আল-কোৰআনুল কাৰীমৰ অৰ্থানুবাদ - মাৰাঠী অনুবাদ- মুহাম্মদ শ্বফী আনচাৰী

পৃষ্ঠা নং:close

external-link copy
70 : 12

فَلَمَّا جَهَّزَهُمْ بِجَهَازِهِمْ جَعَلَ السِّقَایَةَ فِیْ رَحْلِ اَخِیْهِ ثُمَّ اَذَّنَ مُؤَذِّنٌ اَیَّتُهَا الْعِیْرُ اِنَّكُمْ لَسٰرِقُوْنَ ۟

७०. मग जेव्हा त्यांचे सामान (धान्याने भरून) तयार केले तेव्हा आपल्या भावाच्या सामानात आपला पाणी पिण्याचा प्याला ठेवून दिला, मग एका ऐलान करणाऱ्याने ऐलान केले, हे काफिलावाल्यांनो! तुम्ही लोक तर चोर आहात! info
التفاسير:

external-link copy
71 : 12

قَالُوْا وَاَقْبَلُوْا عَلَیْهِمْ مَّاذَا تَفْقِدُوْنَ ۟

७१. त्यांनी त्याच्याकडे तोंड फिरवून म्हटले, तुमची कोणती वस्तू हरवली आहे? info
التفاسير:

external-link copy
72 : 12

قَالُوْا نَفْقِدُ صُوَاعَ الْمَلِكِ وَلِمَنْ جَآءَ بِهٖ حِمْلُ بَعِیْرٍ وَّاَنَا بِهٖ زَعِیْمٌ ۟

७२. उत्तर दिले की शाही प्याला हरवला आहे, जो तो घेऊन येईल त्याला एक उंटाचे ओझे इतके धान्य मिळेल. या वचनाची मी हमी देतो. info
التفاسير:

external-link copy
73 : 12

قَالُوْا تَاللّٰهِ لَقَدْ عَلِمْتُمْ مَّا جِئْنَا لِنُفْسِدَ فِی الْاَرْضِ وَمَا كُنَّا سٰرِقِیْنَ ۟

७३. ते म्हणाले, अल्लाहची शपथ! तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता की आम्ही देशात उपद्रव निर्माण करण्यासाठी आलो नाहीत आणि ना आम्ही चोर आहोत. info
التفاسير:

external-link copy
74 : 12

قَالُوْا فَمَا جَزَآؤُهٗۤ اِنْ كُنْتُمْ كٰذِبِیْنَ ۟

७४. ते म्हणाले, बरे चोरीची काय शिक्षा आहे जर तुम्ही खोटे ठराल. info
التفاسير:

external-link copy
75 : 12

قَالُوْا جَزَآؤُهٗ مَنْ وُّجِدَ فِیْ رَحْلِهٖ فَهُوَ جَزَآؤُهٗ ؕ— كَذٰلِكَ نَجْزِی الظّٰلِمِیْنَ ۟

७५. उत्तर दिले, याची शिक्षा हीच की ज्याच्या सामान्यात तो प्याला आढळून येईल तोच त्याच्या बदली आहे. आम्ही तर अत्याचारींना हीच शिक्षा देत असतो. info
التفاسير:

external-link copy
76 : 12

فَبَدَاَ بِاَوْعِیَتِهِمْ قَبْلَ وِعَآءِ اَخِیْهِ ثُمَّ اسْتَخْرَجَهَا مِنْ وِّعَآءِ اَخِیْهِ ؕ— كَذٰلِكَ كِدْنَا لِیُوْسُفَ ؕ— مَا كَانَ لِیَاْخُذَ اَخَاهُ فِیْ دِیْنِ الْمَلِكِ اِلَّاۤ اَنْ یَّشَآءَ اللّٰهُ ؕ— نَرْفَعُ دَرَجٰتٍ مَّنْ نَّشَآءُ ؕ— وَفَوْقَ كُلِّ ذِیْ عِلْمٍ عَلِیْمٌ ۟

७६. मग (यूसुफ) ने आपल्या भावाचे सामान तपासण्यापूर्वी दुसऱ्यांचे सामान तपासायला सुरुवात केली, मग त्याने पिण्याचा प्याला आपल्या भावाच्या सामानातून काढला. आम्ही यूसुफकरिता अशा प्रकारे ही योजना बनविली. त्या बादशहाच्या कायद्यानुसार तो आपल्या भावाला (रोखून) ठेवू शकत नव्हता, परंतु हे की अल्लाहला मंजूर असेल. आम्ही ज्याला इच्छितो त्याचा दर्जा बुलंद करतो. प्रत्येक ज्ञान राखणाऱ्यावर (मोठेपणात) एक मोठा ज्ञानी अस्तित्वात आहे. info
التفاسير:

external-link copy
77 : 12

قَالُوْۤا اِنْ یَّسْرِقْ فَقَدْ سَرَقَ اَخٌ لَّهٗ مِنْ قَبْلُ ۚ— فَاَسَرَّهَا یُوْسُفُ فِیْ نَفْسِهٖ وَلَمْ یُبْدِهَا لَهُمْ ۚ— قَالَ اَنْتُمْ شَرٌّ مَّكَانًا ۚ— وَاللّٰهُ اَعْلَمُ بِمَا تَصِفُوْنَ ۟

७७. ते म्हणाले, जर याने चोरी केली आहे तर (नवलाची गोष्ट नव्हे) याच्या भावानेही यापूर्वी चोरी केली आहे. यूसुफने ही गोष्ट आपल्या मनात ठेवली आणि त्यांच्यासमोर अगदी जाहीर केले नाही, म्हटले की तुम्ही वाईट ठिकाणी आहात आणि जे काही तुम्ही सांगत आहात अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो. info
التفاسير:

external-link copy
78 : 12

قَالُوْا یٰۤاَیُّهَا الْعَزِیْزُ اِنَّ لَهٗۤ اَبًا شَیْخًا كَبِیْرًا فَخُذْ اَحَدَنَا مَكَانَهٗ ۚ— اِنَّا نَرٰىكَ مِنَ الْمُحْسِنِیْنَ ۟

७८. ते म्हणाले, हे मिस्र देशाचा सर्वाधिकार राखणारे! याचे पिता अतिशय वृद्ध मनुष्य आहेत. तुम्ही याच्याऐवजी आमच्यापैकी एखाद्याला ठेवून घ्या. आम्ही असे पाहतो की तुम्ही मोठे सज्जन मनुष्य आहात. info
التفاسير: