قۇرئان كەرىم مەنىلىرىنىڭ تەرجىمىسى - مارتىنچە تەرجىمىسى - مۇھەممەد شەپىيئ ئەنسارى

تەلاق

external-link copy
1 : 65

یٰۤاَیُّهَا النَّبِیُّ اِذَا طَلَّقْتُمُ النِّسَآءَ فَطَلِّقُوْهُنَّ لِعِدَّتِهِنَّ وَاَحْصُوا الْعِدَّةَ ۚ— وَاتَّقُوا اللّٰهَ رَبَّكُمْ ۚ— لَا تُخْرِجُوْهُنَّ مِنْ بُیُوْتِهِنَّ وَلَا یَخْرُجْنَ اِلَّاۤ اَنْ یَّاْتِیْنَ بِفَاحِشَةٍ مُّبَیِّنَةٍ ؕ— وَتِلْكَ حُدُوْدُ اللّٰهِ ؕ— وَمَنْ یَّتَعَدَّ حُدُوْدَ اللّٰهِ فَقَدْ ظَلَمَ نَفْسَهٗ ؕ— لَا تَدْرِیْ لَعَلَّ اللّٰهَ یُحْدِثُ بَعْدَ ذٰلِكَ اَمْرًا ۟

१. हे पैगंबर! (आपल्या जनसमुदायाच्या लोकांना सांगा) जेव्हा तुम्ही आपल्या पत्न्यांना तलाक देऊ इच्छित असाल तर त्यांच्या इद्दत (ची मुदत सुरू होत) असताना तलाक द्या आणि इद्दतची गणना करा, आणि अल्लाहचे, जो तुमचा पालनकर्ता आहे. भय बाळगत राहा, ना तुम्ही त्यांना त्यांच्या घरांमधून बाहेर काढावे आणि ना त्यांनी (स्वतः) निघावे, मात्र ही गोष्ट वेगळी की त्यांनी उघडपणे दुष्कर्म करून बसावे. या अल्लाहने निर्धारित केलेल्या सीमा (मर्यादा) आहेत, आणि जो मनुष्य अल्लाहच्या मर्यादांचे उल्लंघन करील त्याने खात्रीने आपल्या स्वतःवर अत्याचार केला, तुम्ही नाही जाणत की कदाचित त्यानंतर अल्लाहने एखादी नवी गोष्ट (स्थिती) निर्माण करावी.१ info

(१) अर्थात पतीच्या मनात, घटस्फोटित स्त्रीविषयी ओढनिर्माण करील आणि तो तिला पुन्हा ठेवण्यास तयार होईल, जसे की पहिल्या व दुसऱ्या तलाकनंतर पतीला इद्दत (अवधी) च्या आत पुन्हा ठेवण्याचा अधिकार आहे. या सर्व काही भाष्यकारांच्या मते अल्लाहने या आयतीत फक्त एक तलाक देण्याची शिकवण दिली आहे आणि एकाच वेळी तीन तलाक देण्यापासून रोखले आहे. कारण जर त्याने एकाच वेळी तीन तलाक देऊन टाकल्यास (आणि शरीअत नियमाने ते उचितही ठरल्यास) मग हे म्हणणे व्यर्थ आहे की कदाचित अल्लाह एखादी नवीन स्थिती निर्माण करील. (फतहुल कदीर)

التفاسير: