আল-কোৰআনুল কাৰীমৰ অৰ্থানুবাদ - মাৰাঠী অনুবাদ- মুহাম্মদ শ্বফী আনচাৰী

পৃষ্ঠা নং:close

external-link copy
10 : 59

وَالَّذِیْنَ جَآءُوْ مِنْ بَعْدِهِمْ یَقُوْلُوْنَ رَبَّنَا اغْفِرْ لَنَا وَلِاِخْوَانِنَا الَّذِیْنَ سَبَقُوْنَا بِالْاِیْمَانِ وَلَا تَجْعَلْ فِیْ قُلُوْبِنَا غِلًّا لِّلَّذِیْنَ اٰمَنُوْا رَبَّنَاۤ اِنَّكَ رَءُوْفٌ رَّحِیْمٌ ۟۠

१०. आणि (त्यांच्यासाठी) जे त्यांच्यानंतर आले, जे म्हणतील की, हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला माफ कर आणि आमच्या त्या बांधवांनाही, ज्यांनी आमच्या आधी ईमान राखले आहे आणि ईमान राखणाऱ्यांच्याविषयी आमच्या मनात कपट (आणि वैरभावना) आणू नको. हे आमच्या पालनकर्त्या! निःसंशय, तू प्रेम आणि दया करणारा आहे. info

(१) हदीसमधील उल्लेखानुसार माणसाने मनाच्या इच्छा आकांक्षांपासून दूर राहिले पाहिजे कारण याच मनोकांक्षांनी पूर्वीच्या लोकांना बरबाद केले, त्यांना रक्तपात करण्यास प्रवृत्त केले आणि त्यांनी अवैध (हराम) गोष्टींना वैध (हलाल) ठरवून घेतले. (सहीह मुस्लिम, किताबुल बिर्र, बाबु तहरीमिज, जुल्मे)

التفاسير:

external-link copy
11 : 59

اَلَمْ تَرَ اِلَی الَّذِیْنَ نَافَقُوْا یَقُوْلُوْنَ لِاِخْوَانِهِمُ الَّذِیْنَ كَفَرُوْا مِنْ اَهْلِ الْكِتٰبِ لَىِٕنْ اُخْرِجْتُمْ لَنَخْرُجَنَّ مَعَكُمْ وَلَا نُطِیْعُ فِیْكُمْ اَحَدًا اَبَدًا ۙ— وَّاِنْ قُوْتِلْتُمْ لَنَنْصُرَنَّكُمْ ؕ— وَاللّٰهُ یَشْهَدُ اِنَّهُمْ لَكٰذِبُوْنَ ۟

११. काय तुम्ही त्या दांभिक (मुनाफिक) लोकांना नाही पाहिले, जे आपल्या ग्रंथ बाळगणाऱ्यांमधील काफिर बांधवांना म्हणतात की जर तुम्हाला देशाबाहेर घालविले गेले तर आम्हीही अवश्य तुमच्यासोबत देशत्याग करू आणि तुमच्याविषयी कधीही कोणाचे म्हणणे मान्य करणार नाही आणि जर तुमच्याशी युद्ध केले केले तर निश्चित आम्ही तुमची मदत करू, परंतु अल्लाह साक्ष देतो की हे अगदी खोटारडे आहेत. info
التفاسير:

external-link copy
12 : 59

لَىِٕنْ اُخْرِجُوْا لَا یَخْرُجُوْنَ مَعَهُمْ ۚ— وَلَىِٕنْ قُوْتِلُوْا لَا یَنْصُرُوْنَهُمْ ۚ— وَلَىِٕنْ نَّصَرُوْهُمْ لَیُوَلُّنَّ الْاَدْبَارَ ۫— ثُمَّ لَا یُنْصَرُوْنَ ۟

१२. जर त्यांना देशाबाहेर घालविले गेले तर हे त्यांच्यासोबत जाणार नाहीत आणि जर त्यांच्याशी युद्ध छेडले गेले तर हे त्यांची मदतही करणार नाहीत आणि (समजा) हे मदत करण्यास तयारही झालेत तर पाठ दाखवून (पळ काढतील) मग त्यांची मदत केली जाणार नाही. info
التفاسير:

external-link copy
13 : 59

لَاَنْتُمْ اَشَدُّ رَهْبَةً فِیْ صُدُوْرِهِمْ مِّنَ اللّٰهِ ؕ— ذٰلِكَ بِاَنَّهُمْ قَوْمٌ لَّا یَفْقَهُوْنَ ۟

१३. (मुसलमानांनो! विश्वास करा) की तुमचे भय त्यांच्या छातीत (मनात) अल्लाहच्या भयाच्या तुलनेत फार जास्त आहे, हे यासाठी की ते सुज्ञता बाळगत नाही. info
التفاسير:

external-link copy
14 : 59

لَا یُقَاتِلُوْنَكُمْ جَمِیْعًا اِلَّا فِیْ قُرًی مُّحَصَّنَةٍ اَوْ مِنْ وَّرَآءِ جُدُرٍ ؕ— بَاْسُهُمْ بَیْنَهُمْ شَدِیْدٌ ؕ— تَحْسَبُهُمْ جَمِیْعًا وَّقُلُوْبُهُمْ شَتّٰی ؕ— ذٰلِكَ بِاَنَّهُمْ قَوْمٌ لَّا یَعْقِلُوْنَ ۟ۚ

१४. हे सर्व मिळूनही तुमच्याशी लढू शकत नाही, मात्र ही गोष्ट वेगळी की किल्ल्याने घेरलेल्या ठिकाणी असावेत किंवा भिंतींच्या आडोशाला असावेत. त्यांची लढाई तर आपसातच मोठी सक्त आहे. जरी तुम्ही त्यांना एकसंघ समजत आहात तरी, वस्तुतः त्यांची मने आपसात विभक्त आहेत हे अशासाठी की हे निर्बुद्ध लोक आहेत. info
التفاسير:

external-link copy
15 : 59

كَمَثَلِ الَّذِیْنَ مِنْ قَبْلِهِمْ قَرِیْبًا ذَاقُوْا وَبَالَ اَمْرِهِمْ ۚ— وَلَهُمْ عَذَابٌ اَلِیْمٌ ۟ۚ

१५. त्या लोकांसारखे, जे त्यांच्या थोड्याचपूर्वी होऊन गेलेत, ज्यांनी आपल्या दुष्कर्मांची गोडी चाखली आणि ज्यांच्यासाठी दुःखदायक शिक्षा (तयार) आहे. info
التفاسير:

external-link copy
16 : 59

كَمَثَلِ الشَّیْطٰنِ اِذْ قَالَ لِلْاِنْسَانِ اكْفُرْ ۚ— فَلَمَّا كَفَرَ قَالَ اِنِّیْ بَرِیْٓءٌ مِّنْكَ اِنِّیْۤ اَخَافُ اللّٰهَ رَبَّ الْعٰلَمِیْنَ ۟

१६. सैतानासारखे की तो माणसाला म्हणतो, कुप्र (इन्कार) कर, मग जेव्हा तो कुप्र करून बसतो, तेव्हा म्हणतो, मी तुझ्यापासून वेगळा आहे. मी तर साऱ्या विश्वांच्या पालनकर्त्यांचे भय बाळगतो. info
التفاسير: