ߞߎ߬ߙߣߊ߬ ߞߟߊߒߞߋ ߞߘߐ ߟߎ߬ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߊ߯ߙߊߕߌߞߊ߲ ߘߟߊߡߌߘߊ - ߡߎ߬ߤ߭ߊߡߡߊߘߎ߫ ߛ߭ߊ߬ߝߌ߯ߺߊ߳ߺߎ߫ ߊ߲߬ߛ߫ߊ߯ߙߌ߮

ߞߐߜߍ ߝߙߍߕߍ:close

external-link copy
11 : 43

وَالَّذِیْ نَزَّلَ مِنَ السَّمَآءِ مَآءً بِقَدَرٍ ۚ— فَاَنْشَرْنَا بِهٖ بَلْدَةً مَّیْتًا ۚ— كَذٰلِكَ تُخْرَجُوْنَ ۟

११. आणि त्यानेच आकाशातून एका अनुमानानुसार पर्जन्यवृष्टी केली तेव्हा आम्ही त्याद्वारे मृत शहराला जिवंत केले. याच प्रकारे तुम्ही बाहेर काढले जाल. info
التفاسير:

external-link copy
12 : 43

وَالَّذِیْ خَلَقَ الْاَزْوَاجَ كُلَّهَا وَجَعَلَ لَكُمْ مِّنَ الْفُلْكِ وَالْاَنْعَامِ مَا تَرْكَبُوْنَ ۟ۙ

१२. आणि ज्याने सर्व वस्तूंच्या जोड्या१ बनविल्या आणि तुमच्या (वाहना) करिता नौका बनविल्या आणि चतुष्पाद पशु निर्माण केले, ज्यांच्यावर तुम्ही स्वार होता. info

(१) प्रत्येक वस्तू जोडी-जोडीने बनविली. नर-मादी, वनस्पती, शेती, फळ-फूल आणि प्राणी सर्वांत नर मादी आहेत. काहींच्या मते यास अभिप्रेत एकमेकांची प्रतिकूल वस्तू होत. उदा. उजेड आणि अंधार, रोग आणि स्वास्थ्य, न्याय व अन्याय, सत्य - असत्य, भलेपणा आणि बुरेपणा, ईमान आणि कुप्र (विश्वास व नकार) नरमी आणि सक्ती वगैरे. काहीच्या मते जोडी, प्रकाराच्या अर्थाने आहे. अर्थात सर्वच प्रकारांचा निर्माणकर्ता अल्लाह आहे.

التفاسير:

external-link copy
13 : 43

لِتَسْتَوٗا عَلٰی ظُهُوْرِهٖ ثُمَّ تَذْكُرُوْا نِعْمَةَ رَبِّكُمْ اِذَا اسْتَوَیْتُمْ عَلَیْهِ وَتَقُوْلُوْا سُبْحٰنَ الَّذِیْ سَخَّرَ لَنَا هٰذَا وَمَا كُنَّا لَهٗ مُقْرِنِیْنَ ۟ۙ

१३. यासाठी की तुम्ही त्यांच्या पाठीवर स्वार व्हावे आणि जेव्हा तुम्ही यांच्यावर व्यवस्थित बसाल, तेव्हा आपल्या पालनकर्त्याने (प्रदान केलेल्या) देणग्यांचे स्मरण करा आणि म्हणा, मोठा पवित्र आहे तो, ज्याने यास आमच्या अधीन केले, अन्यथा यास काबूत आणण्याची आमची ताकद नव्हती. info
التفاسير:

external-link copy
14 : 43

وَاِنَّاۤ اِلٰی رَبِّنَا لَمُنْقَلِبُوْنَ ۟

१४. आणि निश्चितपणे आम्ही आपल्या पालनकर्त्याकडे परतणार आहोत. info
التفاسير:

external-link copy
15 : 43

وَجَعَلُوْا لَهٗ مِنْ عِبَادِهٖ جُزْءًا ؕ— اِنَّ الْاِنْسَانَ لَكَفُوْرٌ مُّبِیْنٌ ۟ؕ۠

१५. आणि त्यांनी अल्लाहच्या काही दासांना त्याचा अंश बनवून घेतले. निःसंशय, मनुष्य, स्पष्टपणे कृतघ्न आहे. info
التفاسير:

external-link copy
16 : 43

اَمِ اتَّخَذَ مِمَّا یَخْلُقُ بَنٰتٍ وَّاَصْفٰىكُمْ بِالْبَنِیْنَ ۟

१६. काय अल्लाहने आपल्या निर्मितीमधून कन्या, स्वतःसाठी राखल्यात आणि तुम्हाला पुत्रांनी सुशोभित केले? info
التفاسير:

external-link copy
17 : 43

وَاِذَا بُشِّرَ اَحَدُهُمْ بِمَا ضَرَبَ لِلرَّحْمٰنِ مَثَلًا ظَلَّ وَجْهُهٗ مُسْوَدًّا وَّهُوَ كَظِیْمٌ ۟

१७. जेव्हा त्यांच्यापैकी एखाद्याला त्या गोष्टींची खबर दिली जाते जिचे उदाहरण त्याने दयावान अल्लाहकरिता सांगितले आहे, तेव्हा त्याचा चेहरा काळवंडतो आणि तो दुःखी होतो. info
التفاسير:

external-link copy
18 : 43

اَوَمَنْ یُّنَشَّؤُا فِی الْحِلْیَةِ وَهُوَ فِی الْخِصَامِ غَیْرُ مُبِیْنٍ ۟

१८. किंवा, काय (अल्लाहची संतती मुली आहेत) ज्या दाग-दागिन्यांत वाढतात आणि भांडण-तंट्यात (आपले म्हणणे) स्पष्ट बोलू शकत नाहीत. info
التفاسير:

external-link copy
19 : 43

وَجَعَلُوا الْمَلٰٓىِٕكَةَ الَّذِیْنَ هُمْ عِبٰدُ الرَّحْمٰنِ اِنَاثًا ؕ— اَشَهِدُوْا خَلْقَهُمْ ؕ— سَتُكْتَبُ شَهَادَتُهُمْ وَیُسْـَٔلُوْنَ ۟

१९. आणि त्यांनी दयावान (अल्लाह) ची उपासना करणाऱ्या फरिश्त्यांना स्त्री बनवून टाकले. काय त्यांच्या निर्मितीच्या वेळी ते हजर होते? थ्यांची ही साक्ष लिहून घेतली जाईल आणि त्यांना त्यासंबंधी विचारणा केली जाईल. info
التفاسير:

external-link copy
20 : 43

وَقَالُوْا لَوْ شَآءَ الرَّحْمٰنُ مَا عَبَدْنٰهُمْ ؕ— مَا لَهُمْ بِذٰلِكَ مِنْ عِلْمٍ ۗ— اِنْ هُمْ اِلَّا یَخْرُصُوْنَ ۟ؕ

२०. आणि म्हणतात की अल्लाहने इच्छिले असते तर आम्ही त्यांची उपासना केली नसती. त्यांना त्याचे काहीच ज्ञान नाही. हे तर केवळ अटकळीच्या (खोट्या गोष्टी) बोलतात. info
التفاسير:

external-link copy
21 : 43

اَمْ اٰتَیْنٰهُمْ كِتٰبًا مِّنْ قَبْلِهٖ فَهُمْ بِهٖ مُسْتَمْسِكُوْنَ ۟

२१. काय आम्ही यापूर्वी त्यांना (दुसरा) एखादा ग्रंथ प्रदान केला आहे ज्याला यांनी मजबूतपणे धरून ठेवले आहे? info
التفاسير:

external-link copy
22 : 43

بَلْ قَالُوْۤا اِنَّا وَجَدْنَاۤ اٰبَآءَنَا عَلٰۤی اُمَّةٍ وَّاِنَّا عَلٰۤی اٰثٰرِهِمْ مُّهْتَدُوْنَ ۟

२२. (नव्हे) किंबहुना हे तर म्हणतात की आम्हाला आमचे वाडवडील एका धर्मावर आढळले, आणि आम्ही त्यांच्याच पदचिन्हांवर चालून सन्मार्ग प्राप्त केला आहे. info
التفاسير: