د قرآن کریم د معناګانو ژباړه - ماراتي ژباړه - محمد شفیع انصاري

external-link copy
183 : 2

یٰۤاَیُّهَا الَّذِیْنَ اٰمَنُوْا كُتِبَ عَلَیْكُمُ الصِّیَامُ كَمَا كُتِبَ عَلَی الَّذِیْنَ مِنْ قَبْلِكُمْ لَعَلَّكُمْ تَتَّقُوْنَ ۟ۙ

१८३. हे ईमानधारकांनो! तुमच्यावर रोजे (उपवास व्रत जे रमजानच्या महिन्यात राखले जाते) फर्ज (बन्धनकारक) केले गेलेत, ज्या प्रकारे तुमच्या पूर्वीच्या लोकांवर फर्ज केले गेले होते. यासाठी की तुम्ही तकवा (अल्लाहचे भय) चा मार्ग धरावा.१ info

(१) ‘रोजा’ याचा अर्थ, सूर्योदयापूर्वी रात्रीच्या अंधारानंतर जो सफेद प्रकाश वातावरणात असतो, त्या वेळेपासून सूर्यास्तापर्यंत, अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी खाणे-पिणे, पत्नीशी समागम करणे यापासून स्वतःला रोखणे. इस्लामचा हा उपासनाप्रकार आत्मशुद्धीकरिता फार आवश्यक आहे. आणि म्हणूनच हा तुमच्या पूर्वीच्या जनसमूहांवरही फर्ज (बंधनकारक) केला गेला होता.

التفاسير: