुमचे प्रकट-अप्रकट सर्व कर्म चांगल्या प्रकारे जाणतो. (फतहुल कदीर) याचे दुसरे प्रमाणही प्रस्तुत केले गेले आहे, जे धर्माचे सखोल ज्ञान बाळगणाऱ्या विद्वानांच्या भाष्यात आढळते. उदा. ‘तफसीर तबरी’ आणि ‘इब्ने कसीर’ वगैरे.

التفاسير: