ترجمهٔ معانی قرآن کریم - ترجمه‌ى مراتى - محمد شفيع انصارى

شماره صفحه:close

external-link copy
64 : 12

قَالَ هَلْ اٰمَنُكُمْ عَلَیْهِ اِلَّا كَمَاۤ اَمِنْتُكُمْ عَلٰۤی اَخِیْهِ مِنْ قَبْلُ ؕ— فَاللّٰهُ خَیْرٌ حٰفِظًا ۪— وَّهُوَ اَرْحَمُ الرّٰحِمِیْنَ ۟

६४. (याकूब) म्हणाले, काय मी याच्या बाबतीत तुमच्यावर तसाच विश्वास ठेवू जसा यापूर्वी याच्या भावाबाबत विश्वास ठेवला? सर्वश्रेष्ठ अल्लाहच सर्वांत उत्तम संरक्षक आहे आणि तो समस्त कृपावानांमध्ये जास्त कृपावान आहे. info
التفاسير:

external-link copy
65 : 12

وَلَمَّا فَتَحُوْا مَتَاعَهُمْ وَجَدُوْا بِضَاعَتَهُمْ رُدَّتْ اِلَیْهِمْ ؕ— قَالُوْا یٰۤاَبَانَا مَا نَبْغِیْ ؕ— هٰذِهٖ بِضَاعَتُنَا رُدَّتْ اِلَیْنَا ۚ— وَنَمِیْرُ اَهْلَنَا وَنَحْفَظُ اَخَانَا وَنَزْدَادُ كَیْلَ بَعِیْرٍ ؕ— ذٰلِكَ كَیْلٌ یَّسِیْرٌ ۟

६५. आणि जेव्हा त्यांनी आपले सामान उघडले तेव्हा त्यात त्यांना आपली रक्कम आढळली, जी त्यांना परत केली गेली होती. म्हणाले, हे पिता! आम्हाला आणखी काय पाहिजे? ही आमची रक्कम आम्हाला परत केली गेली आहे आणि आम्ही आपल्या कुटुंबाकरिता धान्य आणून देऊ आणि आपल्या भावाचे रक्षण करू आणि एक उंटाचे माप जास्त आणू. हे माप तर जास्त सोपे आहे. info
التفاسير:

external-link copy
66 : 12

قَالَ لَنْ اُرْسِلَهٗ مَعَكُمْ حَتّٰی تُؤْتُوْنِ مَوْثِقًا مِّنَ اللّٰهِ لَتَاْتُنَّنِیْ بِهٖۤ اِلَّاۤ اَنْ یُّحَاطَ بِكُمْ ۚ— فَلَمَّاۤ اٰتَوْهُ مَوْثِقَهُمْ قَالَ اللّٰهُ عَلٰی مَا نَقُوْلُ وَكِیْلٌ ۟

६६. (याकूब) म्हणाले, मी तर त्याला तुमच्यासोबत कधीही पाठविणार नाही, जोपर्यंत तुम्ही अल्लाहला मध्यस्थी ठेवून मला वचन द्याल की तुम्ही त्याला माझ्याजवळ पोचवाल, याखेरीज की तुम्ही सर्व कैदी बनविले जाल. जेव्हा त्यांनी पक्के वचन दिले तेव्हा ते म्हणाले की आम्ही जे काही बोलत आहोत, अल्लाह त्याचा संरक्षक आहे. info
التفاسير:

external-link copy
67 : 12

وَقَالَ یٰبَنِیَّ لَا تَدْخُلُوْا مِنْ بَابٍ وَّاحِدٍ وَّادْخُلُوْا مِنْ اَبْوَابٍ مُّتَفَرِّقَةٍ ؕ— وَمَاۤ اُغْنِیْ عَنْكُمْ مِّنَ اللّٰهِ مِنْ شَیْءٍ ؕ— اِنِ الْحُكْمُ اِلَّا لِلّٰهِ ؕ— عَلَیْهِ تَوَكَّلْتُ ۚ— وَعَلَیْهِ فَلْیَتَوَكَّلِ الْمُتَوَكِّلُوْنَ ۟

६७. आणि (याकूब) म्हणाले, हे माझ्या मुलांनो! तुम्ही सर्व एकाच दारातून प्रवेश करू नका, किंबहुना अनेक दारांमधून वेगवेगळे होऊन प्रवेश करा. मी अल्लाहतर्फे आलेल्या कोणत्याही गोष्टीला तुमच्या वरून टाळू शकत नाही. आदेश केवळ अल्लाहचाच चालतो, माझा संपूर्ण विश्वास त्याच्यावरच आहे आणि प्रत्येक भरोसा ठेवणाऱ्याने त्याच्यावरच भरोसा ठेवला पाहिजे. info
التفاسير:

external-link copy
68 : 12

وَلَمَّا دَخَلُوْا مِنْ حَیْثُ اَمَرَهُمْ اَبُوْهُمْ ؕ— مَا كَانَ یُغْنِیْ عَنْهُمْ مِّنَ اللّٰهِ مِنْ شَیْءٍ اِلَّا حَاجَةً فِیْ نَفْسِ یَعْقُوْبَ قَضٰىهَا ؕ— وَاِنَّهٗ لَذُوْ عِلْمٍ لِّمَا عَلَّمْنٰهُ وَلٰكِنَّ اَكْثَرَ النَّاسِ لَا یَعْلَمُوْنَ ۟۠

६८. आणि जेव्हा ते त्याच मार्गांनी, ज्यांचा आदेश त्यांच्या पित्याने दिला होता, गेले, काहीच नव्हते की अल्लाहने जी गोष्ट निश्चित केली आहे, तिच्यापासून ते त्यांना किंचितही वाचवतील. तथापि याकूबच्या मनात एक विचार आला, जो त्याने पूर्ण केला. निःसंशय ते आम्ही शिकविलेल्या त्या ज्ञानाने संपन्न होते, परंतु अधिकांश लोक जाणत नाहीत. info
التفاسير:

external-link copy
69 : 12

وَلَمَّا دَخَلُوْا عَلٰی یُوْسُفَ اٰوٰۤی اِلَیْهِ اَخَاهُ قَالَ اِنِّیْۤ اَنَا اَخُوْكَ فَلَا تَبْتَىِٕسْ بِمَا كَانُوْا یَعْمَلُوْنَ ۟

६९. आणि ते सर्व यूसुफजवळ पोहोचले, तेव्हा यूसुफने आपल्या भावाला आपल्याजवळ बसविले आणि म्हटले, मी तुझा भाऊ (यूसुफ) आहे, आतापावेतो हे जे काही करत राहिले, त्याबद्दल दुःख करू नकोस. info
التفاسير: