పవిత్ర ఖురాన్ యొక్క భావార్థాల అనువాదం - మరాఠి అనువాదం - ముహమ్మద్ షఫీ అన్సారీ

పేజీ నెంబరు:close

external-link copy
44 : 12

قَالُوْۤا اَضْغَاثُ اَحْلَامٍ ۚ— وَمَا نَحْنُ بِتَاْوِیْلِ الْاَحْلَامِ بِعٰلِمِیْنَ ۟

४४. दरबारी लोकांनी उत्तर दिले, ही तर विसकटलेल्या (विचारांची) स्वप्ने आहेत आणि अशा प्रकारच्या व्यग्रचित्त स्वप्नांचा खुलासा आम्ही जाणत नाही. info
التفاسير:

external-link copy
45 : 12

وَقَالَ الَّذِیْ نَجَا مِنْهُمَا وَادَّكَرَ بَعْدَ اُمَّةٍ اَنَا اُنَبِّئُكُمْ بِتَاْوِیْلِهٖ فَاَرْسِلُوْنِ ۟

४५. आणि त्या कैद्यांपैकी सुटका झालेल्याला अकस्मात आठवण झाली, आणि तो म्हणू लागला, मी तुम्हाला याचा खुलासा येऊन सांगतो. मला जाण्याची परवानगी द्यावी. info
التفاسير:

external-link copy
46 : 12

یُوْسُفُ اَیُّهَا الصِّدِّیْقُ اَفْتِنَا فِیْ سَبْعِ بَقَرٰتٍ سِمَانٍ یَّاْكُلُهُنَّ سَبْعٌ عِجَافٌ وَّسَبْعِ سُنْۢبُلٰتٍ خُضْرٍ وَّاُخَرَ یٰبِسٰتٍ ۙ— لَّعَلِّیْۤ اَرْجِعُ اِلَی النَّاسِ لَعَلَّهُمْ یَعْلَمُوْنَ ۟

४६. हे यूसुफ! हे अगदी सच्चे यूसुफ! तुम्ही आम्हाला या स्वप्नाचा खुलासा सांगा की सात धष्टपुष्ट गायी आहेत, ज्यांना सात दुबळ्या गायी खात आहेत आणि सात अगदी हिरवी कणसे आहेत आणि दुसरी सात कणसे अगदी सुकलेली आहेत. यासाठी की मी परत जाऊन त्या लोकांना सांगावे की त्या सर्वांनी जाणून घ्यावे. info
التفاسير:

external-link copy
47 : 12

قَالَ تَزْرَعُوْنَ سَبْعَ سِنِیْنَ دَاَبًا ۚ— فَمَا حَصَدْتُّمْ فَذَرُوْهُ فِیْ سُنْۢبُلِهٖۤ اِلَّا قَلِیْلًا مِّمَّا تَاْكُلُوْنَ ۟

४७. (यूसुफ यांनी) उत्तर दिले की तुम्ही सतत सात वर्षे सवयीनुसार धान्य पेरा आणि (पीक आल्यावर) त्याची कापणी करून कणसांसमेत राहू द्या. आपल्या खाण्यासाठी थोड्या संख्येशिवाय. info
التفاسير:

external-link copy
48 : 12

ثُمَّ یَاْتِیْ مِنْ بَعْدِ ذٰلِكَ سَبْعٌ شِدَادٌ یَّاْكُلْنَ مَا قَدَّمْتُمْ لَهُنَّ اِلَّا قَلِیْلًا مِّمَّا تُحْصِنُوْنَ ۟

४८. त्यानंतरची सात वर्षे मोठ्या दुष्काळाची येतील ती ते धान्य खाऊन टाकतील जे तुम्ही त्यांच्यासाठी जमा करून ठेवले होते. त्याशिवाय जे थोडेसे तुम्ही रोखून ठेवाल. info
التفاسير:

external-link copy
49 : 12

ثُمَّ یَاْتِیْ مِنْ بَعْدِ ذٰلِكَ عَامٌ فِیْهِ یُغَاثُ النَّاسُ وَفِیْهِ یَعْصِرُوْنَ ۟۠

४९. मग याच्यानंतर जे वर्ष येईल, त्यात लोकांसाठी खूप पाऊस पडेल आणि त्यात ते (द्राक्षाचा रसदेखील) खूप गाळतील. info
التفاسير:

external-link copy
50 : 12

وَقَالَ الْمَلِكُ ائْتُوْنِیْ بِهٖ ۚ— فَلَمَّا جَآءَهُ الرَّسُوْلُ قَالَ ارْجِعْ اِلٰی رَبِّكَ فَسْـَٔلْهُ مَا بَالُ النِّسْوَةِ الّٰتِیْ قَطَّعْنَ اَیْدِیَهُنَّ ؕ— اِنَّ رَبِّیْ بِكَیْدِهِنَّ عَلِیْمٌ ۟

५०. आणि राजा म्हणाला, त्याला (यूसुफला) माझ्याजवळ आणा. जेव्हा संदेश पोहचविणारा यूसुफजवळ पोहोचला तेव्हा यूसुफ म्हणाले, आपल्या राजाकडे परत जा आणि त्यांना विचारा की त्या स्त्रियांची खरी कहाणी काय आहे, ज्यांनी आपले हात कापून घेतले होते. त्यांचे कपट चांगल्या प्रकारे जाणणारा माझा पालनकर्ताच आहे. info
التفاسير:

external-link copy
51 : 12

قَالَ مَا خَطْبُكُنَّ اِذْ رَاوَدْتُّنَّ یُوْسُفَ عَنْ نَّفْسِهٖ ؕ— قُلْنَ حَاشَ لِلّٰهِ مَا عَلِمْنَا عَلَیْهِ مِنْ سُوْٓءٍ ؕ— قَالَتِ امْرَاَتُ الْعَزِیْزِ الْـٰٔنَ حَصْحَصَ الْحَقُّ ؗ— اَنَا رَاوَدْتُّهٗ عَنْ نَّفْسِهٖ وَاِنَّهٗ لَمِنَ الصّٰدِقِیْنَ ۟

५१. (राजाने) विचारले, हे स्त्रियांनो! त्या वेळची खरी कहाणी काय आहे, जेव्हा तुम्ही कपट करून यूसुफला त्याच्या मनापासून बहकवू इच्छित होत्या? त्यांनी स्पष्ट उत्तर दिले की (अल्लाह जाणतो) आम्ही यूसुफमध्ये कोणातही वाईट गुण पाहिला नाही, मग तर अजीजची पत्नीही उद्‌गारली, आता तर सत्य उघडकीस आलेच आहे. मीच त्याला बहकविणयाचा प्रयत्न केला होता त्याच्या मनापासून (विचलित करण्याचा) आणि निःसंशय तो खऱ्या लोकांपैकी आहे. info
التفاسير:

external-link copy
52 : 12

ذٰلِكَ لِیَعْلَمَ اَنِّیْ لَمْ اَخُنْهُ بِالْغَیْبِ وَاَنَّ اللّٰهَ لَا یَهْدِیْ كَیْدَ الْخَآىِٕنِیْنَ ۟

५२. हे या कारणास्तव की (अजीज) ला माहीत व्हावे की मी त्याच्याशी विश्वासघात केला नाही आणि हेही की अल्लाह कपट करणाऱ्यांचा डाव सफल होऊ देत नाही. info
التفاسير: