ترجمهٔ معانی قرآن کریم - ترجمه‌ى مراتى - محمد شفيع انصارى

شماره صفحه:close

external-link copy
95 : 6

اِنَّ اللّٰهَ فَالِقُ الْحَبِّ وَالنَّوٰی ؕ— یُخْرِجُ الْحَیَّ مِنَ الْمَیِّتِ وَمُخْرِجُ الْمَیِّتِ مِنَ الْحَیِّ ؕ— ذٰلِكُمُ اللّٰهُ فَاَنّٰی تُؤْفَكُوْنَ ۟

९५. अल्लाहच बीज आणि कोय फाडून अंकूर बाहेर काढतो. तो सजीवाला निर्जीवातून, निर्जीवाला सजीवातून बाहेर काढतो. तोच अल्लाह आहे. मग तुम्ही कोठे उलट बहकत जात आहात? info
التفاسير:

external-link copy
96 : 6

فَالِقُ الْاِصْبَاحِ ۚ— وَجَعَلَ الَّیْلَ سَكَنًا وَّالشَّمْسَ وَالْقَمَرَ حُسْبَانًا ؕ— ذٰلِكَ تَقْدِیْرُ الْعَزِیْزِ الْعَلِیْمِ ۟

९६. तो प्रातःकाळ फाडणारा आहे आणि त्याने रात्रीला आराम करण्यासाठी आणि सूर्य आणि चंद्राला हिशोब लावण्यासाठी बनविले. ही निर्धारीत गोष्ट आहे, जबरदस्त ज्ञान बाळगणाऱ्या (अल्लाह) ची. info
التفاسير:

external-link copy
97 : 6

وَهُوَ الَّذِیْ جَعَلَ لَكُمُ النُّجُوْمَ لِتَهْتَدُوْا بِهَا فِیْ ظُلُمٰتِ الْبَرِّ وَالْبَحْرِ ؕ— قَدْ فَصَّلْنَا الْاٰیٰتِ لِقَوْمٍ یَّعْلَمُوْنَ ۟

९७. आणि त्यानेच तुमच्यासाठी तारे बनविले, यासाठी की तुम्ही जमीन आणि समुद्राच्या अंधारात त्यांच्याद्वारे मार्ग जाणून घ्यावा. आम्ही त्या लोकांसाठी निशाण्या सांगितल्या आहेत, जे ज्ञान बाळगतात. info
التفاسير:

external-link copy
98 : 6

وَهُوَ الَّذِیْۤ اَنْشَاَكُمْ مِّنْ نَّفْسٍ وَّاحِدَةٍ فَمُسْتَقَرٌّ وَّمُسْتَوْدَعٌ ؕ— قَدْ فَصَّلْنَا الْاٰیٰتِ لِقَوْمٍ یَّفْقَهُوْنَ ۟

९८. आणि त्यानेच तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले. मग तुमचे एक कायमस्वरूपी आणि एक सुपूर्द होण्याचे ठिकाण आहे. आम्ही त्यांच्यासाठी निशाण्या (चिन्हे) सांगितल्या आहेत. जे ज्ञान बाळगतात. info
التفاسير:

external-link copy
99 : 6

وَهُوَ الَّذِیْۤ اَنْزَلَ مِنَ السَّمَآءِ مَآءً ۚ— فَاَخْرَجْنَا بِهٖ نَبَاتَ كُلِّ شَیْءٍ فَاَخْرَجْنَا مِنْهُ خَضِرًا نُّخْرِجُ مِنْهُ حَبًّا مُّتَرَاكِبًا ۚ— وَمِنَ النَّخْلِ مِنْ طَلْعِهَا قِنْوَانٌ دَانِیَةٌ ۙ— وَّجَنّٰتٍ مِّنْ اَعْنَابٍ وَّالزَّیْتُوْنَ وَالرُّمَّانَ مُشْتَبِهًا وَّغَیْرَ مُتَشَابِهٍ ؕ— اُنْظُرُوْۤا اِلٰی ثَمَرِهٖۤ اِذَاۤ اَثْمَرَ وَیَنْعِهٖ ؕ— اِنَّ فِیْ ذٰلِكُمْ لَاٰیٰتٍ لِّقَوْمٍ یُّؤْمِنُوْنَ ۟

९९. आणि तोच होय, ज्याने आकाशातून पर्जन्यवृष्टी केली. मग आम्ही त्याद्वारे सर्व प्रकारची वनस्पती उगवली, मग त्याद्वारे हिरवेगार शेती उत्पन्न केली, ज्यापासून आम्ही थरावर थर असलेले धान्य आणि खजूरीच्या गाभ्याशी लटकणारे घोंस आणि द्राक्ष व जैतून व डाळींबाच्या बागा उत्पन करतो, ज्या एकाच प्रकारच्या आणि अनेक प्रकारच्या असतात. त्यांची फळे पाहा, जेव्हा ती लागतात, त्यांचे पिकणे, निःसंशय या सर्वांत, त्या लोकांकरिता निशाण्या (चिन्हे) आहेत, जे ईमान राखतात. info
التفاسير:

external-link copy
100 : 6

وَجَعَلُوْا لِلّٰهِ شُرَكَآءَ الْجِنَّ وَخَلَقَهُمْ وَخَرَقُوْا لَهٗ بَنِیْنَ وَبَنٰتٍ بِغَیْرِ عِلْمٍ ؕ— سُبْحٰنَهٗ وَتَعٰلٰی عَمَّا یَصِفُوْنَ ۟۠

१००. आणि लोकांनी जिन्नांना अल्लाहचे सहभागी बनविले आहे, वास्तविक त्यानेच त्यांना निर्माण केले आहे आणि त्या (अल्लाह) च्याकरिता पुत्र आणि कन्या, मनाने ठरवून घेतल्या, कसल्याही ज्ञानाविना तो (अल्लाह) यांनी सांगितलेल्या अवगुणांपासून मुक्त आणि उत्तम आहे. info
التفاسير:

external-link copy
101 : 6

بَدِیْعُ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ ؕ— اَنّٰی یَكُوْنُ لَهٗ وَلَدٌ وَّلَمْ تَكُنْ لَّهٗ صَاحِبَةٌ ؕ— وَخَلَقَ كُلَّ شَیْءٍ ۚ— وَهُوَ بِكُلِّ شَیْءٍ عَلِیْمٌ ۟

१०१. तो आकाशांची व धरतीची िनिर्मती करणारा आहे, त्याला संतती कशी असू शकते? वास्तविक त्याची कोणतीही पत्नी नाही आणि तो प्रत्येक चीज-वस्तूचा निर्माणकर्ता आणि जाणणारा आहे. info
التفاسير: