আল-কোৰআনুল কাৰীমৰ অৰ্থানুবাদ - মাৰাঠী অনুবাদ- মুহাম্মদ শ্বফী আনচাৰী

পৃষ্ঠা নং:close

external-link copy
21 : 46

وَاذْكُرْ اَخَا عَادٍ اِذْ اَنْذَرَ قَوْمَهٗ بِالْاَحْقَافِ وَقَدْ خَلَتِ النُّذُرُ مِنْ بَیْنِ یَدَیْهِ وَمِنْ خَلْفِهٖۤ اَلَّا تَعْبُدُوْۤا اِلَّا اللّٰهَ ؕ— اِنِّیْۤ اَخَافُ عَلَیْكُمْ عَذَابَ یَوْمٍ عَظِیْمٍ ۟

२१. आणि आदच्या भावाचे स्मरण करा, जेव्हा त्याने आपल्या जनसमूहाच्या लोकांना अहकाफमध्ये (वाळूच्या टेकडीवर) खबरदार केले, आणि निःसंशय, त्याच्या पूर्वीही भय दाखविणारे होऊन गेलेत आणि त्याच्या नंतरही की तुम्ही अल्लाहखेरीज दुसऱ्यांची उपासना करू नका. निःसंशय, मला तुमच्याबद्दल मोठ्या दिवसाच्या अज़ाबचे भय वाटते. info
التفاسير:

external-link copy
22 : 46

قَالُوْۤا اَجِئْتَنَا لِتَاْفِكَنَا عَنْ اٰلِهَتِنَا ۚ— فَاْتِنَا بِمَا تَعِدُنَاۤ اِنْ كُنْتَ مِنَ الصّٰدِقِیْنَ ۟

२२. जनसमूहाच्या लोकांनी उत्तर दिले की काय तुम्ही आमच्याजवळ अशासाठी आलात की आम्हाला आमच्या दैवतांची पूजा अर्चना करण्यापासून रोखावे, तेव्हा जर तुम्ही सच्चे असाल तर ज्या शिक्षा - यातनां (अज़ाब) चा तुम्ही वायदा करीत आहात, त्या आमच्यावर आणून सोडा. info
التفاسير:

external-link copy
23 : 46

قَالَ اِنَّمَا الْعِلْمُ عِنْدَ اللّٰهِ ؗ— وَاُبَلِّغُكُمْ مَّاۤ اُرْسِلْتُ بِهٖ وَلٰكِنِّیْۤ اَرٰىكُمْ قَوْمًا تَجْهَلُوْنَ ۟

२३. (हजरत हूद) म्हणाले, (याचे) ज्ञान तर अल्लाहजवळ आहे. मला तर जो संदेश देऊन पाठविले गेले आहे, तोच तुम्हाला मी पोहचवित आहे, परंतु मी असे पाहतो की तुम्ही मूर्खपणा करीत आहात. info
التفاسير:

external-link copy
24 : 46

فَلَمَّا رَاَوْهُ عَارِضًا مُّسْتَقْبِلَ اَوْدِیَتِهِمْ ۙ— قَالُوْا هٰذَا عَارِضٌ مُّمْطِرُنَا ؕ— بَلْ هُوَ مَا اسْتَعْجَلْتُمْ بِهٖ ؕ— رِیْحٌ فِیْهَا عَذَابٌ اَلِیْمٌ ۟ۙ

२४. मग जेव्हा त्यांनी अज़ाब (शिक्षा - यातने) ला ढगाच्या स्वरूपात पाहिले आपल्या मैदानांकडे येत असलेला, तेव्हा म्हणू लागले की हा ढग आमच्यावर पाऊस पाडणार आहे (नव्हे), किंबहुना, वस्तुतः हा ढग तो (प्रकोप) आहे ज्याची तुम्ही घाई माजवित होते. ही हवा (वादळ) आहे ज्यात दुःखदायक अज़ाब (शिक्षा - यातना) आहे. info
التفاسير:

external-link copy
25 : 46

تُدَمِّرُ كُلَّ شَیْ بِاَمْرِ رَبِّهَا فَاَصْبَحُوْا لَا یُرٰۤی اِلَّا مَسٰكِنُهُمْ ؕ— كَذٰلِكَ نَجْزِی الْقَوْمَ الْمُجْرِمِیْنَ ۟

२५. जी आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाने, प्रत्येक वस्तूंचा विध्वंस करून टाकील, तेव्हा त्यांची अशी अवस्था झाली की त्यांच्या घरांखेरीज दुसरे काही दिसून येत नव्हते. अपराध्यांच्या समूहाला आम्ही अशाच प्रकारे शिक्षा देतो. info
التفاسير:

external-link copy
26 : 46

وَلَقَدْ مَكَّنّٰهُمْ فِیْمَاۤ اِنْ مَّكَّنّٰكُمْ فِیْهِ وَجَعَلْنَا لَهُمْ سَمْعًا وَّاَبْصَارًا وَّاَفْـِٕدَةً ۖؗ— فَمَاۤ اَغْنٰی عَنْهُمْ سَمْعُهُمْ وَلَاۤ اَبْصَارُهُمْ وَلَاۤ اَفْـِٕدَتُهُمْ مِّنْ شَیْءٍ اِذْ كَانُوْا یَجْحَدُوْنَ بِاٰیٰتِ اللّٰهِ وَحَاقَ بِهِمْ مَّا كَانُوْا بِهٖ یَسْتَهْزِءُوْنَ ۟۠

२६. आणि निश्चितपणे आम्ही (आदच्या समुदायाला) ते शक्ती-सामर्थ्य प्रदान केले होते, जे तुम्हाला दिलेच नाही आणि आम्ही त्यांना कान, डोळे आणि हृदयेही देऊन ठेवली होती, परंतु त्यांच्या कांनानी, डोळ्यांनी आणि हृदयांनी त्यांना काहीच लाभ पोहचविला नाही. जेव्हा ते अल्लाहच्या आयतींचा इन्कार करू लागले आणि ज्या गोष्टीची ते थट्टा उडवित असत, तीच त्यांच्यावर उलटली. info
التفاسير:

external-link copy
27 : 46

وَلَقَدْ اَهْلَكْنَا مَا حَوْلَكُمْ مِّنَ الْقُرٰی وَصَرَّفْنَا الْاٰیٰتِ لَعَلَّهُمْ یَرْجِعُوْنَ ۟

२७. आणि निःसंशय, आम्ही तुमच्या जवळपास (प्रदेशा) च्या वस्त्यांचा नायनाट करून टाकला, आणि (अनेक प्रकारे) आम्ही आपल्या निशाण्या सादर केल्या, यासाठी की त्यांनी (अल्लाहकडे) वळावे. info
التفاسير:

external-link copy
28 : 46

فَلَوْلَا نَصَرَهُمُ الَّذِیْنَ اتَّخَذُوْا مِنْ دُوْنِ اللّٰهِ قُرْبَانًا اٰلِهَةً ؕ— بَلْ ضَلُّوْا عَنْهُمْ ۚ— وَذٰلِكَ اِفْكُهُمْ وَمَا كَانُوْا یَفْتَرُوْنَ ۟

२८. तेव्हा अल्लाहचे सान्निध्य प्राप्त करण्याकरिता त्यांनी ज्यांना ज्यांना उपास्य (दैवत) बनवून ठेवले होते, त्यांनी त्यांची मदत का नाही केली, किंबहुना ते तर त्यांच्यापासून हरवले गेलेत (वस्तुतः) हे त्यांचे केवळ असत्य आणि (पूर्णतः) मिथ्यारोप होता. info
التفاسير: