আল-কোৰআনুল কাৰীমৰ অৰ্থানুবাদ - মাৰাঠী অনুবাদ- মুহাম্মদ শ্বফী আনচাৰী

পৃষ্ঠা নং:close

external-link copy
23 : 42

ذٰلِكَ الَّذِیْ یُبَشِّرُ اللّٰهُ عِبَادَهُ الَّذِیْنَ اٰمَنُوْا وَعَمِلُوا الصّٰلِحٰتِ ؕ— قُلْ لَّاۤ اَسْـَٔلُكُمْ عَلَیْهِ اَجْرًا اِلَّا الْمَوَدَّةَ فِی الْقُرْبٰی ؕ— وَمَنْ یَّقْتَرِفْ حَسَنَةً نَّزِدْ لَهٗ فِیْهَا حُسْنًا ؕ— اِنَّ اللّٰهَ غَفُوْرٌ شَكُوْرٌ ۟

२३. हेच ते होय, ज्याचा शुभ समाचार अल्लाह त्या दासांना देत आहे ज्यांनी ईमान राखले आणि (पैगंबर आचरणशैलीनुसार) कर्म करीत राहिले, तेव्हा सांगा की मी त्याबद्दल तुमच्याकडून कसलाही मोबदला इच्छित नाही, परंतु नाते-संबंधाचे प्रेम, आणि जो मनुष्य सत्कर्म करील आम्ही त्याच्या सत्कर्मात आणखी जास्त वाढकरू. निःसंशय, अल्लाह मोठा माफ करणारा, मोठा कदर जाणणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
24 : 42

اَمْ یَقُوْلُوْنَ افْتَرٰی عَلَی اللّٰهِ كَذِبًا ۚ— فَاِنْ یَّشَاِ اللّٰهُ یَخْتِمْ عَلٰی قَلْبِكَ ؕ— وَیَمْحُ اللّٰهُ الْبَاطِلَ وَیُحِقُّ الْحَقَّ بِكَلِمٰتِهٖ ؕ— اِنَّهٗ عَلِیْمٌۢ بِذَاتِ الصُّدُوْرِ ۟

२४. काय हे असे सांगतात की (पैगंबराने) अल्लाहविषयी खोटे रचले आहे. अल्लाहने इच्छिले तर तुमच्या हृदयावर मोहर लावील, आणि अल्लाह आपल्या कथनांनी असत्याला मिटवितो आणि सत्याला बाकी राखतो. तो तर छाती (मना) तल्या गुप्त गोष्टीही जाणणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
25 : 42

وَهُوَ الَّذِیْ یَقْبَلُ التَّوْبَةَ عَنْ عِبَادِهٖ وَیَعْفُوْا عَنِ السَّیِّاٰتِ وَیَعْلَمُ مَا تَفْعَلُوْنَ ۟ۙ

२५. आणि तोच आहे जो आपल्या दासांची तौबा (क्षमा - याचना) कबूल करतो१ आणि अपराधांना क्षमा करतो आणि तुम्ही जे काही करीत आहात, ते सर्व जाणतो. info

(१) तौबा (क्षमा - याचना) चा अर्थ अपराधावर पश्चात्ताप करून लज्जित होणे आणि भविष्यात तो गुन्हा न करण्याचा दृढसंकल्प करणे. केवळ तोंडाने तौबा करणे व तो गुन्हा आणि अवज्ञाकारीतेचे कर्म करीत राहणे, आणि तौबाचा देखावा करणे खऱ्या अर्थाने तौबा नव्हे. ही तर तौबाची थट्टा-मस्करी होय. तरी देखील मनापासून केलेली सच्ची तौबा अल्लाह अवश्य कबूल करतो.

التفاسير:

external-link copy
26 : 42

وَیَسْتَجِیْبُ الَّذِیْنَ اٰمَنُوْا وَعَمِلُوا الصّٰلِحٰتِ وَیَزِیْدُهُمْ مِّنْ فَضْلِهٖ ؕ— وَالْكٰفِرُوْنَ لَهُمْ عَذَابٌ شَدِیْدٌ ۟

२६. आणि ईमान राखणाऱ्यांची व नेक सदाचारी लोकांची (दुआ - प्रार्थना) ऐकतो आणि त्यांना आपल्या कृपेने आणखी जास्त प्रदान करतो, आणि काफिरांसाठी कठोर शिक्षा - यातना आहे. info
التفاسير:

external-link copy
27 : 42

وَلَوْ بَسَطَ اللّٰهُ الرِّزْقَ لِعِبَادِهٖ لَبَغَوْا فِی الْاَرْضِ وَلٰكِنْ یُّنَزِّلُ بِقَدَرٍ مَّا یَشَآءُ ؕ— اِنَّهٗ بِعِبَادِهٖ خَبِیْرٌ بَصِیْرٌ ۟

२७. आणि जर अल्लाहने आपल्या समस्त दासांना विशालतापूर्वक रोजी (आजिविका) दिली असती तर त्यांनी धरतीवर उत्पात (फसाद) माजविला असता, परंतु तो अनुमानाने जे काही इच्छितो अवतरित करतो. तो आपल्या दासांविषयी चांगल्या प्रकारे जाणकार आहे आणि चांगल्या प्रकारे पाहणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
28 : 42

وَهُوَ الَّذِیْ یُنَزِّلُ الْغَیْثَ مِنْ بَعْدِ مَا قَنَطُوْا وَیَنْشُرُ رَحْمَتَهٗ ؕ— وَهُوَ الْوَلِیُّ الْحَمِیْدُ ۟

२८. आणि तोच होय, जो लोकांचे निराश झाल्यानंतर पर्जन्यवृष्टी करतो. आणि आपल्या दयेला विस्तृत करतो. तोच आहे मित्र- सहाय्यक, आणि श्रेष्ठता व प्रशंसेस पात्र. info
التفاسير:

external-link copy
29 : 42

وَمِنْ اٰیٰتِهٖ خَلْقُ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ وَمَا بَثَّ فِیْهِمَا مِنْ دَآبَّةٍ ؕ— وَهُوَ عَلٰی جَمْعِهِمْ اِذَا یَشَآءُ قَدِیْرٌ ۟۠

२९. आणि त्याच्या निशाण्यांपैकी आकाश व धरतीचे निर्माण करणे, आणि त्यांच्यात सजीवांना पसरविणे होय. तो या गोष्टीसही समर्थ आहे की जेव्हा इच्छिल त्यांना एकत्र करील. info
التفاسير:

external-link copy
30 : 42

وَمَاۤ اَصَابَكُمْ مِّنْ مُّصِیْبَةٍ فَبِمَا كَسَبَتْ اَیْدِیْكُمْ وَیَعْفُوْا عَنْ كَثِیْرٍ ۟ؕ

३०. आणि जे काही संकट तुम्हाला पोहोचते, ते तुमच्या आपल्या हातांच्या दुष्कर्मांचे (फळ) आहे आणि तो बहुतेक गोष्टींना माफ करतो. info
التفاسير:

external-link copy
31 : 42

وَمَاۤ اَنْتُمْ بِمُعْجِزِیْنَ فِی الْاَرْضِ ۖۚ— وَمَا لَكُمْ مِّنْ دُوْنِ اللّٰهِ مِنْ وَّلِیٍّ وَّلَا نَصِیْرٍ ۟

३१. आणि तुम्ही आम्हाला धरतीवर अगतिक (लाचार) करणारे नाहीत. आणि तुमच्यासाठी अल्लाहखेरीज कोणीही मित्र - सहाय्यक नाही आणि ना कोणी मदत करणारा. info
التفاسير: