আল-কোৰআনুল কাৰীমৰ অৰ্থানুবাদ - মাৰাঠী অনুবাদ- মুহাম্মদ শ্বফী আনচাৰী

external-link copy
62 : 36

وَلَقَدْ اَضَلَّ مِنْكُمْ جِبِلًّا كَثِیْرًا ؕ— اَفَلَمْ تَكُوْنُوْا تَعْقِلُوْنَ ۟

६२. आणि सैतानाने तर तुमच्यापैकी अधिकांश समूहांना मार्गभ्रष्ट केले आहे. काय तुम्ही अक्कल नाही बाळगत?१ info

(१) अर्थात तुम्हाला एवढी सुद्धा अक्कल नाही की सैतान तुमचा शत्रू आहे, त्याचे म्हणणे मान्य करालया नको आणि मी (अल्लाह) तुमचा स्वामी व पालनकर्ता आहे. मीच तुम्हाला रोजीरोटी देतो आणि मीच तुमचे रात्रंदिवस संरक्षण करतो, यास्तव तुम्ही माझा आदेश मानला पाहिजे. तुम्ही तर सैतानाचे शत्रुत्व आणि माझ्या उपासनेचा हक्क न जाणून निर्बुद्धता आणि मूर्खपणा दाखवित आहात.

التفاسير: