د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

external-link copy
19 : 6

قُلْ اَیُّ شَیْءٍ اَكْبَرُ شَهَادَةً ؕ— قُلِ اللّٰهُ ۫— شَهِیْدٌۢ بَیْنِیْ وَبَیْنَكُمْ ۫— وَاُوْحِیَ اِلَیَّ هٰذَا الْقُرْاٰنُ لِاُنْذِرَكُمْ بِهٖ وَمَنْ بَلَغَ ؕ— اَىِٕنَّكُمْ لَتَشْهَدُوْنَ اَنَّ مَعَ اللّٰهِ اٰلِهَةً اُخْرٰی ؕ— قُلْ لَّاۤ اَشْهَدُ ۚ— قُلْ اِنَّمَا هُوَ اِلٰهٌ وَّاحِدٌ وَّاِنَّنِیْ بَرِیْٓءٌ مِّمَّا تُشْرِكُوْنَ ۟ۘ

१९. तुम्ही सांगा की कोणाची साक्ष मोठी आहे? सांगा की आमच्या आणि तुमच्या दरम्यान अल्लाह साक्षी आहे आणि हा कुरआन माझ्याकडे वहयी (अवतरीत) केला गेला आहे, यासाठी की त्याच्याद्वारे तुम्हाला आणि ज्यांच्यापर्यंत हे पोहोचेल, त्या सर्वांना सचेत करावे.१ काय तुम्ही साक्ष देता की अल्लाहसोबत अन्य इतर उपास्ये (माबूद) आहेत? तुम्ही सांगा की मी या गोष्टीची साक्ष नाही देत. तुम्ही सांगा, तो एकच उपासना करण्यायोग्य आहे आणि मी तुमच्या शिर्कपासून मुक्त आहे. info

(१) रबीअ बिन अनस कथन करतात की आता ज्या कोणापर्यंत कुरआन पोहोचले, जर तो पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा सच्चा अनुयायी आहे तर त्याचे हे कर्तव्य ठरते की त्यानेही लोकांना अल्लाहकडे, त्याचप्रमाणे बोलवावे ज्याप्रमाणे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लोकांना आवाहन करीत असत आणि त्याचप्रमाणे जागृत करावे जसे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी जागृत केले होते. (इब्ने कसीर)

التفاسير: