ترجمهٔ معانی قرآن کریم - ترجمه‌ى مراتى - محمد شفيع انصارى

شماره صفحه:close

external-link copy
6 : 22

ذٰلِكَ بِاَنَّ اللّٰهَ هُوَ الْحَقُّ وَاَنَّهٗ یُحْیِ الْمَوْتٰی وَاَنَّهٗ عَلٰی كُلِّ شَیْءٍ قَدِیْرٌ ۟ۙ

६. हे अशासाठी की अल्लाहच सत्य आहे आणि तोच मेलेल्यांना जिवंत करतो आणि तो प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो. info
التفاسير:

external-link copy
7 : 22

وَّاَنَّ السَّاعَةَ اٰتِیَةٌ لَّا رَیْبَ فِیْهَا ۙ— وَاَنَّ اللّٰهَ یَبْعَثُ مَنْ فِی الْقُبُوْرِ ۟

७. आणि हे की कयामत निश्चितच येणार आहे, ज्याबाबत कसलीही शंका नाही आणि अगदी खात्रीने अल्लाह कबरीत असलेल्यांना दुसऱ्यांदा जिवंत करेल. info
التفاسير:

external-link copy
8 : 22

وَمِنَ النَّاسِ مَنْ یُّجَادِلُ فِی اللّٰهِ بِغَیْرِ عِلْمٍ وَّلَا هُدًی وَّلَا كِتٰبٍ مُّنِیْرٍ ۟ۙ

८. आणि काही लोक अल्लाहविषयी ज्ञानाविना, आणि मार्गदर्शनाविना आणि कोणत्याही दिव्य ग्रंथाविना वाद घालतात. info
التفاسير:

external-link copy
9 : 22

ثَانِیَ عِطْفِهٖ لِیُضِلَّ عَنْ سَبِیْلِ اللّٰهِ ؕ— لَهٗ فِی الدُّنْیَا خِزْیٌ وَّنُذِیْقُهٗ یَوْمَ الْقِیٰمَةِ عَذَابَ الْحَرِیْقِ ۟

९. आपला पैलू वळवून घेणारा बनून (ताठरपणे) यासाठी की अल्लाहच्या मार्गापासून भ्रष्ट करावे तो या जगातही अपमानित होईल, आणि कयामतच्या दिवशीही आम्ही त्याला जहन्नमच्या आगीत जळण्याची शिक्षा - यातना चाखवू. info
التفاسير:

external-link copy
10 : 22

ذٰلِكَ بِمَا قَدَّمَتْ یَدٰكَ وَاَنَّ اللّٰهَ لَیْسَ بِظَلَّامٍ لِّلْعَبِیْدِ ۟۠

१०. हे त्या कर्मांपायी, जी तुझ्या हातांनी पुढे पाठविली होती, मात्र विश्वास राखा की अल्लाह आपल्या दासांवर अत्याचार करणारा नाही. info
التفاسير:

external-link copy
11 : 22

وَمِنَ النَّاسِ مَنْ یَّعْبُدُ اللّٰهَ عَلٰی حَرْفٍ ۚ— فَاِنْ اَصَابَهٗ خَیْرُ ١طْمَاَنَّ بِهٖ ۚ— وَاِنْ اَصَابَتْهُ فِتْنَةُ ١نْقَلَبَ عَلٰی وَجْهِهٖ ۫ۚ— خَسِرَ الدُّنْیَا وَالْاٰخِرَةَ ؕ— ذٰلِكَ هُوَ الْخُسْرَانُ الْمُبِیْنُ ۟

११. आणि काही लोक असेही आहेत, जे एका किनाऱ्याला राहून अल्लाहची उपासना करतात, जर काही लाभ झाला तर समाधानी होतात, आणि जर एखादे दुःख वाट्याला आले तर त्याच क्षणी माघारी फिरतात. त्यांनी इहलोक आणि परलोक दोघांचे नुकसान उचलले. वस्तुतः हेच उघड नुकसान आहे. info
التفاسير:

external-link copy
12 : 22

یَدْعُوْا مِنْ دُوْنِ اللّٰهِ مَا لَا یَضُرُّهٗ وَمَا لَا یَنْفَعُهٗ ؕ— ذٰلِكَ هُوَ الضَّلٰلُ الْبَعِیْدُ ۟ۚ

१२. ते अल्लाहखेरीज त्यांना पुकारतात जे ना नुकसान पोहचवू शकतात ना फायदा. हीच ती दूरची मार्गभ्रष्टता आहे. info
التفاسير:

external-link copy
13 : 22

یَدْعُوْا لَمَنْ ضَرُّهٗۤ اَقْرَبُ مِنْ نَّفْعِهٖ ؕ— لَبِئْسَ الْمَوْلٰی وَلَبِئْسَ الْعَشِیْرُ ۟

१३. अशाला पुकारतात ज्यांचे नुकसान, लाभापेक्षा अधिक जवळ आहे निःसंशय मोठे वाईट संरक्षक आहेत आणि वाईट दोस्त. info
التفاسير:

external-link copy
14 : 22

اِنَّ اللّٰهَ یُدْخِلُ الَّذِیْنَ اٰمَنُوْا وَعَمِلُوا الصّٰلِحٰتِ جَنّٰتٍ تَجْرِیْ مِنْ تَحْتِهَا الْاَنْهٰرُ ؕ— اِنَّ اللّٰهَ یَفْعَلُ مَا یُرِیْدُ ۟

१४. निःसंशय, ईमान (राखून) सत्कर्म करणाऱ्यांना अल्लाह, अशा जन्नतमध्ये दाखल करील जिच्या खाली प्रवाह वाहत असतील. अल्लाह जे इच्छितो ते निश्चित करतो. info
التفاسير:

external-link copy
15 : 22

مَنْ كَانَ یَظُنُّ اَنْ لَّنْ یَّنْصُرَهُ اللّٰهُ فِی الدُّنْیَا وَالْاٰخِرَةِ فَلْیَمْدُدْ بِسَبَبٍ اِلَی السَّمَآءِ ثُمَّ لْیَقْطَعْ فَلْیَنْظُرْ هَلْ یُذْهِبَنَّ كَیْدُهٗ مَا یَغِیْظُ ۟

१५. ज्याला हे वाटत असेल की अल्लाह आपल्या पैगंबरांची मदत दोन्ही लोकात (इहलोक आणि परलोक) करणार नाही, तर त्याने उंच जागी एक दोर बांधून (आपल्या गळ्यात फास टाकून घ्यावा) आणि गळा घोटून घ्यावा, मग पाहावे की त्याच्या चतुराईने ती गोष्ट दूर होते जी त्याला कासाविस करीत आहे. info
التفاسير: