የቅዱስ ቁርዓን ይዘት ትርጉም - የማራትኛ ትርጉም - ሙሐመድ ሸፊዕ አንሷሪይ

የገፅ ቁጥር:close

external-link copy
196 : 7

اِنَّ وَلِیِّ اللّٰهُ الَّذِیْ نَزَّلَ الْكِتٰبَ ۖؗ— وَهُوَ یَتَوَلَّی الصّٰلِحِیْنَ ۟

१९६. निःसंशय, माझा मित्र-मदतकर्ता अल्लाहच आहे ज्याने हा ग्रंथ (पवित्र कुरआन) अवतरीत केला आणि तो नेक सदाचारी लोकांची मदत करतो. info
التفاسير:

external-link copy
197 : 7

وَالَّذِیْنَ تَدْعُوْنَ مِنْ دُوْنِهٖ لَا یَسْتَطِیْعُوْنَ نَصْرَكُمْ وَلَاۤ اَنْفُسَهُمْ یَنْصُرُوْنَ ۟

१९७. आणि तुम्ही ज्या लोकांना अल्लाहला सोडून पुकारता (उपासना करता) ते तुमची काहीच मदत करू शकत नाही, आणि ना ते स्वतः आपली मदत करू शकतात. info
التفاسير:

external-link copy
198 : 7

وَاِنْ تَدْعُوْهُمْ اِلَی الْهُدٰی لَا یَسْمَعُوْا ؕ— وَتَرٰىهُمْ یَنْظُرُوْنَ اِلَیْكَ وَهُمْ لَا یُبْصِرُوْنَ ۟

१९८. आणि जर त्यांना काही सांगण्यासाठी पुकाराल तर ते ऐकू शकणार नाहीत. आणि तुम्ही त्यांना पाहता की ते तुम्हाला पाहत आहेत आणि ते काहीच पाहत नाहीत. info
التفاسير:

external-link copy
199 : 7

خُذِ الْعَفْوَ وَاْمُرْ بِالْعُرْفِ وَاَعْرِضْ عَنِ الْجٰهِلِیْنَ ۟

१९९. तुम्ही क्षमाशीलतेचा मार्ग पत्करा, सत्कर्मांची शिकवण देत राहा, आणि मूर्ख लोकांपासून अलिप्त राहा. info
التفاسير:

external-link copy
200 : 7

وَاِمَّا یَنْزَغَنَّكَ مِنَ الشَّیْطٰنِ نَزْغٌ فَاسْتَعِذْ بِاللّٰهِ ؕ— اِنَّهٗ سَمِیْعٌ عَلِیْمٌ ۟

२००. आणि जर तुम्हाला एखादा संशय सैतानाकडून येऊ लागेल तर अल्लाहचे शरण मागत जा. निःसंशय अल्लाह मोठा ऐकणारा आणि खूप जाणणारा आहे. info
التفاسير:

external-link copy
201 : 7

اِنَّ الَّذِیْنَ اتَّقَوْا اِذَا مَسَّهُمْ طٰٓىِٕفٌ مِّنَ الشَّیْطٰنِ تَذَكَّرُوْا فَاِذَا هُمْ مُّبْصِرُوْنَ ۟ۚ

२०१. निःसंशय जे लोक (अल्लाहचे) भय बाळगतात जेव्हा त्यांना एखादा संशय सैतानाकडून उद्‌भवतो, तेव्हा ते अल्लाहच्या स्मरणात मग्न होतात, यास्तव अकस्मात त्यांचे डोळे उघडतात. info
التفاسير:

external-link copy
202 : 7

وَاِخْوَانُهُمْ یَمُدُّوْنَهُمْ فِی الْغَیِّ ثُمَّ لَا یُقْصِرُوْنَ ۟

२०२. आणि जे सैतानांचे अनुयायी आहेत, ते त्यांना संकटात ओढून नेतात. मग ते थांबत नाही. info
التفاسير:

external-link copy
203 : 7

وَاِذَا لَمْ تَاْتِهِمْ بِاٰیَةٍ قَالُوْا لَوْلَا اجْتَبَیْتَهَا ؕ— قُلْ اِنَّمَاۤ اَتَّبِعُ مَا یُوْحٰۤی اِلَیَّ مِنْ رَّبِّیْ ۚ— هٰذَا بَصَآىِٕرُ مِنْ رَّبِّكُمْ وَهُدًی وَّرَحْمَةٌ لِّقَوْمٍ یُّؤْمِنُوْنَ ۟

२०३. आणि जेव्हा तुम्ही एखादा मोजिजा (ईश-चमत्कार) त्यांच्यासमोर सादर करत नाही, तेव्हा ते लोक म्हणतात की तुम्ही हा चमत्कार का आणला नाही. तुम्ही सांगा की मी त्याचे अनुसरण करतो जो माझ्याकडे माझ्या पालनकर्त्यातर्फे आदेश पाठविला गेला आहे. हे मान्य करा. हे तुमच्या पालनकर्त्यातर्फे अनेक प्रमाणे आहेत आणि मार्गदर्शन व दया कृपा आहे त्या लोकांकरिता, जे ईमान राखतात. info
التفاسير:

external-link copy
204 : 7

وَاِذَا قُرِئَ الْقُرْاٰنُ فَاسْتَمِعُوْا لَهٗ وَاَنْصِتُوْا لَعَلَّكُمْ تُرْحَمُوْنَ ۟

२०४. आणि जेव्हा कुरआन पठण होत असेल तेव्हा ते लक्षपूर्वक ऐका, आणि शांत राहा आशा आहे की तुमच्यावर दया होईल. info
التفاسير:

external-link copy
205 : 7

وَاذْكُرْ رَّبَّكَ فِیْ نَفْسِكَ تَضَرُّعًا وَّخِیْفَةً وَّدُوْنَ الْجَهْرِ مِنَ الْقَوْلِ بِالْغُدُوِّ وَالْاٰصَالِ وَلَا تَكُنْ مِّنَ الْغٰفِلِیْنَ ۟

२०५. आणि (हे मानव!) आपल्या मनात नम्रता आणि भय राखून आपल्या पालनकर्त्याचे स्मरण करीत राहा. सकाळ-संध्याकाळ स्वर सौम्य ठेवून आणि गाफील लोकांपैकी होऊ नको. info
التفاسير:

external-link copy
206 : 7

اِنَّ الَّذِیْنَ عِنْدَ رَبِّكَ لَا یَسْتَكْبِرُوْنَ عَنْ عِبَادَتِهٖ وَیُسَبِّحُوْنَهٗ وَلَهٗ یَسْجُدُوْنَ ۟

२०६. निःसंशय, जे लोक तुझ्या पालनकर्त्याशी निकट आहेत ते त्याच्या उपासनेपासून घमेंड करीत नाही आणि त्याची पवित्रता वर्णन करीत त्याच्या पुढे सजदा करतात (माथा टेकतात). info
التفاسير: