আল-কোৰআনুল কাৰীমৰ অৰ্থানুবাদ - মাৰাঠী অনুবাদ- মুহাম্মদ শ্বফী আনচাৰী

পৃষ্ঠা নং:close

external-link copy
34 : 14

وَاٰتٰىكُمْ مِّنْ كُلِّ مَا سَاَلْتُمُوْهُ ؕ— وَاِنْ تَعُدُّوْا نِعْمَتَ اللّٰهِ لَا تُحْصُوْهَا ؕ— اِنَّ الْاِنْسَانَ لَظَلُوْمٌ كَفَّارٌ ۟۠

३४. आणि त्यानेच तुम्हाला तुम्ही मागितलेल्या सर्व वस्तूंपैकी देऊन ठेवल्या आहेत. जर तुम्ही अल्लाहच्या कृपा-देणग्यांची गणना करू इच्छित असाल तर पुरेपूर गणना करूच शकत नाही. निःसंशय मनुष्य मोठा अत्याचारी आणि कृतघ्न आहे. info
التفاسير:

external-link copy
35 : 14

وَاِذْ قَالَ اِبْرٰهِیْمُ رَبِّ اجْعَلْ هٰذَا الْبَلَدَ اٰمِنًا وَّاجْنُبْنِیْ وَبَنِیَّ اَنْ نَّعْبُدَ الْاَصْنَامَ ۟ؕ

३५. (इब्राहीमच्या या दुआ-प्रार्थनेचेही स्मरण करा) जेव्हा इब्राहीम म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! या शहराला शांती-सलामतीचे स्थळ बनव. आणि मला आणि माझ्या संततीला मूर्तीपूजा करण्यापासून वाचव. info
التفاسير:

external-link copy
36 : 14

رَبِّ اِنَّهُنَّ اَضْلَلْنَ كَثِیْرًا مِّنَ النَّاسِ ۚ— فَمَنْ تَبِعَنِیْ فَاِنَّهٗ مِنِّیْ ۚ— وَمَنْ عَصَانِیْ فَاِنَّكَ غَفُوْرٌ رَّحِیْمٌ ۟

३६. हे माझ्या पालनकर्त्या! त्यांनी अनेक लोकांना सरळ मार्गापासून दूर केले आहे. आता जो माझे अनुसरण करील तो माझा आणि आणि जो अवज्ञा करील तर तू मोठा माफ करणारा व दया करणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
37 : 14

رَبَّنَاۤ اِنِّیْۤ اَسْكَنْتُ مِنْ ذُرِّیَّتِیْ بِوَادٍ غَیْرِ ذِیْ زَرْعٍ عِنْدَ بَیْتِكَ الْمُحَرَّمِ ۙ— رَبَّنَا لِیُقِیْمُوا الصَّلٰوةَ فَاجْعَلْ اَفْىِٕدَةً مِّنَ النَّاسِ تَهْوِیْۤ اِلَیْهِمْ وَارْزُقْهُمْ مِّنَ الثَّمَرٰتِ لَعَلَّهُمْ یَشْكُرُوْنَ ۟

३७. हे माझ्या पालनकर्त्या! मी आपल्या काही संततीला या नापीक ओसाड जंगलात तुझ्या पवित्र घराच्या जवळ आबाद केले आहे. हे माझ्या पालनकर्त्या! हे अशासाठी की त्यांनी नमाज कायम करावी, यास्तव तू काही लोकांची मने त्यांच्याकडे आकर्षित कर आणि त्यांना फळांची रोजी (अन्नसामुग्री) प्रदान कर, यासाठी की त्यांनी कृतज्ञता व्यक्त करावी. info
التفاسير:

external-link copy
38 : 14

رَبَّنَاۤ اِنَّكَ تَعْلَمُ مَا نُخْفِیْ وَمَا نُعْلِنُ ؕ— وَمَا یَخْفٰی عَلَی اللّٰهِ مِنْ شَیْءٍ فِی الْاَرْضِ وَلَا فِی السَّمَآءِ ۟

३८. हे आमच्या पालनकर्त्या! तू चांगल्या प्रकारे जाणतो, जे काही आम्ही लपवितो आणि जे जाहीर करतो. धरती आणि आकाशातील कोणतीही वस्तू अल्लाहपासून लपलेली नाही. info
التفاسير:

external-link copy
39 : 14

اَلْحَمْدُ لِلّٰهِ الَّذِیْ وَهَبَ لِیْ عَلَی الْكِبَرِ اِسْمٰعِیْلَ وَاِسْحٰقَ ؕ— اِنَّ رَبِّیْ لَسَمِیْعُ الدُّعَآءِ ۟

३९. अल्लाहची प्रशंसा आहे, ज्याने मला वृक्षावस्थेत इस्माईल आणि इसहाक प्रदान केले. निःसंशय माझा पालनकर्ता (अल्लाह) दुआ-प्रार्थना ऐकणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
40 : 14

رَبِّ اجْعَلْنِیْ مُقِیْمَ الصَّلٰوةِ وَمِنْ ذُرِّیَّتِیْ ۖۗ— رَبَّنَا وَتَقَبَّلْ دُعَآءِ ۟

४०. हे माझ्या पालनकर्त्या! मला आणि माझ्या संततीला नमाज कायम राखणारा बनव. माझ्या पालनकर्त्या! माझी दुआ कबूल कर. info
التفاسير:

external-link copy
41 : 14

رَبَّنَا اغْفِرْ لِیْ وَلِوَالِدَیَّ وَلِلْمُؤْمِنِیْنَ یَوْمَ یَقُوْمُ الْحِسَابُ ۟۠

४१. हे आमच्या पालनकर्त्या! मला क्षमा प्रदान कर आणि माझ्या माता-पित्यासह माफ कर आणि इतर ईमान राखणाऱ्यांनाही माफ कर, ज्या दिवशी (कर्मांचा) हिशोब होईल. info
التفاسير:

external-link copy
42 : 14

وَلَا تَحْسَبَنَّ اللّٰهَ غَافِلًا عَمَّا یَعْمَلُ الظّٰلِمُوْنَ ؕ۬— اِنَّمَا یُؤَخِّرُهُمْ لِیَوْمٍ تَشْخَصُ فِیْهِ الْاَبْصَارُ ۟ۙ

४२. अत्याचारी लोकांच्या कर्मांपासून अल्लाहला बेखबर समजू नका त्याने तर त्यांना त्या दिवसापर्यंत संधी देऊन ठेवली आहे, ज्या दिवशी डोळे विस्फारलेले(फाटलेल)ेे राहतील. info
التفاسير: