আল-কোৰআনুল কাৰীমৰ অৰ্থানুবাদ - মাৰাঠী অনুবাদ- মুহাম্মদ শ্বফী আনচাৰী

পৃষ্ঠা নং:close

external-link copy
146 : 2

اَلَّذِیْنَ اٰتَیْنٰهُمُ الْكِتٰبَ یَعْرِفُوْنَهٗ كَمَا یَعْرِفُوْنَ اَبْنَآءَهُمْ ؕ— وَاِنَّ فَرِیْقًا مِّنْهُمْ لَیَكْتُمُوْنَ الْحَقَّ وَهُمْ یَعْلَمُوْنَ ۟ؔ

१४६. ज्यांना आम्ही ग्रंथ दिला आहे, ते तर याला अशा प्रकारे ओळखतात, ज्या प्रकारे एखादा मनुष्य आपल्या पुत्रांना ओळखतो, त्यांच्यातला एक समूह सत्याला ओळखूनही ते लपवितो. info
التفاسير:

external-link copy
147 : 2

اَلْحَقُّ مِنْ رَّبِّكَ فَلَا تَكُوْنَنَّ مِنَ الْمُمْتَرِیْنَ ۟۠

१४७. तुमच्या पालनकर्त्यातर्फे हे परिपूर्ण सत्य आहे. सावधान! तुम्ही शंका-संशय करणाऱ्यांपैकी होऊ नका. info
التفاسير:

external-link copy
148 : 2

وَلِكُلٍّ وِّجْهَةٌ هُوَ مُوَلِّیْهَا فَاسْتَبِقُوْا الْخَیْرٰتِ ؔؕ— اَیْنَ مَا تَكُوْنُوْا یَاْتِ بِكُمُ اللّٰهُ جَمِیْعًا ؕ— اِنَّ اللّٰهَ عَلٰی كُلِّ شَیْءٍ قَدِیْرٌ ۟

१४८. आणि प्रत्येक मनुष्य कोणत्या न कोणत्या दिशेकडे पर्वृत्त (लक्ष केंद्रित करणारा) असतो. तुम्ही नेकी (सत्कर्मां) कडे धाव घ्या. तुम्ही कोठेही असा अल्लाह तुम्हाला घेऊन येईल. निःसंशय, अल्लाह प्रत्येक गोष्टीचे सामर्थ्य बाळगतो. info
التفاسير:

external-link copy
149 : 2

وَمِنْ حَیْثُ خَرَجْتَ فَوَلِّ وَجْهَكَ شَطْرَ الْمَسْجِدِ الْحَرَامِ ؕ— وَاِنَّهٗ لَلْحَقُّ مِنْ رَّبِّكَ ؕ— وَمَا اللّٰهُ بِغَافِلٍ عَمَّا تَعْمَلُوْنَ ۟

१४९. आणि तुम्ही ज्या ठिकाणाहूनही निघाल आपले तोंड मस्जिदे हरााम (आदरणीय मस्जिद अर्थात काबा) कडे करून घेत जा. तुमच्या पालनकर्त्यातर्फे हेच सत्य आहे आणि जे काही तुम्ही करीत आहात, त्यापासून अल्लाह गाफील नाही. info
التفاسير:

external-link copy
150 : 2

وَمِنْ حَیْثُ خَرَجْتَ فَوَلِّ وَجْهَكَ شَطْرَ الْمَسْجِدِ الْحَرَامِ ؕ— وَحَیْثُ مَا كُنْتُمْ فَوَلُّوْا وُجُوْهَكُمْ شَطْرَهٗ ۙ— لِئَلَّا یَكُوْنَ لِلنَّاسِ عَلَیْكُمْ حُجَّةٌ ۗ— اِلَّا الَّذِیْنَ ظَلَمُوْا مِنْهُمْ ۗ— فَلَا تَخْشَوْهُمْ وَاخْشَوْنِیْ ۗ— وَلِاُتِمَّ نِعْمَتِیْ عَلَیْكُمْ وَلَعَلَّكُمْ تَهْتَدُوْنَ ۟ۙۛ

१५०. आणि ज्या ठिकाणाहूनही तुम्ही निघाल आपले तोंड मस्जिदे हरामकडे करून घ्या आणि ज्या ठिकाणीदेखील तुम्ही राहाल आपले तोंड त्याच्याचकडे (अर्थात काबाकडे) करून घेत जा, यासाठी की लोकांना वाद घालण्याचे कोणतेही प्रमाण बाकी राहू नये, त्यांच्याखेरीज जे यांच्यात अत्याचारी आहेत. तुम्ही त्यांचे भय बाळगू नका, १ फक्त माझेच भय बाळगा, यासाठी की मी आपली कृपा- देणगी (नेमत) तुमच्यावर पूर्ण करावी, आणि यासाठी की तुम्ही मार्गदर्शन प्राप्त करू शकावे. info

(१) अत्याचारींचे भय बाळगू नका म्हणजे अनेकेश्वरवाद्यांच्या कारवायांची काळजी करू नका.

التفاسير:

external-link copy
151 : 2

كَمَاۤ اَرْسَلْنَا فِیْكُمْ رَسُوْلًا مِّنْكُمْ یَتْلُوْا عَلَیْكُمْ اٰیٰتِنَا وَیُزَكِّیْكُمْ وَیُعَلِّمُكُمُ الْكِتٰبَ وَالْحِكْمَةَ وَیُعَلِّمُكُمْ مَّا لَمْ تَكُوْنُوْا تَعْلَمُوْنَ ۟ؕۛ

१५१. ज्या प्रकारे आम्ही तुमच्यात, तुमच्यामधूनच रसूल (पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांना पाठविले, जो आमच्या आयती (पवित्र कुरआन) तुमच्यासमोर वाचून ऐकवितो आणि तुम्हाला स्वच्छ शुद्ध करतो आणि तुम्हाला ग्रंथ आणि हिकमत (बुद्धिमानता) शिकवितो आणि त्या गोष्टीचे ज्ञान देतो, ज्याविषयी तुम्ही अजाण होते. info
التفاسير:

external-link copy
152 : 2

فَاذْكُرُوْنِیْۤ اَذْكُرْكُمْ وَاشْكُرُوْا لِیْ وَلَا تَكْفُرُوْنِ ۟۠

१५२. यासाठी तुम्ही माझे स्मरण करा, मीदेखील तुमचे स्मरण राखीन आणि माझ्याशी कृतज्ञशील राहा आणि कृतघ्नता दाखवू नका. info
التفاسير:

external-link copy
153 : 2

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوا اسْتَعِیْنُوْا بِالصَّبْرِ وَالصَّلٰوةِ ؕ— اِنَّ اللّٰهَ مَعَ الصّٰبِرِیْنَ ۟

१५३. हे ईमान राखणाऱ्यांनो! धीर-संयम आणि नमाजद्वारे मदत मागा. निःसंशय, अल्लाह धीर-संयम राखणाऱ्यांना साथ देतो.१ info

(१) माणसाच्या दोनच अवस्था असतात. सुख-सुविधा (ऐश-आराम) किंवा दुःख आणि संकट. सुख-संपन्न अवस्थेत अल्लाहचे आभार मानण्यावर जोर आणि दुःख यातनेत धीर-संयम राखून नमाजच्या माध्यमाने अल्लाहची मदत प्राप्त करण्यावर जोर आहे.

التفاسير: