আল-কোৰআনুল কাৰীমৰ অৰ্থানুবাদ - মাৰাঠী অনুবাদ- মুহাম্মদ শ্বফী আনচাৰী

পৃষ্ঠা নং:close

external-link copy
21 : 32

وَلَنُذِیْقَنَّهُمْ مِّنَ الْعَذَابِ الْاَدْنٰی دُوْنَ الْعَذَابِ الْاَكْبَرِ لَعَلَّهُمْ یَرْجِعُوْنَ ۟

२१. आणि निःसंशय, आम्ही त्यांना निकटच्या काही लहान शिक्षा - यातना,१ त्या मोठ्या अज़ाबच्या व्यतिरिक्त चाखवू यासाठी की त्यांनी रुजू व्हावे. info

(१) निकटच्या काही शिक्षा - यातनांशी अभिप्रेत ऐहिक यातना किंवा ऐहिक जीवनातील दुःख आणि रोग वगैरे होत. काहींच्या मते यास अभिप्रेत हत्या होय. ज्याद्वारे बद्रच्या युद्धात काफिर पीडित झाले किंवा तो दुष्काळ होय जो मक्काच्या रहिवाशांवर पडला होता. इमाम शौकानी म्हणतात, या सर्व अवस्था आणि परिस्थितीचा यात समावेश होऊ शकतो.

التفاسير:

external-link copy
22 : 32

وَمَنْ اَظْلَمُ مِمَّنْ ذُكِّرَ بِاٰیٰتِ رَبِّهٖ ثُمَّ اَعْرَضَ عَنْهَا ؕ— اِنَّا مِنَ الْمُجْرِمِیْنَ مُنْتَقِمُوْنَ ۟۠

२२. आणि त्याहून अधिक अत्याचारी कोण आहे, ज्याला अल्लाहच्या आयतींद्वारे प्रवचन दिले जावे तरीही त्याने त्यापासून तोंड फिरवावे. निश्चितच आम्हीही दुराचाऱ्यांशी सूड (बदला) घेणार आहोत. info
التفاسير:

external-link copy
23 : 32

وَلَقَدْ اٰتَیْنَا مُوْسَی الْكِتٰبَ فَلَا تَكُنْ فِیْ مِرْیَةٍ مِّنْ لِّقَآىِٕهٖ وَجَعَلْنٰهُ هُدًی لِّبَنِیْۤ اِسْرَآءِیْلَ ۟ۚ

२३. आणि वस्तुतः आम्ही मूसाला ग्रंथ प्रदान केला तेव्हा तुम्ही त्याच्या प्राप्तीसंबंधी कधीही संशय करू नये आणि आम्ही त्यास इस्राईलच्या संततीच्या मार्गदर्शनाचे साधन बनविले. info
التفاسير:

external-link copy
24 : 32

وَجَعَلْنَا مِنْهُمْ اَىِٕمَّةً یَّهْدُوْنَ بِاَمْرِنَا لَمَّا صَبَرُوْا ؕ۫— وَكَانُوْا بِاٰیٰتِنَا یُوْقِنُوْنَ ۟

२४. आणि आम्ही त्यांच्यापैकी ज्याअर्थी त्या लोकांनी सहनशीलता राखली असे नेते (प्रमुख) बनविले, जे आमच्या आदेशाने लोकांना मार्गदर्शन करीत होते आणि आमच्या आयतींवर विश्वास ठेवत होते. info
التفاسير:

external-link copy
25 : 32

اِنَّ رَبَّكَ هُوَ یَفْصِلُ بَیْنَهُمْ یَوْمَ الْقِیٰمَةِ فِیْمَا كَانُوْا فِیْهِ یَخْتَلِفُوْنَ ۟

२५. निःसंशय, तुमचा पालनकर्ता त्या सर्वांच्या दरम्यान या सर्व गोष्टींचा फैसला कयामतच्या दिवशी करेल, ज्या गोष्टींमध्ये ते मतभेद करीत आहेत. info
التفاسير:

external-link copy
26 : 32

اَوَلَمْ یَهْدِ لَهُمْ كَمْ اَهْلَكْنَا مِنْ قَبْلِهِمْ مِّنَ الْقُرُوْنِ یَمْشُوْنَ فِیْ مَسٰكِنِهِمْ ؕ— اِنَّ فِیْ ذٰلِكَ لَاٰیٰتٍ ؕ— اَفَلَا یَسْمَعُوْنَ ۟

२६. काय या गोष्टीनेही त्यांना मार्गदर्शन प्रदान केले नाही की आम्ही त्यांच्या पूर्वीच्या अनेक जमातींना नष्ट करून टाकले, ज्यांच्या वस्त्यांमध्ये हे चालत फिरत आहेत. निश्चितच त्यात मोठे बोध आहेत. काय तरीही हे ऐकत नाही? info
التفاسير:

external-link copy
27 : 32

اَوَلَمْ یَرَوْا اَنَّا نَسُوْقُ الْمَآءَ اِلَی الْاَرْضِ الْجُرُزِ فَنُخْرِجُ بِهٖ زَرْعًا تَاْكُلُ مِنْهُ اَنْعَامُهُمْ وَاَنْفُسُهُمْ ؕ— اَفَلَا یُبْصِرُوْنَ ۟

२७. काय हे पाहत नाही की आम्ही पाण्याला पडीक (नापीक) जमिनीकडे वाहवून नेतो, मग त्याद्वारे आम्ही शेतींना उगवितो, ज्यास त्यांची गुरे-ढोरे आणि ते स्वतःही खातात. काय तरीही यांना दिसून येत नाही? info
التفاسير:

external-link copy
28 : 32

وَیَقُوْلُوْنَ مَتٰی هٰذَا الْفَتْحُ اِنْ كُنْتُمْ صٰدِقِیْنَ ۟

२८. आणि म्हणतात, हा फैसला केव्हा होईल? जर तुम्ही सच्चे असाल तर सांगा. info
التفاسير:

external-link copy
29 : 32

قُلْ یَوْمَ الْفَتْحِ لَا یَنْفَعُ الَّذِیْنَ كَفَرُوْۤا اِیْمَانُهُمْ وَلَا هُمْ یُنْظَرُوْنَ ۟

२९. त्यांना उत्तर द्या की फैसल्याच्या दिवशी ईमान राखणे कुप्र (इन्कार) करणाऱ्यांच्या काहीच उपयोगी पडणार नाही आणि ना त्यांना ढील (सवड) दिली जाईल. info
التفاسير:

external-link copy
30 : 32

فَاَعْرِضْ عَنْهُمْ وَانْتَظِرْ اِنَّهُمْ مُّنْتَظِرُوْنَ ۟۠

३०. आता तुम्ही त्यांचा विचारही सोडून द्या आणि प्रतीक्षा करीत राहा. हे देखील प्रतीक्षा करीत आहेत. info
التفاسير: