ترجمهٔ معانی قرآن کریم - ترجمه‌ى مراتى - محمد شفيع انصارى

محمد

external-link copy
1 : 47

اَلَّذِیْنَ كَفَرُوْا وَصَدُّوْا عَنْ سَبِیْلِ اللّٰهِ اَضَلَّ اَعْمَالَهُمْ ۟

१. ज्या लोकांनी कुप्र (इन्कार) केला आणि अल्लाहच्या मार्गापासून रोखले, अल्लाहने त्यांची कर्मे निष्फळ करून टाकलीत. info
التفاسير:

external-link copy
2 : 47

وَالَّذِیْنَ اٰمَنُوْا وَعَمِلُوا الصّٰلِحٰتِ وَاٰمَنُوْا بِمَا نُزِّلَ عَلٰی مُحَمَّدٍ وَّهُوَ الْحَقُّ مِنْ رَّبِّهِمْ ۙ— كَفَّرَ عَنْهُمْ سَیِّاٰتِهِمْ وَاَصْلَحَ بَالَهُمْ ۟

२. आणि ज्या लोकांनी ईमान राखलेत आणि सत्कर्मे केलीत आणि त्यावरही विश्वास राखला जो मुहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) वर अवतरित केला गेला आहे आणि वस्तुतः त्यांच्या पालनकर्त्यातर्फे सत्य (धर्म) देखील तोच आहे. अल्लाहने त्याचे अपराध मिटविले आणि त्यांच्या अवस्थेत सुधारणा केली. info
التفاسير:

external-link copy
3 : 47

ذٰلِكَ بِاَنَّ الَّذِیْنَ كَفَرُوا اتَّبَعُوا الْبَاطِلَ وَاَنَّ الَّذِیْنَ اٰمَنُوا اتَّبَعُوا الْحَقَّ مِنْ رَّبِّهِمْ ؕ— كَذٰلِكَ یَضْرِبُ اللّٰهُ لِلنَّاسِ اَمْثَالَهُمْ ۟

३. हे अशासाठी की काफिर (इन्कारी) लोकांनी असत्याचे अनुसरण केले आणि ईमान राखणाऱ्यांनी त्या सत्य (धर्मा) चे अनुसरण केले, जो त्यांच्या पालनकर्त्यातर्फे आहे. अल्लाह लोकांना त्यांची स्थिती अशा प्रकारे दर्शवितो. info
التفاسير:

external-link copy
4 : 47

فَاِذَا لَقِیْتُمُ الَّذِیْنَ كَفَرُوْا فَضَرْبَ الرِّقَابِ ؕ— حَتّٰۤی اِذَاۤ اَثْخَنْتُمُوْهُمْ فَشُدُّوا الْوَثَاقَ ۙ— فَاِمَّا مَنًّا بَعْدُ وَاِمَّا فِدَآءً حَتّٰی تَضَعَ الْحَرْبُ اَوْزَارَهَا— ذٰلِكَ ۛؕ— وَلَوْ یَشَآءُ اللّٰهُ لَانْتَصَرَ مِنْهُمْ ۙ— وَلٰكِنْ لِّیَبْلُوَاۡ بَعْضَكُمْ بِبَعْضٍ ؕ— وَالَّذِیْنَ قُتِلُوْا فِیْ سَبِیْلِ اللّٰهِ فَلَنْ یُّضِلَّ اَعْمَالَهُمْ ۟

४. तर जेव्हा काफिरांशी तुमचा सामना होईल, तेव्हा त्याच्या मानांवर वार करा येथे पर्यर्ंत की जेव्हा त्यांना खूप चांगल्या प्रकारे ठेचून काढाल, तर आता खूप मजबूत कारागृहात कैद करा (मग तुम्हाला अधिकार आहे की) उपकार करून कैदेतून मुक्त करा किंवा काही अर्थदंड (फिदिया) घेऊन, जोपर्यंत युद्ध (करणारे) आपले शस्त्र खाली ठेवतील. हाच आदेश आहे आणि जर अल्लाहने इच्छिले असते तर स्वतःच त्यांचा सूड घेतला असता, परंतु (तो असे इच्छितो) की तुमच्यापैकी एकाची परीक्षा दुसऱ्याकडून घ्यावी आणि जे लोक अल्लाहच्या मार्गात शहीद केले जातात, अल्लाह त्यांची कर्मे कधीही वाया जाऊ देणार नाही. info
التفاسير:

external-link copy
5 : 47

سَیَهْدِیْهِمْ وَیُصْلِحُ بَالَهُمْ ۟ۚ

५. तो त्यांना मार्गदर्शन करील आणि त्यांच्या अवस्थेत सुधारणा करील. info
التفاسير:

external-link copy
6 : 47

وَیُدْخِلُهُمُ الْجَنَّةَ عَرَّفَهَا لَهُمْ ۟

६. आणि त्यांना त्या जन्नतमध्ये दाखल करील, जिचा परिचय त्यांना करून दिला गेला आहे. info
التفاسير:

external-link copy
7 : 47

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوْۤا اِنْ تَنْصُرُوا اللّٰهَ یَنْصُرْكُمْ وَیُثَبِّتْ اَقْدَامَكُمْ ۟

७. हे ईमान राखणाऱ्यांनो! जर तुम्ही अल्लाह (च्या धर्मा) ची मदत कराल, तर तो तुमची मदत करेल आणि तुमचे पाय मजबूत (स्थिर) राखेल. info
التفاسير:

external-link copy
8 : 47

وَالَّذِیْنَ كَفَرُوْا فَتَعْسًا لَّهُمْ وَاَضَلَّ اَعْمَالَهُمْ ۟

८. आणि जे लोक काफिर (इन्कारी) झालेत, त्यांचा सर्वनाश असो, अल्लाहने त्यांची कर्मे निष्फळ केली. info
التفاسير:

external-link copy
9 : 47

ذٰلِكَ بِاَنَّهُمْ كَرِهُوْا مَاۤ اَنْزَلَ اللّٰهُ فَاَحْبَطَ اَعْمَالَهُمْ ۟

९. हे अशासाठी की अल्लाहने अवतरित केलेल्या गोष्टीपासून नाराज झाले, तेव्हा अल्लाहने देखील त्यांची कर्मे वाया घालवलीत. info
التفاسير:

external-link copy
10 : 47

اَفَلَمْ یَسِیْرُوْا فِی الْاَرْضِ فَیَنْظُرُوْا كَیْفَ كَانَ عَاقِبَةُ الَّذِیْنَ مِنْ قَبْلِهِمْ ؕ— دَمَّرَ اللّٰهُ عَلَیْهِمْ ؗ— وَلِلْكٰفِرِیْنَ اَمْثَالُهَا ۟

१०. काय त्या लोकांनी जमिनीवर हिंडून फिरून या गोष्टीचे निरीक्षण नाही केले की त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या लोकांची काय परिणीती झाली? अल्लाहने त्यांना नष्ट करून टाकले आणि काफिरांसाठी अशीच शिक्षा आहे. info
التفاسير:

external-link copy
11 : 47

ذٰلِكَ بِاَنَّ اللّٰهَ مَوْلَی الَّذِیْنَ اٰمَنُوْا وَاَنَّ الْكٰفِرِیْنَ لَا مَوْلٰی لَهُمْ ۟۠

११. ते यासाठी की ईमान राखणाऱ्यांचा संरक्षक स्वतः अल्लाह आहे, आणि यासाठी की काफिर लोकांचा कोणीही संरक्षक नाही. info
التفاسير: