আল-কোৰআনুল কাৰীমৰ অৰ্থানুবাদ - মাৰাঠী অনুবাদ- মুহাম্মদ শ্বফী আনচাৰী

পৃষ্ঠা নং:close

external-link copy
32 : 52

اَمْ تَاْمُرُهُمْ اَحْلَامُهُمْ بِهٰذَاۤ اَمْ هُمْ قَوْمٌ طَاغُوْنَ ۟ۚ

३२. काय त्यांच्या अकला त्यांना हेच शिकवितात? किंवा हे लोक आहेतच उध्दट (विद्रोही)? info
التفاسير:

external-link copy
33 : 52

اَمْ یَقُوْلُوْنَ تَقَوَّلَهٗ ۚ— بَلْ لَّا یُؤْمِنُوْنَ ۟ۚ

३३. काय हे म्हणता की या (पैगंबरा) ने (कुरआन) स्वतः रचले आहे, वस्तुतः हे ईमान राखत नाहीत. info
التفاسير:

external-link copy
34 : 52

فَلْیَاْتُوْا بِحَدِیْثٍ مِّثْلِهٖۤ اِنْ كَانُوْا صٰدِقِیْنَ ۟ؕ

३४. बरे, जर हे सच्चे आहेत तर मग यासारखी एक तरी गोष्ट यांनी आणून दाखवावी. info
التفاسير:

external-link copy
35 : 52

اَمْ خُلِقُوْا مِنْ غَیْرِ شَیْءٍ اَمْ هُمُ الْخٰلِقُوْنَ ۟ؕ

३५. काय हे एखाद्या (निर्माण करणाऱ्या) च्या विना स्वतः (आपोआप) निर्माण झाले आहेत? किंवा हे स्वतः निर्माण करणारे आहेत? info
التفاسير:

external-link copy
36 : 52

اَمْ خَلَقُوا السَّمٰوٰتِ وَالْاَرْضَ ۚ— بَلْ لَّا یُوْقِنُوْنَ ۟ؕ

३६. काय त्यांनीच आकाशांना आणि जमिनीला निर्माण केले आहे? किंबहुना हे विश्वास न राखणारे लोक आहेत. info
التفاسير:

external-link copy
37 : 52

اَمْ عِنْدَهُمْ خَزَآىِٕنُ رَبِّكَ اَمْ هُمُ الْمُصَۜیْطِرُوْنَ ۟ؕ

३७. अथवा काय यांच्याजवळ तुमच्या पालनकर्त्याचे खजिने आहेत? किंवा (त्या खजिन्यांचे) हे संरक्षक आहेत? info
التفاسير:

external-link copy
38 : 52

اَمْ لَهُمْ سُلَّمٌ یَّسْتَمِعُوْنَ فِیْهِ ۚ— فَلْیَاْتِ مُسْتَمِعُهُمْ بِسُلْطٰنٍ مُّبِیْنٍ ۟ؕ

३८. किंवा यांच्याजवळ एखादी शिडी आहे, जिच्यावर चढून हे ऐकतात? (जर असे आहे) तर ऐकणाऱ्याने एखादे स्पष्ट प्रमाण सादर करावे. info
التفاسير:

external-link copy
39 : 52

اَمْ لَهُ الْبَنٰتُ وَلَكُمُ الْبَنُوْنَ ۟ؕ

३९. काय अल्लाहकरिता सर्व कन्या आहेत आणि तुमच्यासाठी पुत्र? info
التفاسير:

external-link copy
40 : 52

اَمْ تَسْـَٔلُهُمْ اَجْرًا فَهُمْ مِّنْ مَّغْرَمٍ مُّثْقَلُوْنَ ۟ؕ

४०. काय तुम्ही यांच्याकडून काही मजुरी मागता की हे त्या ओझ्याने दाबले जात आहेत? info
التفاسير:

external-link copy
41 : 52

اَمْ عِنْدَهُمُ الْغَیْبُ فَهُمْ یَكْتُبُوْنَ ۟ؕ

४१. काय यांच्याजवळ परोक्ष ज्ञान आहे की हे लिहून घेत असतात? info
التفاسير:

external-link copy
42 : 52

اَمْ یُرِیْدُوْنَ كَیْدًا ؕ— فَالَّذِیْنَ كَفَرُوْا هُمُ الْمَكِیْدُوْنَ ۟ؕ

४२. काय हे लोक एखादा कावेबाजपणा करू इच्छितात? तर (विश्वास ठेवा) की कपट कारस्थान करणारा गट काफिरांचा आहे. info
التفاسير:

external-link copy
43 : 52

اَمْ لَهُمْ اِلٰهٌ غَیْرُ اللّٰهِ ؕ— سُبْحٰنَ اللّٰهِ عَمَّا یُشْرِكُوْنَ ۟

४३. काय अल्लाहखेरीज त्यांचा कोणी दुसरा माबूद (उपास्य) आहे? (कदापि नाही) अल्लाह त्यांच्या सहभागी ठरविण्यापासून (शुद्ध) आणि पवित्र आहे. info
التفاسير:

external-link copy
44 : 52

وَاِنْ یَّرَوْا كِسْفًا مِّنَ السَّمَآءِ سَاقِطًا یَّقُوْلُوْا سَحَابٌ مَّرْكُوْمٌ ۟

४४. जर हे लोक आकाशाचा एखादा तुकडा जरी कोसळताना पाहतील तरी हेच म्हणतील की हे थरावर थर ढग आहेत. info
التفاسير:

external-link copy
45 : 52

فَذَرْهُمْ حَتّٰی یُلٰقُوْا یَوْمَهُمُ الَّذِیْ فِیْهِ یُصْعَقُوْنَ ۟ۙ

४५. तेव्हा तुम्ही त्यांना सोडा, येथे पर्यर्ंत की यांची आपल्या त्या दिवसाशी भेट व्हावी ज्यात हे बेशुद्ध केले जातील. info
التفاسير:

external-link copy
46 : 52

یَوْمَ لَا یُغْنِیْ عَنْهُمْ كَیْدُهُمْ شَیْـًٔا وَّلَا هُمْ یُنْصَرُوْنَ ۟ؕ

४६. ज्या दिवशी त्यांना त्यांची चाल (खेळी) काहीच कामी येणार नाही आणि ना त्यांना मदत केली जाईल. info
التفاسير:

external-link copy
47 : 52

وَاِنَّ لِلَّذِیْنَ ظَلَمُوْا عَذَابًا دُوْنَ ذٰلِكَ وَلٰكِنَّ اَكْثَرَهُمْ لَا یَعْلَمُوْنَ ۟

४७. निःसंशय, अत्याचारी लोकांकरिता याखेरीजही अन्य शिक्षा-यातना आहेत, परंतु त्या लोकांपैकी अधिकांश लोक हे जाणत नाहीत. info
التفاسير:

external-link copy
48 : 52

وَاصْبِرْ لِحُكْمِ رَبِّكَ فَاِنَّكَ بِاَعْیُنِنَا وَسَبِّحْ بِحَمْدِ رَبِّكَ حِیْنَ تَقُوْمُ ۟ۙ

४८. तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाच्या प्रतीक्षेत धीर - संयम राखा. निःसंशय, तुम्ही आमच्या डोळ्यांसमोर आहात आणि सकाळी जेव्हा तुम्ही उठाल, आपल्या पालनकर्त्याची पवित्रतेसह प्रशंसा करा. info
التفاسير:

external-link copy
49 : 52

وَمِنَ الَّیْلِ فَسَبِّحْهُ وَاِدْبَارَ النُّجُوْمِ ۟۠

४९. आणि रात्री देखील त्याचे महिमागान करा आणि ताऱ्यांच्या अस्तास जाण्याच्या वेळीही. info
التفاسير: