Firo maanaaji al-quraan tedduɗo oo - Eggo e haala Marathi - Muhammad Shafee Ansari.

Tonngoode hello ngoo:close

external-link copy
42 : 5

سَمّٰعُوْنَ لِلْكَذِبِ اَكّٰلُوْنَ لِلسُّحْتِ ؕ— فَاِنْ جَآءُوْكَ فَاحْكُمْ بَیْنَهُمْ اَوْ اَعْرِضْ عَنْهُمْ ۚ— وَاِنْ تُعْرِضْ عَنْهُمْ فَلَنْ یَّضُرُّوْكَ شَیْـًٔا ؕ— وَاِنْ حَكَمْتَ فَاحْكُمْ بَیْنَهُمْ بِالْقِسْطِ ؕ— اِنَّ اللّٰهَ یُحِبُّ الْمُقْسِطِیْنَ ۟

४२. हे कान लावून खोट्या गोष्टी ऐकणारे आणि मन तृप्त होईपर्यंत हराम खाणारे आहेत. जर हे तुमच्याजवळ येतील तर तुम्हाला अधिकार आहे, वाटल्यास त्यांच्या दरम्यान फैसला करा, वाटल्यास करू नका. जर तुम्ही त्यांच्यापासून तोड फिरवूनही घ्याल तरीही ते तुम्हाला कसलेही नुकसान पोहचवू शकत नाही आणि जर तुम्ही फैसला कराल तर त्यांच्या दरम्यान न्यायासह फैसला करा. निःसंशय, न्याय करणाऱ्यांशी अल्लाह प्रेम राखतो. info
التفاسير:

external-link copy
43 : 5

وَكَیْفَ یُحَكِّمُوْنَكَ وَعِنْدَهُمُ التَّوْرٰىةُ فِیْهَا حُكْمُ اللّٰهِ ثُمَّ یَتَوَلَّوْنَ مِنْ بَعْدِ ذٰلِكَ ؕ— وَمَاۤ اُولٰٓىِٕكَ بِالْمُؤْمِنِیْنَ ۟۠

४३. आणि (आश्चर्याची गोष्ट अशी की) स्वतःजवळ तौरात असताना, ज्यात अल्लाहचा आदेश आहे, ते कसे तुम्हाला फैसला करणारा बनवितात, मग त्यानंतर आदेश मानण्याचे टाळतात. वास्तविक हे लोक (खऱ्या अर्थाने) ईमानधारक नाहीत. info
التفاسير:

external-link copy
44 : 5

اِنَّاۤ اَنْزَلْنَا التَّوْرٰىةَ فِیْهَا هُدًی وَّنُوْرٌ ۚ— یَحْكُمُ بِهَا النَّبِیُّوْنَ الَّذِیْنَ اَسْلَمُوْا لِلَّذِیْنَ هَادُوْا وَالرَّبّٰنِیُّوْنَ وَالْاَحْبَارُ بِمَا اسْتُحْفِظُوْا مِنْ كِتٰبِ اللّٰهِ وَكَانُوْا عَلَیْهِ شُهَدَآءَ ۚ— فَلَا تَخْشَوُا النَّاسَ وَاخْشَوْنِ وَلَا تَشْتَرُوْا بِاٰیٰتِیْ ثَمَنًا قَلِیْلًا ؕ— وَمَنْ لَّمْ یَحْكُمْ بِمَاۤ اَنْزَلَ اللّٰهُ فَاُولٰٓىِٕكَ هُمُ الْكٰفِرُوْنَ ۟

४४. आम्ही तौरात आवतरीत केली, ज्यात मार्गदर्शन आणि नूर (दिव्य प्रकाश) आहे. यहूदी लोकांमध्ये याच तौरातद्वारे अल्लाहला मानणारे पैगंबर आणि अल्लाहवाले आणि धर्मज्ञानी लोक फैसला करीत असत कारण त्यांना अल्लाहच्या या ग्रंथाचे रक्षण करण्याचा आदेश दिला गेला होता आणि ते यावर स्वीकारणारे साक्षी होते. आता तुम्ही लोकांचे भय बाळगू नका, किंबहुना माझे भय बाळगा. माझ्या आयतींना थोड्याशा किंमतीवर विकू नका आणि जो, अल्लाहने अवतरीत केलेल्या संदेशा (वहयी) च्या आधारावर फैसला न करील तर असे लोक पुरेपूर काफीर आहेत. info
التفاسير:

external-link copy
45 : 5

وَكَتَبْنَا عَلَیْهِمْ فِیْهَاۤ اَنَّ النَّفْسَ بِالنَّفْسِ ۙ— وَالْعَیْنَ بِالْعَیْنِ وَالْاَنْفَ بِالْاَنْفِ وَالْاُذُنَ بِالْاُذُنِ وَالسِّنَّ بِالسِّنِّ ۙ— وَالْجُرُوْحَ قِصَاصٌ ؕ— فَمَنْ تَصَدَّقَ بِهٖ فَهُوَ كَفَّارَةٌ لَّهٗ ؕ— وَمَنْ لَّمْ یَحْكُمْ بِمَاۤ اَنْزَلَ اللّٰهُ فَاُولٰٓىِٕكَ هُمُ الظّٰلِمُوْنَ ۟

४५. आणि आम्ही (तौरातमध्ये) यहूदींच्या हक्कात ही गोष्ट निर्धारीत केली की जीवाच्या बदल्यात जीव, आणि डोळ्याच्या बदल्यात डोळा आणि नाकाच्या बदल्यात नाक आणि कानाच्या बदल्यात कान आणि दाताच्या बदल्यात दात आणि खास जखमांचाही बदला आहे, मग जो कोणी त्यास माफ करील तर ते त्याच्यासाठी पश्चात्ताप आहे आणि जे लोक अल्लाहच्या आदेशानुसार फैसला करणार नाहीत तर असेच लोक अत्याचारी आहेत. info
التفاسير: