আল-কোৰআনুল কাৰীমৰ অৰ্থানুবাদ - মাৰাঠী অনুবাদ- মুহাম্মদ শ্বফী আনচাৰী

external-link copy
32 : 43

اَهُمْ یَقْسِمُوْنَ رَحْمَتَ رَبِّكَ ؕ— نَحْنُ قَسَمْنَا بَیْنَهُمْ مَّعِیْشَتَهُمْ فِی الْحَیٰوةِ الدُّنْیَا وَرَفَعْنَا بَعْضَهُمْ فَوْقَ بَعْضٍ دَرَجٰتٍ لِّیَتَّخِذَ بَعْضُهُمْ بَعْضًا سُخْرِیًّا ؕ— وَرَحْمَتُ رَبِّكَ خَیْرٌ مِّمَّا یَجْمَعُوْنَ ۟

३२. काय तुमच्या पालनकर्त्याच्या दया-कृपेची हे विभागणी करतात? आम्हीच त्यांच्या ऐहिक जीवनाची (आजिविका) त्यांच्यात वाटून दिली आहे आणि एकाला दुसऱ्याहून अधिक चांगले केले आहे यासाठी की एकमेकांना अधीन करून घ्यावे आणि ज्याला हे लोक जमा करीत फिरत आहेत, त्याहून तुमच्या पालनकर्त्याची दया - कृपा अतिशय उत्तम आहे. info
التفاسير: