আল-কোৰআনুল কাৰীমৰ অৰ্থানুবাদ - মাৰাঠী অনুবাদ- মুহাম্মদ শ্বফী আনচাৰী

পৃষ্ঠা নং:close

external-link copy
62 : 38

وَقَالُوْا مَا لَنَا لَا نَرٰی رِجَالًا كُنَّا نَعُدُّهُمْ مِّنَ الْاَشْرَارِ ۟ؕ

६२. आणि (जहन्नमवासी) म्हणतील की, हे काय! आम्हाला ते लोक दिसून येत नाहीत, ज्यांची गणना आम्ही वाईट लोकांमध्ये करीत होतो. info
التفاسير:

external-link copy
63 : 38

اَتَّخَذْنٰهُمْ سِخْرِیًّا اَمْ زَاغَتْ عَنْهُمُ الْاَبْصَارُ ۟

६३. काय आम्हीच त्यांना थट्टा-मस्करी बनवून ठेवले होते की आमचे डोळे त्यांच्यापासून बहकून गेले आहेत. info
التفاسير:

external-link copy
64 : 38

اِنَّ ذٰلِكَ لَحَقٌّ تَخَاصُمُ اَهْلِ النَّارِ ۟۠

६४. निःसंशय, जहन्नमवाल्यांचे हे भांडण अवश्य होईल. info
التفاسير:

external-link copy
65 : 38

قُلْ اِنَّمَاۤ اَنَا مُنْذِرٌ ۖۗ— وَّمَا مِنْ اِلٰهٍ اِلَّا اللّٰهُ الْوَاحِدُ الْقَهَّارُ ۟ۚ

६५. सांगा की मी तर केवळ एक खबरदार करणारा आहे आणि एकमेव जबरदस्त अल्लाहखेरीज दुसरा कोणीही उपासनेस पात्र नाही. info
التفاسير:

external-link copy
66 : 38

رَبُّ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ وَمَا بَیْنَهُمَا الْعَزِیْزُ الْغَفَّارُ ۟

६६. जो स्वामी व पालनकर्ता आहे आकाशांचा आणि धरतीचा, आणि जे काही त्यांच्या दरम्यान आहे, तो मोठा जबरदस्त (महान) आणि मोठा माफ करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
67 : 38

قُلْ هُوَ نَبَؤٌا عَظِیْمٌ ۟ۙ

६७. सांगा की ही फार मोठी खबर आहे. info
التفاسير:

external-link copy
68 : 38

اَنْتُمْ عَنْهُ مُعْرِضُوْنَ ۟

६८. तिच्यापासून तुम्ही तोंड फिरवित आहात. info
التفاسير:

external-link copy
69 : 38

مَا كَانَ لِیَ مِنْ عِلْمٍ بِالْمَلَاِ الْاَعْلٰۤی اِذْ یَخْتَصِمُوْنَ ۟

६९. मला त्या उच्च पदस्थ फरिश्त्यां (च्या संभाषणा) चे किंचितही ज्ञान नाही, जेव्हा ते भांडण करीत होते. info
التفاسير:

external-link copy
70 : 38

اِنْ یُّوْحٰۤی اِلَیَّ اِلَّاۤ اَنَّمَاۤ اَنَا نَذِیْرٌ مُّبِیْنٌ ۟

७०. माझ्याकडे केवळ हीच वहयी केली जाते की मी तर स्पष्टपणे सावध करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
71 : 38

اِذْ قَالَ رَبُّكَ لِلْمَلٰٓىِٕكَةِ اِنِّیْ خَالِقٌۢ بَشَرًا مِّنْ طِیْنٍ ۟

७१. जेव्हा तुमच्या पालनकर्त्या (अल्लाह) ने फरिश्त्यांना सांगितले, मी मातीपासून मानवाला निर्माण करणार आहे. info
التفاسير:

external-link copy
72 : 38

فَاِذَا سَوَّیْتُهٗ وَنَفَخْتُ فِیْهِ مِنْ رُّوْحِیْ فَقَعُوْا لَهٗ سٰجِدِیْنَ ۟

७२. तर जेव्हा मी त्याला यथायोग्य करीन आणि त्याच्यात आपला आत्मा फुंकीन, तेव्हा तुम्ही सर्व त्याच्यासमोर सजदा करा१ (माथा टेका) info

(१) हा सजदा (माथा टेकणे) आभार किंवा आदराप्रित्यर्थ आहे, उपासनेचा सजदा नाही. आदर-सन्मानाचा हा सजदा पूर्वी उचित होता. यास्तव अल्लाहने सर्व फरिश्त्यांना, आदमला सजदा करण्याचा आदेश दिला. आता इस्लाम धर्मात सन्मानपूर्वक सजदा कोणाकरिताही उचित नाही. हदीसमधील उल्लेखानुसार पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी फर्माविले, ‘‘जर हे उचित असते तर मी पत्नीला आदेश दिला असता की तिने आपल्या पतीला सजदा करावा.’’ (मिश्कात, किताबुन्निकाह बाबु इशतिन्निसाए, संदर्भ तिर्मिजी, अलबानीच्या मते आपल्या साक्षींच्या आधारावर हे हदीसवचन खरे (उचित) आहे.)

التفاسير:

external-link copy
73 : 38

فَسَجَدَ الْمَلٰٓىِٕكَةُ كُلُّهُمْ اَجْمَعُوْنَ ۟ۙ

७३. तेव्हा सर्व फरिश्त्यांनी सजदा केला. info
التفاسير:

external-link copy
74 : 38

اِلَّاۤ اِبْلِیْسَ ؕ— اِسْتَكْبَرَ وَكَانَ مِنَ الْكٰفِرِیْنَ ۟

७४. परंतु इब्लिसने (केला नाही) त्याने घमेंड केली आणि तो इन्कार करणाऱ्यांपैकी होता. info
التفاسير:

external-link copy
75 : 38

قَالَ یٰۤاِبْلِیْسُ مَا مَنَعَكَ اَنْ تَسْجُدَ لِمَا خَلَقْتُ بِیَدَیَّ ؕ— اَسْتَكْبَرْتَ اَمْ كُنْتَ مِنَ الْعَالِیْنَ ۟

७५. (अल्लाहने) फर्माविले की हे इब्लिस! त्याला (आदमला) सजदा करण्यापासून तुला कोणत्या गोष्टीने रोखले, ज्याला मी आपल्या हातांनी बनविले, काय तू गर्विष्ठ झाला आहेस की तू उच्च दर्जा राखणाऱ्यांपैकी आहेस? info
التفاسير:

external-link copy
76 : 38

قَالَ اَنَا خَیْرٌ مِّنْهُ ؕ— خَلَقْتَنِیْ مِنْ نَّارٍ وَّخَلَقْتَهٗ مِنْ طِیْنٍ ۟

७६. (त्याने) उत्तर दिले की मी याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे, तू मला आगीपासून निर्माण केले आणि याला मातीपासून निर्माण केले. info
التفاسير:

external-link copy
77 : 38

قَالَ فَاخْرُجْ مِنْهَا فَاِنَّكَ رَجِیْمٌ ۟ۙۖ

७७. फर्माविले की तू येथून निघून जा, तू तिरस्कृत (धिःक्कारित) झाला. info
التفاسير:

external-link copy
78 : 38

وَّاِنَّ عَلَیْكَ لَعْنَتِیْۤ اِلٰی یَوْمِ الدِّیْنِ ۟

७८. आणि कयामतच्या दिवसापर्यंत तुझा माझ्यातर्फे धिःक्कार आहे. info
التفاسير:

external-link copy
79 : 38

قَالَ رَبِّ فَاَنْظِرْنِیْۤ اِلٰی یَوْمِ یُبْعَثُوْنَ ۟

७९. तो म्हणाला, हे माझ्या स्वामी! मला त्या दिवसापर्यंत सवड प्रदान कर, जेव्हा लोक (जिवंत करून) उठविले जातील. info
التفاسير:

external-link copy
80 : 38

قَالَ فَاِنَّكَ مِنَ الْمُنْظَرِیْنَ ۟ۙ

८०. (अल्लाहने) फर्माविले, तू सवड दिल्या जाणाऱ्यांपैकी आहेस. info
التفاسير:

external-link copy
81 : 38

اِلٰی یَوْمِ الْوَقْتِ الْمَعْلُوْمِ ۟

८१. निर्धारित वेळेच्या दिवसापर्यंत . info
التفاسير:

external-link copy
82 : 38

قَالَ فَبِعِزَّتِكَ لَاُغْوِیَنَّهُمْ اَجْمَعِیْنَ ۟ۙ

८२. म्हणाला, मग तर तुझ्या प्रतिष्ठेची शपथ! मी या सर्वांना अवश्य भटकवीन. info
التفاسير:

external-link copy
83 : 38

اِلَّا عِبَادَكَ مِنْهُمُ الْمُخْلَصِیْنَ ۟

८३. मात्र तुझ्या त्या दासांखेरीज, जे निवडक (आणि प्रिय, पवित्र) असतील. info
التفاسير: