Firo maanaaji al-quraan tedduɗo oo - Eggo e haala Marathi - Muhammad Shafee Ansari.

external-link copy
22 : 21

لَوْ كَانَ فِیْهِمَاۤ اٰلِهَةٌ اِلَّا اللّٰهُ لَفَسَدَتَا ۚ— فَسُبْحٰنَ اللّٰهِ رَبِّ الْعَرْشِ عَمَّا یَصِفُوْنَ ۟

२२. जर आकाशात आणि धरतीत अल्लाहखेरीज दुसरीही उपास्ये असती तर या दोघांची उलटापालट झाली असती.१ तेव्हा अल्लाह अर्श (ईसिंहासना) चा स्वामी, त्या गुणवैशिट्यांपासून पवित्र आहे ज्या हे मूर्तीपूजक बोलतात. info

(१) अर्थात जर खरोखर आकाश आणि धरतीचे दोन ईश्वर असते तर या जगाच्या स्वामीत्वावर दोन सामर्थ्य हक्कदार राहिली असती. दोघांचा संकल्प, बुद्धी आणि मर्जी कार्यरत राहिली असती. मग दोन मर्जी व फैसले असते तर सृष्टी-व्यवस्था कायम राहूच शकली नसती, जी सुरुवातीपासून अखंड चालत आली आहे. अर्थात दोघांच्या मर्जीत आपसात संघर्ष झाला असता आणि दोघांची आवड परस्पर विरोधी असती. परिणामी अस्ताव्यस्तता आणि विनाशाचा उद्रेक झाला असता. आतापावेतो असे घडले नाही. तेव्हा याचा अर्थ स्पष्ट आहे की या जगात केवळ एकच सामर्थ्य आहे, ज्याची मर्जी व आदेश चालतो. जे काही घडते केवळ त्याच्या आदेशानुसारच घडते. त्याने प्रदान केलेल्यास कोणी रोखू शकत नाही आणि ज्याच्यापासून तो आपली दया-कृपा रोखेल त्याला कोणी देऊही शकत नाही.

التفاسير: