আল-কোৰআনুল কাৰীমৰ অৰ্থানুবাদ - মাৰাঠী অনুবাদ- মুহাম্মদ শ্বফী আনচাৰী

পৃষ্ঠা নং:close

external-link copy
21 : 41

وَقَالُوْا لِجُلُوْدِهِمْ لِمَ شَهِدْتُّمْ عَلَیْنَا ؕ— قَالُوْۤا اَنْطَقَنَا اللّٰهُ الَّذِیْۤ اَنْطَقَ كُلَّ شَیْءٍ وَّهُوَ خَلَقَكُمْ اَوَّلَ مَرَّةٍ وَّاِلَیْهِ تُرْجَعُوْنَ ۟

२१. आणि आपल्या त्वचांना म्हणतील की तुम्ही आमच्याविरूद्ध साक्ष का दिली, ते उत्तर देतील की आम्हाला त्या अल्लाहने बोलण्याचे सामर्थ्य प्रदान केले, ज्याने प्रत्येक वस्तूला बोलण्याचे सामर्थ्य प्रदान केले आहे. त्यानेच पहिल्यांदा तुम्हाला निर्माण केले आणि त्याच्याच कडे तुम्ही सर्व परतविले जाल. info
التفاسير:

external-link copy
22 : 41

وَمَا كُنْتُمْ تَسْتَتِرُوْنَ اَنْ یَّشْهَدَ عَلَیْكُمْ سَمْعُكُمْ وَلَاۤ اَبْصَارُكُمْ وَلَا جُلُوْدُكُمْ وَلٰكِنْ ظَنَنْتُمْ اَنَّ اللّٰهَ لَا یَعْلَمُ كَثِیْرًا مِّمَّا تَعْمَلُوْنَ ۟

२२. आणि तुम्ही (आपली दुष्कर्मे) या कारणाने लपवून ठेवतच नव्हते की तुमच्यावर तुमचे कान, तुमचे डोळे आणि तुमच्या त्वचा साक्ष देतील आणि तुम्ही असे समजत राहिलात की तुम्ही जे काही करीत आहात, त्यापैकी बहुतेक कर्मांशी अल्लाह अनभिज्ञ आहे. info
التفاسير:

external-link copy
23 : 41

وَذٰلِكُمْ ظَنُّكُمُ الَّذِیْ ظَنَنْتُمْ بِرَبِّكُمْ اَرْدٰىكُمْ فَاَصْبَحْتُمْ مِّنَ الْخٰسِرِیْنَ ۟

२३. आणि तुमच्या या कुविचारांनी, जे तुम्ही आपल्या पालनकर्त्याविषयी केलेले होते, तुमचा सर्वनाश केला आणि शेवटी तुम्ही नुकसान उचलणाऱ्यांपैकी झालात. info
التفاسير:

external-link copy
24 : 41

فَاِنْ یَّصْبِرُوْا فَالنَّارُ مَثْوًی لَّهُمْ ؕ— وَاِنْ یَّسْتَعْتِبُوْا فَمَا هُمْ مِّنَ الْمُعْتَبِیْنَ ۟

२४. आता जर हे सहनशीलता राखतील, तरीही त्यांचे ठिकाण जहन्नमच आहे आणि जर हे तौबा (क्षमा-याचना) ही करू इच्छितील, तरीही त्यांना माफ केले जाणार नाही. info
التفاسير:

external-link copy
25 : 41

وَقَیَّضْنَا لَهُمْ قُرَنَآءَ فَزَیَّنُوْا لَهُمْ مَّا بَیْنَ اَیْدِیْهِمْ وَمَا خَلْفَهُمْ وَحَقَّ عَلَیْهِمُ الْقَوْلُ فِیْۤ اُمَمٍ قَدْ خَلَتْ مِنْ قَبْلِهِمْ مِّنَ الْجِنِّ وَالْاِنْسِ ۚ— اِنَّهُمْ كَانُوْا خٰسِرِیْنَ ۟۠

२५. आणि आम्ही त्यांचे काही साथीदार निर्धारित केलेले होते, ज्यांनी त्यांच्या पुढच्या मागच्या कर्मांना त्यांच्या नजरेत सुंदर सुशोभित बनवून ठेवले होते, आणि त्यांच्या बाबतीतही अल्लाहचा वायदा त्या जनसमूहांसोबत पूर्ण झाल, जे त्यांच्यापूर्वी जिन्नांचे आणि मानवांचे होऊन गेले आहेत. निःसंशय ते नुकसान उचलणारे सिद्ध ठरले. info
التفاسير:

external-link copy
26 : 41

وَقَالَ الَّذِیْنَ كَفَرُوْا لَا تَسْمَعُوْا لِهٰذَا الْقُرْاٰنِ وَالْغَوْا فِیْهِ لَعَلَّكُمْ تَغْلِبُوْنَ ۟

२६. आणि काफिर म्हणाले, या कुरआनास ऐकूच नका (त्याचे पठण होत असताना) आणि वाह्यात बडबड करा, नवल नव्हे की तुम्ही वरचढ ठराल. info
التفاسير:

external-link copy
27 : 41

فَلَنُذِیْقَنَّ الَّذِیْنَ كَفَرُوْا عَذَابًا شَدِیْدًا وَّلَنَجْزِیَنَّهُمْ اَسْوَاَ الَّذِیْ كَانُوْا یَعْمَلُوْنَ ۟

२७. तर निःसंशय, आम्ही त्या काफिरांना सक्त अज़ाब (शिक्षे) ची गोडी चाखवू आणि त्यांना त्यांच्या अतिशय वाईट कर्माचा मोबदला (निश्चितच) देऊ. info
التفاسير:

external-link copy
28 : 41

ذٰلِكَ جَزَآءُ اَعْدَآءِ اللّٰهِ النَّارُ ۚ— لَهُمْ فِیْهَا دَارُ الْخُلْدِ ؕ— جَزَآءً بِمَا كَانُوْا بِاٰیٰتِنَا یَجْحَدُوْنَ ۟

२८. अल्लाहच्या शत्रूंचा मोबदला (शिक्षा) जहन्नमची हीच आग आहे, ज्यात त्यांचे नेहमीचे घर आहे. (हा) मोबदला आहे, आमच्या आयतींचा इन्कार करणाऱ्यांचा. info
التفاسير:

external-link copy
29 : 41

وَقَالَ الَّذِیْنَ كَفَرُوْا رَبَّنَاۤ اَرِنَا الَّذَیْنِ اَضَلّٰنَا مِنَ الْجِنِّ وَالْاِنْسِ نَجْعَلْهُمَا تَحْتَ اَقْدَامِنَا لِیَكُوْنَا مِنَ الْاَسْفَلِیْنَ ۟

२९. आणि काफिर लोक म्हणतील की हे आमच्या पालनकर्त्या! आम्हाला जिन्न आणि मानवांच्या त्या (दोन्ही समूहां) ना दाखव, ज्यांनी आम्हाला मार्गभ्रष्ट केले, (यासाठी की) आम्ही त्यांना आपला पायाखाली तुडवावे यासाठी की ते खूप खाली (सक्त शिक्षा - यातनाग्रस्त) व्हावेत. info
التفاسير: