Firo maanaaji al-quraan tedduɗo oo - Eggo e haala Marathi - Muhammad Shafee Ansari.

Simoore ceergu

external-link copy
1 : 25

تَبٰرَكَ الَّذِیْ نَزَّلَ الْفُرْقَانَ عَلٰی عَبْدِهٖ لِیَكُوْنَ لِلْعٰلَمِیْنَ نَذِیْرَا ۟ۙ

१. मोठा बरकतशाली (समृद्धशाली) आहे तो अल्लाह ज्याने आपल्या दासावर फुरक़ान१ अवतिरत केले. यासाठी की तो समस्त लोकांकरिता खबरदार करणारा ठरावा. info

(१) ‘फुरक़ान’चा अर्थ आहे, सत्य आणि असत्य, एकेश्वरवाद आणि अनेकेश्वरवाद, आणि न्याय-अन्याय यांच्या दरम्यान फरक करणारा. या कुरआनने अगदी उघडपणे या गोष्टींना स्पष्ट केले आहे. यास्तव याला ‘फुरक़ान’ म्हटले आहे.

التفاسير:

external-link copy
2 : 25

١لَّذِیْ لَهٗ مُلْكُ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ وَلَمْ یَتَّخِذْ وَلَدًا وَّلَمْ یَكُنْ لَّهٗ شَرِیْكٌ فِی الْمُلْكِ وَخَلَقَ كُلَّ شَیْءٍ فَقَدَّرَهٗ تَقْدِیْرًا ۟

२. त्याच अल्लाहचे अधिराज्य आहे आकाशांवर आणि धरतीवर आणि तो कोणतीही संतती बाळगत नाही, ना त्याच्या राज्यसत्तेत त्याचा कोणी भागीदार आहे, आणि प्रत्येक वस्तूला निर्माण करून त्याने एक निर्धारित स्वरूप दिले आहे. info
التفاسير: