আল-কোৰআনুল কাৰীমৰ অৰ্থানুবাদ - মাৰাঠী অনুবাদ- মুহাম্মদ শ্বফী আনচাৰী

পৃষ্ঠা নং:close

external-link copy
73 : 16

وَیَعْبُدُوْنَ مِنْ دُوْنِ اللّٰهِ مَا لَا یَمْلِكُ لَهُمْ رِزْقًا مِّنَ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ شَیْـًٔا وَّلَا یَسْتَطِیْعُوْنَ ۟ۚ

७३. आणि ते अल्लाहशिवाय त्यांची उपासना करतात, जे आकाशांमधून आणि जमिनीतून त्यांना किंचितही रोजी देऊ शकत नाही आणि कसलेही सामर्थ्य बाळगत नाही. info
التفاسير:

external-link copy
74 : 16

فَلَا تَضْرِبُوْا لِلّٰهِ الْاَمْثَالَ ؕ— اِنَّ اللّٰهَ یَعْلَمُ وَاَنْتُمْ لَا تَعْلَمُوْنَ ۟

७४. तेव्हा, सर्वश्रेष्ठ अल्लाहकरिता उदाहरण बनवू नका, अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो आणि तुम्ही नाही जाणत. info
التفاسير:

external-link copy
75 : 16

ضَرَبَ اللّٰهُ مَثَلًا عَبْدًا مَّمْلُوْكًا لَّا یَقْدِرُ عَلٰی شَیْءٍ وَّمَنْ رَّزَقْنٰهُ مِنَّا رِزْقًا حَسَنًا فَهُوَ یُنْفِقُ مِنْهُ سِرًّا وَّجَهْرًا ؕ— هَلْ یَسْتَوٗنَ ؕ— اَلْحَمْدُ لِلّٰهِ ؕ— بَلْ اَكْثَرُهُمْ لَا یَعْلَمُوْنَ ۟

७५. अल्लाह एक उदाहरण सांगत आहे की एक गुलाम आहे दुसऱ्याच्या मालकीचा, जो कसलाही अधिकार राखत नाही आणि एक दुसरा मनुष्य आहे, ज्याला आम्ही आपल्या जवळून फार उत्तम धन देऊन ठेवले आहे. ज्यातून तो लपवून आणि उघडपणे खर्च करतो, काय हे दोन्ही जण समान ठरू शकतात? अल्लाहकरिताच समस्त स्तुती- प्रशंसा आहे. परंतु त्यांच्यापैकी बहुतेक जाणत नाहीत. info
التفاسير:

external-link copy
76 : 16

وَضَرَبَ اللّٰهُ مَثَلًا رَّجُلَیْنِ اَحَدُهُمَاۤ اَبْكَمُ لَا یَقْدِرُ عَلٰی شَیْءٍ وَّهُوَ كَلٌّ عَلٰی مَوْلٰىهُ ۙ— اَیْنَمَا یُوَجِّهْهُّ لَا یَاْتِ بِخَیْرٍ ؕ— هَلْ یَسْتَوِیْ هُوَ ۙ— وَمَنْ یَّاْمُرُ بِالْعَدْلِ ۙ— وَهُوَ عَلٰی صِرَاطٍ مُّسْتَقِیْمٍ ۟۠

७६. आणि अल्लाह एक दुसरे उदाहरण सांगतो दोन माणसांचे, ज्यांच्यापैकी एक मुका आहे आणि कोणत्याही गोष्टीचा अधिकार बाळगत नाही, किंबहुना तो आपल्या मालकावर ओझे आहे, मालक त्याला कोठेही पाठविल पण तो कसलाही भलेपणा आणत नाही. काय हा आणि तो, जो न्यायाचा आदेश देतो आणि सरळ मार्गावरही चालतो, समान असू शकतात? info
التفاسير:

external-link copy
77 : 16

وَلِلّٰهِ غَیْبُ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ ؕ— وَمَاۤ اَمْرُ السَّاعَةِ اِلَّا كَلَمْحِ الْبَصَرِ اَوْ هُوَ اَقْرَبُ ؕ— اِنَّ اللّٰهَ عَلٰی كُلِّ شَیْءٍ قَدِیْرٌ ۟

७७. आणि आकाशांच्या व धरतीच्या (सर्व) लपलेल्या वस्तूंचे ज्ञान केवळ अल्लाहलाच आहे, आणि कयामतची बाब देखील अशीच आहे, जणू पापणीचे झपकणे, किंबहुना याहूनही अधिक जवळ. निःसंशय अल्लाह प्रत्येक गोष्ट करण्याचे सामर्थ्य राखतो. info
التفاسير:

external-link copy
78 : 16

وَاللّٰهُ اَخْرَجَكُمْ مِّنْ بُطُوْنِ اُمَّهٰتِكُمْ لَا تَعْلَمُوْنَ شَیْـًٔا ۙ— وَّجَعَلَ لَكُمُ السَّمْعَ وَالْاَبْصَارَ وَالْاَفْـِٕدَةَ ۙ— لَعَلَّكُمْ تَشْكُرُوْنَ ۟

७८. आणि अल्लाहने तुम्हाला तुमच्या मातांच्या उदरातून बाहेर काढले की त्या वेळी तुम्ही काहीच जाणत नव्हते. त्यानेच तुमचे कान आणि डोळे आणि हृदय बनविले, यासाठी की तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकावे. info
التفاسير:

external-link copy
79 : 16

اَلَمْ یَرَوْا اِلَی الطَّیْرِ مُسَخَّرٰتٍ فِیْ جَوِّ السَّمَآءِ ؕ— مَا یُمْسِكُهُنَّ اِلَّا اللّٰهُ ؕ— اِنَّ فِیْ ذٰلِكَ لَاٰیٰتٍ لِّقَوْمٍ یُّؤْمِنُوْنَ ۟

७९. काय त्या लोकांनी पक्ष्यांना नाही पाहिले, जे आदेशआनुसार आकाशात नियंत्रित आहेत, ज्यांना अल्लाहखेरीज दुसऱ्या कुणी धरून ठेवले नाही. निःसंशय, यात ईमान राखणाऱ्यांकरिता मोठ्या निशाण्या आहेत. info
التفاسير: