పవిత్ర ఖురాన్ యొక్క భావార్థాల అనువాదం - మరాఠి అనువాదం - ముహమ్మద్ షఫీ అన్సారీ

పేజీ నెంబరు:close

external-link copy
87 : 17

اِلَّا رَحْمَةً مِّنْ رَّبِّكَ ؕ— اِنَّ فَضْلَهٗ كَانَ عَلَیْكَ كَبِیْرًا ۟

८७. तुमच्या पालनकर्त्याच्या दयेखेरीज. निःसंशय तुमच्यावर त्याची मोठी कृपा आहे. info
التفاسير:

external-link copy
88 : 17

قُلْ لَّىِٕنِ اجْتَمَعَتِ الْاِنْسُ وَالْجِنُّ عَلٰۤی اَنْ یَّاْتُوْا بِمِثْلِ هٰذَا الْقُرْاٰنِ لَا یَاْتُوْنَ بِمِثْلِهٖ وَلَوْ كَانَ بَعْضُهُمْ لِبَعْضٍ ظَهِیْرًا ۟

८८. सांगा की जर समस्त मानव आणि जिन्न मिळून या कुरआनासारखा (ग्रंथ) आणू इच्छितील तर त्या सर्वांच्याकडून याचे उदाहरण आणणे अशक्य आहे, मग ते आपसात एकमेकांचे सहाय्यक बनले तरीही. info
التفاسير:

external-link copy
89 : 17

وَلَقَدْ صَرَّفْنَا لِلنَّاسِ فِیْ هٰذَا الْقُرْاٰنِ مِنْ كُلِّ مَثَلٍ ؗ— فَاَبٰۤی اَكْثَرُ النَّاسِ اِلَّا كُفُوْرًا ۟

८९. आणि आम्ही तर या कुरआनात लोकांच्या समजण्याकरिता अशा प्रकारे सर्व उदाहरणे सांगितली आहेत, परंतु बहुतेक लोक कृतघ्नपणा दाखविणे थांबवत नाहीत. info
التفاسير:

external-link copy
90 : 17

وَقَالُوْا لَنْ نُّؤْمِنَ لَكَ حَتّٰی تَفْجُرَ لَنَا مِنَ الْاَرْضِ یَنْۢبُوْعًا ۟ۙ

९०. आणि ते म्हणाले, आम्ही तुमच्यावर कधीही ईमान राखणार नाही, जोपर्यंत तुम्ही आमच्यासाठी जमिनीतून पाण्याचा झरा काढून दाखवत नाही. info
التفاسير:

external-link copy
91 : 17

اَوْ تَكُوْنَ لَكَ جَنَّةٌ مِّنْ نَّخِیْلٍ وَّعِنَبٍ فَتُفَجِّرَ الْاَنْهٰرَ خِلٰلَهَا تَفْجِیْرًا ۟ۙ

९१. अथवा स्वतः तुमच्यासाठी एखादा बाग असावा खजुरांचा आणि द्राक्षांचा आणि त्यांच्या दरम्यान तुम्ही अनेक वाहते जलप्रवाह काढून दाखवावेत. info
التفاسير:

external-link copy
92 : 17

اَوْ تُسْقِطَ السَّمَآءَ كَمَا زَعَمْتَ عَلَیْنَا كِسَفًا اَوْ تَاْتِیَ بِاللّٰهِ وَالْمَلٰٓىِٕكَةِ قَبِیْلًا ۟ۙ

९२. किंवा तुम्ही आकाशाला आमच्यावर तुकडे तुकडे करून पाडावे, जसा तुमचा विचार आहे अथवा तुम्ही स्वतः अल्लाहला आणि फरिश्त्यांना आमच्यासमोर आणून उभे करावे. info
التفاسير:

external-link copy
93 : 17

اَوْ یَكُوْنَ لَكَ بَیْتٌ مِّنْ زُخْرُفٍ اَوْ تَرْقٰی فِی السَّمَآءِ ؕ— وَلَنْ نُّؤْمِنَ لِرُقِیِّكَ حَتّٰی تُنَزِّلَ عَلَیْنَا كِتٰبًا نَّقْرَؤُهٗ ؕ— قُلْ سُبْحَانَ رَبِّیْ هَلْ كُنْتُ اِلَّا بَشَرًا رَّسُوْلًا ۟۠

९३. अथवा स्वतः तुमच्यासाठी एखादे सोन्याचे घर असावे किंवा तुम्ही आकाशात चढून जावे आणि आम्ही तर तुमच्या चढून जाण्याचाही तोपर्यंत विश्वास करणार नाही, जोपर्यंत तुम्ही आमच्यावर एखादा ग्रंथ अवतरित करत नाही, जो आम्ही स्वतः वाचून घ्यावा. तुम्ही उत्तर द्या की माझा पालनकर्ता मोठा पवित्र आहे. मी तर एक मानव आहे, जो रसूल (पैगंबर) बनवून पाठविला गेलो आहे. info
التفاسير:

external-link copy
94 : 17

وَمَا مَنَعَ النَّاسَ اَنْ یُّؤْمِنُوْۤا اِذْ جَآءَهُمُ الْهُدٰۤی اِلَّاۤ اَنْ قَالُوْۤا اَبَعَثَ اللّٰهُ بَشَرًا رَّسُوْلًا ۟

९४. आणि लोकांजवळ मार्गदर्शन येऊन पोहोचल्यानंतर ईमान राखण्यापासून रोखणारी केवळ हीच गोष्ट राहिली की ते म्हणाले, काय अल्लाहने एका माणसालाच रसूल (पैगंबर) बनवून पाठविले? info
التفاسير:

external-link copy
95 : 17

قُلْ لَّوْ كَانَ فِی الْاَرْضِ مَلٰٓىِٕكَةٌ یَّمْشُوْنَ مُطْمَىِٕنِّیْنَ لَنَزَّلْنَا عَلَیْهِمْ مِّنَ السَّمَآءِ مَلَكًا رَّسُوْلًا ۟

९५. (तुम्ही) सांगा, जर धरतीवर फरिश्ते चालत फिरत असते आणि इथे वास्तव्य करणारे राहिले असते तर मग आम्हीही त्यांच्याजवळ एखाद्या आस्मानी फरिश्त्यालाच रसूल बनवून पाठविले असते. info
التفاسير:

external-link copy
96 : 17

قُلْ كَفٰی بِاللّٰهِ شَهِیْدًا بَیْنِیْ وَبَیْنَكُمْ ؕ— اِنَّهٗ كَانَ بِعِبَادِهٖ خَبِیْرًا بَصِیْرًا ۟

९६. सांगा, माझ्या आणि तुमच्या दरम्यान अल्लाहचे साक्षी असणे पुरेसे आहे तो आपल्या दासांना चांगल्या प्रकारे जाणून आहे आणि चांगल्या प्रकारे पाहणारा आहे. info
التفاسير: