আল-কোৰআনুল কাৰীমৰ অৰ্থানুবাদ - মাৰাঠী অনুবাদ- মুহাম্মদ শ্বফী আনচাৰী

পৃষ্ঠা নং:close

external-link copy
82 : 7

وَمَا كَانَ جَوَابَ قَوْمِهٖۤ اِلَّاۤ اَنْ قَالُوْۤا اَخْرِجُوْهُمْ مِّنْ قَرْیَتِكُمْ ۚ— اِنَّهُمْ اُنَاسٌ یَّتَطَهَّرُوْنَ ۟

८२. आणि त्यांच्या जनसमूहाला काही उत्तर देता आले नाही याखेरीज की आपसात म्हणू लागले की या लोकांना वस्तीबाहेर घालवा. हे मोठे पाक साफ (सत्शील, पवित्र) बनतात. info
التفاسير:

external-link copy
83 : 7

فَاَنْجَیْنٰهُ وَاَهْلَهٗۤ اِلَّا امْرَاَتَهٗ ۖؗ— كَانَتْ مِنَ الْغٰبِرِیْنَ ۟

८३. जेव्हा आम्ही त्यांना (लूतला) आणि त्यांच्या कुटुंबियांना वाचविले त्यांच्या पत्नीखेरीज, कारण ती त्याच लोकांपैकी राहिली, जे (अज़ाबग्रस्त) राहिलेत. info
التفاسير:

external-link copy
84 : 7

وَاَمْطَرْنَا عَلَیْهِمْ مَّطَرًا ؕ— فَانْظُرْ كَیْفَ كَانَ عَاقِبَةُ الْمُجْرِمِیْنَ ۟۠

८४. आणि आम्ही त्यांच्यावर एक नवीन प्रकारचा पाऊस पाडला तेव्हा बघा तरी, त्या अपराध्यांचा कसा शेवट झाला! info
التفاسير:

external-link copy
85 : 7

وَاِلٰی مَدْیَنَ اَخَاهُمْ شُعَیْبًا ؕ— قَالَ یٰقَوْمِ اعْبُدُوا اللّٰهَ مَا لَكُمْ مِّنْ اِلٰهٍ غَیْرُهٗ ؕ— قَدْ جَآءَتْكُمْ بَیِّنَةٌ مِّنْ رَّبِّكُمْ فَاَوْفُوا الْكَیْلَ وَالْمِیْزَانَ وَلَا تَبْخَسُوا النَّاسَ اَشْیَآءَهُمْ وَلَا تُفْسِدُوْا فِی الْاَرْضِ بَعْدَ اِصْلَاحِهَا ؕ— ذٰلِكُمْ خَیْرٌ لَّكُمْ اِنْ كُنْتُمْ مُّؤْمِنِیْنَ ۟ۚ

८५. आणि (आम्ही) मदयनकडे त्यांचे भाऊ शोऐब यांना पाठविले. शोऐब म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! तुम्ही अल्लाहची उपासना करा, त्याच्याखेरीज तुमचा कोणीही माबूद नाही तुमच्या पालनकर्त्यातर्फे तुमच्याजवळ स्पष्ट निशाणी येऊन पोहोचली आहे. तेव्हा तुम्ही माप तोल पुरेपूर करीत जा, आणि लोकांना त्यांच्या चीज-वस्तू कमी करून देऊ नका आणि साऱ्या धरतीवर, सुधारणा केली गेल्यानंतर फसाद (उत्पात-उपद्रव) पसरवू नका. हे तुमच्यासाठी लाभदायक आहे जर तुम्ही ईमान राखाल. info
التفاسير:

external-link copy
86 : 7

وَلَا تَقْعُدُوْا بِكُلِّ صِرَاطٍ تُوْعِدُوْنَ وَتَصُدُّوْنَ عَنْ سَبِیْلِ اللّٰهِ مَنْ اٰمَنَ بِهٖ وَتَبْغُوْنَهَا عِوَجًا ۚ— وَاذْكُرُوْۤا اِذْ كُنْتُمْ قَلِیْلًا فَكَثَّرَكُمْ ۪— وَانْظُرُوْا كَیْفَ كَانَ عَاقِبَةُ الْمُفْسِدِیْنَ ۟

८६. आणि तुम्ही प्रत्येक रस्त्यावर त्यांना धमकी देण्यासाठी आणि अल्लाहच्या मार्गापासून रोखण्यासाठी, ज्यांनी अल्लाहवर ईमान राखले, बसू नका आणि त्यात चूका शोधत, आणि स्मरण करा जेव्हा तुम्ही संख्येने कमी होते, अल्लाहने तुम्हाला जास्त केले मग पाहा उत्पाती लोकांचा शेवट कसा झाला. info
التفاسير:

external-link copy
87 : 7

وَاِنْ كَانَ طَآىِٕفَةٌ مِّنْكُمْ اٰمَنُوْا بِالَّذِیْۤ اُرْسِلْتُ بِهٖ وَطَآىِٕفَةٌ لَّمْ یُؤْمِنُوْا فَاصْبِرُوْا حَتّٰی یَحْكُمَ اللّٰهُ بَیْنَنَا ۚ— وَهُوَ خَیْرُ الْحٰكِمِیْنَ ۟

८७. आणि जर तुमच्यापैकी काही लोकांनी त्या आदेशावर ईमान राखले, ज्यासह मला पाठविले गेले आहे आणि काहींनी ईमान राखले नाही तर थोडा धीर-संयम राखा. येथेपर्यर्ंत की अल्लाहने आमच्या दरम्यान फैसला करावा आणि तो सर्वांत उत्तम फैसला करणारा आहे. info
التفاسير: