Firo maanaaji al-quraan tedduɗo oo - Eggo e haala Marathi - Muhammad Shafee Ansari.

Tonngoode hello ngoo:close

external-link copy
12 : 32

وَلَوْ تَرٰۤی اِذِ الْمُجْرِمُوْنَ نَاكِسُوْا رُءُوْسِهِمْ عِنْدَ رَبِّهِمْ ؕ— رَبَّنَاۤ اَبْصَرْنَا وَسَمِعْنَا فَارْجِعْنَا نَعْمَلْ صَالِحًا اِنَّا مُوْقِنُوْنَ ۟

१२. आणि जर तुम्ही यांना (त्या वेळच्या अवस्थेत) पाहिले असते, जेव्हा दुराचारी लोक आपल्या पालनकर्त्यासमोर नतमस्तक असतील, म्हणतील की हे आमच्या पालनकर्त्या! आम्ही पाहिले आणि ऐकले, आता तू आम्हाला परत पाठवशील तर आम्ही सत्कर्म करू. आम्ही ईमान राखणारे आहोत. info
التفاسير:

external-link copy
13 : 32

وَلَوْ شِئْنَا لَاٰتَیْنَا كُلَّ نَفْسٍ هُدٰىهَا وَلٰكِنْ حَقَّ الْقَوْلُ مِنِّیْ لَاَمْلَـَٔنَّ جَهَنَّمَ مِنَ الْجِنَّةِ وَالنَّاسِ اَجْمَعِیْنَ ۟

१३. आणि आम्ही इच्छिले असते तर प्रत्येक माणसाला मार्गदर्शन प्रदान केले असते, परंतु माझी ही गोष्ट पूर्णतः खरी ठरली आहे की मी अवश्य जहन्नमला माणसांनी व जिन्नांनी भरून टाकीन. info
التفاسير:

external-link copy
14 : 32

فَذُوْقُوْا بِمَا نَسِیْتُمْ لِقَآءَ یَوْمِكُمْ هٰذَا ۚ— اِنَّا نَسِیْنٰكُمْ وَذُوْقُوْا عَذَابَ الْخُلْدِ بِمَا كُنْتُمْ تَعْمَلُوْنَ ۟

१४. आता तुम्ही आपल्या त्या दिवसाच्या भेटीला विसरण्याची गोडी चाखा. आम्हीही तुम्हाला विसरलो, आपण केलेल्या कर्मांच्या (दुष्परिणती) द्वारे निरंतर शिक्षा- यातनेची गोडी चाखा. info
التفاسير:

external-link copy
15 : 32

اِنَّمَا یُؤْمِنُ بِاٰیٰتِنَا الَّذِیْنَ اِذَا ذُكِّرُوْا بِهَا خَرُّوْا سُجَّدًا وَّسَبَّحُوْا بِحَمْدِ رَبِّهِمْ وَهُمْ لَا یَسْتَكْبِرُوْنَ ۟

१५. आमच्या आयतींवर केवळ तेच लोक ईमान राखतात, ज्यांना जेव्हा जेव्हा शिकवण दिली जाते तेव्हा सजद्यात जातात (माथा टेकतात) आणि आपल्या पालनकर्त्याची प्रशंसेसह तस्बीह (गुणगान) करतात आणि गर्वापासून अलिप्त राहतात. info
التفاسير:

external-link copy
16 : 32

تَتَجَافٰی جُنُوْبُهُمْ عَنِ الْمَضَاجِعِ یَدْعُوْنَ رَبَّهُمْ خَوْفًا وَّطَمَعًا ؗ— وَّمِمَّا رَزَقْنٰهُمْ یُنْفِقُوْنَ ۟

१६. त्यांची कूस आपल्या बिछान्यांपासून अलग राहते. आपल्या पालनकर्त्याला भय आणि आशेसह पुकारतात आणि जे काही आम्ही त्यांना देऊन ठेवले आहे त्यातून खर्च करतात. info
التفاسير:

external-link copy
17 : 32

فَلَا تَعْلَمُ نَفْسٌ مَّاۤ اُخْفِیَ لَهُمْ مِّنْ قُرَّةِ اَعْیُنٍ ۚ— جَزَآءً بِمَا كَانُوْا یَعْمَلُوْنَ ۟

१७. कोणताही जीव जाणत नाही, जे काही आम्ही त्यांच्या डोळ्यांची शितलता त्यांच्यासाठी लपवून ठेवली आहे. ते जे काही करीत होते, हा त्याचा मोबदला आहे. info
التفاسير:

external-link copy
18 : 32

اَفَمَنْ كَانَ مُؤْمِنًا كَمَنْ كَانَ فَاسِقًا ؔؕ— لَا یَسْتَوٗنَ ۟

१८. काय तो, जो ईमान राखणारा असेल, त्या माणसासारखा आहे, जो दुराचारी असेल? दोन्ही कदापि समान ठरू शकत नाही. info
التفاسير:

external-link copy
19 : 32

اَمَّا الَّذِیْنَ اٰمَنُوْا وَعَمِلُوا الصّٰلِحٰتِ فَلَهُمْ جَنّٰتُ الْمَاْوٰی ؗ— نُزُلًا بِمَا كَانُوْا یَعْمَلُوْنَ ۟

१९. ज्या लोकांनी ईमान स्वीकारले आणि जे सत्कर्म करीत राहिले, त्यांच्यासाठी सदैवकाळ असणारी जन्नत आहे, अतिथ्य आहे त्यांच्या कर्मांच्या मोबदल्यात जे ते करीत होते. info
التفاسير:

external-link copy
20 : 32

وَاَمَّا الَّذِیْنَ فَسَقُوْا فَمَاْوٰىهُمُ النَّارُ ؕ— كُلَّمَاۤ اَرَادُوْۤا اَنْ یَّخْرُجُوْا مِنْهَاۤ اُعِیْدُوْا فِیْهَا وَقِیْلَ لَهُمْ ذُوْقُوْا عَذَابَ النَّارِ الَّذِیْ كُنْتُمْ بِهٖ تُكَذِّبُوْنَ ۟

२०. तथापि ज्यांनी अवज्ञा केली तर त्यांचे ठिकाण जहन्नम आहे, जेव्हा जेव्हा ते त्यातून बाहेर पडू इच्छितील, पुन्हा त्यातच परतविले जातील आणि त्यांना सांगितले जाईल, आपल्या खोटे ठरविण्यापायी आगीची गोडी चाखा. info
التفاسير: